Skip to main content

जॉय मुखर्जींना विनम्र अभिवादन..!

लेखक कॉमन मॅन यांनी शनिवार, 10/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे अतिशय आवडते सिनेकलावंत जॉय मुखर्जी यांना काल देवाज्ञा झाली. १९६० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांतून चांगली कामे केली. त्यांना गाणीही खूप छान मिळाली. त्यांच्यावर आणि साधनावर चित्रित झालेले 'आप यू ही अगर हमसे मिलते रहे..' हे खूप छान गाणे आत्ता आम्हाला या निमित्ताने आठवत आहे. जॉय मुखर्जींच्या आत्म्यास सद्गती मिळावी, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना.. -- कॉमॅ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4117
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

आदरांजली. ओ मेरी शाह-ए-खुबा ओ मेरी जान-ए-जनाना तुम मेरे पास होती हो कोई दूसरा नही होता

In reply to by प्रदीप

'मी' ऐवजी 'आम्ही' हेच बहुवचन आम्ही वापरतो. अवांतर चर्चेकरता कृपया 'संदेश' अथवा 'खरडवही'चा वापर करावा. सदर गंभीर धाग्यावर अशी अवांतर चर्चा करू नये, ही विनंती..

In reply to by कॉमन मॅन

"आमचे अतिशय आवडते सिनेकलावंत जॉय मुखर्जी यांना काल देवाज्ञा झाली. .....आम्हाला या निमित्ताने आठवत आहे". असे बहुवचनी उल्लेख धाग्यावर आल्याने हे नेमके कुठल्या व्यक्तिसमूहाचे विचार आहेत, हे लक्षात येईना. 'जॉय मुखर्जी फॅन क्लब' (असा काही असलाच, तर तो) मिपावर कार्यरत झाला असावा, असे वाटून गेले. सबब सदर प्रश्न धाग्यास अवांतर आहे असे वाटत नाही.

जॉय मुखर्जी आवडणारे , माझ्या माहिती मधिल "आपण" एक आणि एकच व्यक्ती अहात हे गंभीरपणे येथेच नमुदु म्हणतो.

In reply to by तर्री

तर्री बुवा गैरसमज आहे आपला. मिपा वर कमी असतील. जगात नाहीत. राजेंद्र कुमार यांचे पण आहेत नि विश्वजीत यांचेपण !

In reply to by चौकटराजा

ओ ते भारत भुशण ,प्रदिप कुमार ते पण आवड्णारे असतिल नै का बरच जण ;) अन अन तो दारासिंग पण 'अभिनय'..? करायचा न त्या काळात...

त्यांना बहुधा जॉय मुखर्जी चे चित्रपट आवडत असतीलः शागिर्द लव्ह इन टोकियो लव्ह इन सिमला फिर वोही दिल लाया हू. एक मुसाफिर एक हसीना बादवे जॉय मुखर्जी एका मर्यादेत बरा अभिनेता होता. आमचीही श्रद्धांजली.

In reply to by मृत्युन्जय

बादवे जॉय मुखर्जी एका मर्यादेत बरा अभिनेता होता.
काय म्हणजे, काय अभिनय गुण काय दिसले रे तुला त्याच्यात?

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यामायला सुनील शीट्टी, इम्रान हास्मी हे जर अभिनेते असु शकतात तर जॉय मुखर्जी ने काय घोडे मारले आहे? अभिनयाच्या नावाने बोंबाबोंब म्हणजे भारतभूषण, प्रदीपकुमार, प्रिया राजवंश, नविन निश्चल, विश्वजीत. त्यामानाने जॉय मुखर्जी कमी ठोंब्या होता. म्हणुन एका मर्यादेत बरा अभिनेता होता असे म्हटले आहे. त्यातही क्लीन चिट नाही रे दिलेली त्या बिचार्‍याला. नुसताचा "बरा अभिनेता"" नाही म्हटलेलो. "एका मर्यादेत बरा अभिनेता" म्हटलो आहे्. ट्विंकल खन्ना आणि अनु अगरवाल ठराविक अँगल मधुन (कुठला ते हवा असेल तर व्यनि करावा) बर्‍या दिसतात असे म्हटल्यासारखे आहे. पण म्हणुन तु उद्या मधुबालाचा फोटो बाजुला ठेवुन कुठल्या अँगल मधुन अनु अगरवाल सुंदर दिसते असे म्हटलास तर कसे चालेल? मेल्यावर तरी बिचार्‍याला दोन शब्द बरे ऐकु देत की. वरील ४ चित्रपटांची पुण्याई म्हणुन तरी....

प्रिय़ जॉय, तुमचेही एके काळी बॉलीवूड मधे राज्य होते. भरपूर उंची. देखणा चेहरा. व आवश्यक तो अभिनय. जोडीला,आशा पारेख, साधना, मागे रानीखेत किंवा निशात, गुलमर्ग , फिल्मवर बाजूला साउंड ट्रॅक वर ओपी व एस जे ने केलेला मेलोडिक हंगामा. एकदम फिट्ट मैफल. आपला शागीर्द मधील रोल मस्त ! हमको तुम्हारे इश्कने क्या क्या बना दिया जब कुछ न बन सके तो तमाशा बना दिया सलाम, बोंगाली बाबू !

हे महोदय फारसे लक्षात नाही येत, पण वर उल्लेखलेल्या गाण्यांमुळे दिवे लागले. ओ मेरी शाहे खुबा .. हे आशा पारेख सोबत चित्रित केलेले सर्वांगसुंदर गाणे आठवले. पण मला आवडलेले त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे "आप यु हमसे मिलते रहे, देखिये एक दिन प्यार हो जायेगा" सोबत साधना शिवदासानि..

हे माझे आवडते गाणे. पण त्यातली ती गळाकापू याक्शन म्हणजे भयानक हो.......असो. श्रंद्धांजली....

जॉय, मुकर्जी हा देखणा नट होता..तुळतुळीत दाढी.चापुन चोपुन बसवलेला भांग व हातात गिटार.. उन्चा पुरा..मजा यायची त्याचे सिनेम बघायला... त्याचे सर्वात मोठे उपकार म्हणजे त्याने ओपी नय्यर ला जिवदान दिले.. ओपी म्हणजे अफलातुन सन्गीत कार पण त्याच्या नशीबीकधी मोठ्या कलाकाराच्या फिल्म्स आल्या नाहित.. जॉय, ने मात्र कायम ओपी ला कायम सन्धी दिली ..व ओ.पी ने पण सदा बहार गाणी दिली.. हमसाया मधे माला व शर्मीला दोन हिरोईन होत्या दोधीचे इगो सांभाळता सांभाळता बिचारा बेजार झाल्याचे इसाक मुजावर ने लिहिल्याचे स्मरते. संगीत ओपी चेच..अप्रतिम गाणी .. फिर वोहि दिल लाया हु..सारी गणी भन्नाट..त्यात एका गाण्यात खुप फुगे सोडल्याची द्रुश्ये आहेत ते पाहुन "ह्या चित्रपटानंतर बहुदा निर्मात्यावर फुगे विकण्याची वेळ येणार असा ठाकरी कोमेन्ट शुद्ध निषाद याने मार्मीक मधे टाकला होता मस्त होता तो काळ... आमचीही श्रद्धांजली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

जॉय साहेबांना श्रद्धांजली
ओपी म्हणजे अफलातुन सन्गीत कार पण त्याच्या नशीबीकधी मोठ्या कलाकाराच्या फिल्म्स आल्या नाहित
नया दौर, शम्मी कपूरचे अनेक सिनेमे,सी.आय.डी,मि. अ‍ॅन्ड मिसेस ५५,?

In reply to by चिरोटा

ही व्यथा ओपी साहेबांची होती. पण ते म्हणत" देमार चित्रपटाच्या निर्मात्यानी सुद्धा पैसे से ग्रेड सारखे दिले. नव्हे ते मी मागतच असे !" चित्र पटात काटलेल्या अनेक गाण्यानी नय्यरना रॉयल्टी दिली. त्याना हिरोने जीवदान देण्याचा प्रश्नच येत नाही. निर्माता जॉय बाबत म्हणत असाल तर तसे बरोबर आहे ( हम साया , एक बार मुस्कुरादो ) .

In reply to by अविनाशकुलकर्णी

>>>त्याचे सर्वात मोठे उपकार म्हणजे त्याने ओपी नय्यर ला जिवदान दिले.. हे जरा जास्तच होत आहे असे नाही का वाटत.

In reply to by चिंतामणी

मलाही काश्मिर की कली, नया दौर वगैरे आठवले होते. पण श्रद्धांजली वाहतांना बहुधा आपणही त्यात वाहून जायचे असते! चालायचेच!

त्यांनी (आणि साधना यांनी) पडद्यावर सादर केलेले "बहोत शुक्रिया बडी मेहेरबानी" त्यांनी (आणि सायराबानू यांनी) पडद्यावर सादर केलेले "वो है जरा खफा खफा" ही गाणी ऐकायला आणि पाहायलाही आवडतात.