बाटली
फोडली आहे बाटली .. बाटली तोडली का कधी.. नसेल तोडली तर तोडून बघा.. फोडून बघा .. बाटली तेलाची.. हो हो तेलाची.. .. एक बाटली कळकटलेली, मळकटलेली .. किंचित राकट त्या हातात घट्ट धरलेली.. जणू काही स्वप्ने गाठीशी बांधलेली.. फोडलीस तू म्हणून रागानी ती पाही .. मटकन बसून खाली.. तुकडे गोळा करी.. अर्ध्या तुकड्यात त्या वाचले होते तेल काही.. उरलेले ती बोटांनी गोळा करी.. विखुरलेली स्वप्ने वाकुल्या दाखवी.. मुक्या त्या डोळ्यात होता कल्लोळ..लागली काच रक्त वाहे भळभळ .. तमा न कशाची तिला.. हात तसाच पदरास पुसला.. परत सुरु खेळ तिचा.. भू पण स्त्री.. ती पण हट्टी .. तेल सारे सोडेल कशी.. तिचा हिस्सा तिने घेतलाच.. अर्धी बाटली तुटलेली सांभाळत निघाली ती घरला.. कोपऱ्यात उभां कोणी पाहत असे खेळ सारा.. कुतुहलाने पाठलाग केला.. पोचली ती वेशिबाहेरच्या वस्तीला.. शेंबडी कार्टी दोन ..बिलाग्ती तिजला.. म्हणती माय .. वाढ गं आम्हाला.. डाफरे नाटकी.. हाकले पोरांना.. वळताच पाठ.. हात लावे डोळ्यांना.. झरकन गेली खोपट्यात त्या.. रांधली चूल... शिजली भाकरी.. उरल्या सुरल्या तेलात केले कालवण..मायचं ती कशी पोरांची विसरेल आठवण.. गोल गोल भाकऱ्या त्या .. पांढऱ्या शुभ्र होत्या.. हातावर तिच्या जखमा मात्र ताज्या होत्या.. हळूच फिरावी हात ते गालावरून माझ्या..म्हणे भूक लागली कारे राजा.. जखम तिची का खुपली मला.. मीच फोडली होती बाटली.. कळली किमत बाटलीची मला..
याद्या
3027
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
नि:शब्द..!
+१
___/\___ शब्द नाहीत आता!
अत्रुप्त आत्म्याच्या
कीं प्रयोजनं ?
In reply to अत्रुप्त आत्म्याच्या by प्रचेतस
प्रतिसाद आला की कळेलच.
In reply to कीं प्रयोजनं ? by हर्षद आनंदी
लोल ,, असे पण सुरु झाले का?? असो.. प्रतिक्षा करु या..
In reply to प्रतिसाद आला की कळेलच. by प्रचेतस
च्च...
झिंगाट आहे एकदम
जरा स्लो आहे गाडी तुमची.. पुणेकर.. .
In reply to झिंगाट आहे एकदम by फास्ट पुणेकर
छान लिहिलंय!
बाट्ली चढली......? ..हे आपल
बाट्ली चढली......? ..हे आपल
मुक्तक आवडल.
मस्त!
दारिद्र्य रेषेखालचं जिवन
तसा नाय वं!!
In reply to दारिद्र्य रेषेखालचं जिवन by अत्रुप्त आत्मा
@मायच्या पोरानं बाटली
In reply to तसा नाय वं!! by पैसा
सुरुवात ते शेवट लाईन जुळायला
हर्षद साहेब , ह्याला म्हणतात कविता जिवाला चटका लावुन गेलि....
धन्यवाद!!
In reply to हर्षद साहेब , ह्याला म्हणतात कविता जिवाला चटका लावुन गेलि.... by निश
आईची आठवण आली... कविता हळवं
नि:शब्द !
मनापसुन धन्यवाद..
आता परत दुसरी कविता पण करणार
In reply to मनापसुन धन्यवाद.. by हर्षद आनंदी
इतकं घबरायला काय झालं?
In reply to आता परत दुसरी कविता पण करणार by पक पक पक
आवडली कविता