स्वप्नांस शाप आहे............!
रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा
स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा
गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या
झाला सराव आता, अंधार साहण्याचा
या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा
चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा
नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी
आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा
गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे
श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा
देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा
लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा
संध्या
क्लासऽ ! जमून गेलं.
सुंदर.
मस्तच कविता!
मनाला स्पर्शून गेल्या
खतरनाक
अतिशय मस्त जमून आले
एक नंबर !!! देहात आग आहे,
"खेळ सावल्यांचा" ह्या
अचुक गवि साहेब
धन्यवाद गवि भाऊ
आशय संपन्न मनस्वी काव्य... --^--
छान कविता
काय जमून आलं आहे ?
काय जमून आलं आहे ? ब्वॉर्र!
यशवंत राव मी " बाळ " नाही !
२०१३ ला ६० पुरी होणार ! ओक्के
हिरवा मनस्वी आजोबा !
हिरवा मनस्वी आजोबा !
फसलीच तान आहे , देउ कसा मी
बरोबर आहे !
"शांता शेळके यानी लिहिले ले
त्यासाठी तर
वल्ली साहेब ह्यावर मार्गदर्शन
तरी ही कवि कल्पना अतीच झाली.
असं पहा !
खरडवहीत प्रतिसाद दिला आहे तो
काका.. कवीता समजुन देण्याचे
ग्रिप चुकू नय म्हणून
- एक प्रपोजल -
ही फुलत जाणारी इनिग्ज असते म्हाराजा !
आपल्या सर्वांचे मनापासून आभार
रदीफ नाही वापरलेला यात
ओक्के !
छान
छान
कवितेंची सरिता
तुम्ही मात्र नका लिहू हो
छान आहे
आभार सर्वांचे अमित ...
मस्त लिहिले आहे ..
गनेशा देअर यू आर !
शेरांमधे एक मध्यवर्ती थीम
तिजला
किंवा मग
-
गंधाळल्या मिठीचा, हा श्वास
@ चौकट राजा .. धन्यवाद.. पण
गणेशा खूप छान समजावल्यात ओळि
माझी जो नाव डुबोये
हात्तीच्या मारी!
Pagination