Skip to main content

बाटली

बाटली

Published on शनीवार, 10/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
फोडली आहे बाटली .. बाटली तोडली का कधी.. नसेल तोडली तर तोडून बघा.. फोडून बघा .. बाटली तेलाची.. हो हो तेलाची.. .. एक बाटली कळकटलेली, मळकटलेली .. किंचित राकट त्या हातात घट्ट धरलेली.. जणू काही स्वप्ने गाठीशी बांधलेली.. फोडलीस तू म्हणून रागानी ती पाही .. मटकन बसून खाली.. तुकडे गोळा करी.. अर्ध्या तुकड्यात त्या वाचले होते तेल काही.. उरलेले ती बोटांनी गोळा करी.. विखुरलेली स्वप्ने वाकुल्या दाखवी.. मुक्या त्या डोळ्यात होता कल्लोळ..लागली काच रक्त वाहे भळभळ .. तमा न कशाची तिला.. हात तसाच पदरास पुसला.. परत सुरु खेळ तिचा.. भू पण स्त्री.. ती पण हट्टी .. तेल सारे सोडेल कशी.. तिचा हिस्सा तिने घेतलाच.. अर्धी बाटली तुटलेली सांभाळत निघाली ती घरला.. कोपऱ्यात उभां कोणी पाहत असे खेळ सारा.. कुतुहलाने पाठलाग केला.. पोचली ती वेशिबाहेरच्या वस्तीला.. शेंबडी कार्टी दोन ..बिलाग्ती तिजला.. म्हणती माय .. वाढ गं आम्हाला.. डाफरे नाटकी.. हाकले पोरांना.. वळताच पाठ.. हात लावे डोळ्यांना.. झरकन गेली खोपट्यात त्या.. रांधली चूल... शिजली भाकरी.. उरल्या सुरल्या तेलात केले कालवण..मायचं ती कशी पोरांची विसरेल आठवण.. गोल गोल भाकऱ्या त्या .. पांढऱ्या शुभ्र होत्या.. हातावर तिच्या जखमा मात्र ताज्या होत्या.. हळूच फिरावी हात ते गालावरून माझ्या..म्हणे भूक लागली कारे राजा.. जखम तिची का खुपली मला.. मीच फोडली होती बाटली.. कळली किमत बाटलीची मला..
लेखनविषय:

याद्या 3027
प्रतिक्रिया 27

बाट्ली चढली......? :crazy: ..हे आपल आवड्ली ;) छान !छान!! चालु द्या चांगल आहे ,पण काव्य आहे की कथा...?

बाट्ली चढली......? :crazy: ..हे आपल आवड्ली ;) छान !छान!! चालु द्या चांगल आहे ,पण काव्य आहे की कथा...? ते जे काही आहे ते वाचुन मला थोड झिंगल्या सारख झाल........ ;)

दारिद्र्य रेषेखालचं जिवन जगणार्‍या आणी संसाराशी झुंज घेऊन उभ्या घरादाराला वाचविणार्‍या अश्या अनेक..माय...आजही आपल्या समाजात आहेत...याचं उत्तम चित्रण तुमच्या मुक्तकातुन झालय... :-) पण,,,,सुरवातीलाच या गरिबीवर चिडुन/कंटाळुन किंवा अजुन आपल्याला जे वाटलं असेल त्या कल्पना चित्रा नुसारही....ही माय असमंजस पणानी तेलाची बाटली फोडते का..? ते नीट स्पष्ट झालेलं नाही... आपण लिहिलेलं मुक्तकही बरच चांगलं उतरलय...पण अजुन नीट जमलं असतं,तसा मनापासुन प्रयत्न झाला असता तर...!

In reply to by पैसा

@मायच्या पोरानं बाटली फोडलीय.>>> अस आहे होय...! बरं मग चालु द्या... मला कदचित त्याच्या लेखनाच्या फॉरमॅट मुळे आणी एकंदरच रचना हवी तितकी सुटसुटीत न लिहिल्यामुळे लक्षात आलं नसावं... असो ...

हर्षद साहेब ह्याला म्हणतात कविता जिवाला चटका लावुन गेलि.... अन डोळ्यात पाणि आणुन गेलि. हिच असते कविचि खरि ताकत. ति तुमच्या कवितेत आहे नक्किच आहे. मस्त

मिपाकरांनि भरभरुन दिलेल्य प्रतिसादासाठी खरेच मनापासुन आभार. अत्रुप्त आत्मा .. तुम्ही म्हणता ते खरेच आहे, एक अनुभव थोडा बदलुन मांडला आहे, त्यामुळे कदाचित थोडा विस्कळितपणा आला असेल. एका वाक्यात सांगायचे तर.. रस्त्यावरुन जाणार्‍या कोण्या बाईच्या हातातली बाटली एका पोराचा धक्का लागुन फुटते, फुटक्या बाटलित तेल गोळा करताना पाहुन तो तिचा पाठलाग करतो, तेव्हा त्याला अज्ञात असलेलि जिवनाची बाजु त्याच्यासमोर उघडी होते.. असा विचार होता. परत एकदा धन्यवाद!!