होळी येतेय.. सगळ्यांनी मस्त पैकी रंगात रंगून मजा करायचा हा दिवस.. "होळी रे होळी, पुरणाची पोळी.." म्हणत मस्तपैकी पुरणपोळ्या रिचवायचा दिवस.. होळीच्या दिवशी पत्ते खेळणे, लिटल-लिटल घेणे आणि भांग पिणे हेही चालतं. आमच्या लहानपणी आम्ही वार्निश वगैरे पण माखायचो एकमेकांना, आणि मग आई आमच्या अंगाला कपडे धुवायच्या साबणाने घासून, गरम पाण्याने अंघोळ करायला लावायची. (आमच्या "शिशू की कोमल त्वचा"चं कुणाला काय पडलीच नव्हती.. :-))
तर मोठे झाल्यावर आम्हाला भांग (?) पण प्यायला मिळायची होळीच्या वेळी.. त्याचाच हा अनुभव..
मी कॉलेजला फर्स्ट इयरला असतांना दादाचा ग्रुप आमच्या गावी होळी साजरी करायला आला होता. आणि खास त्यांच्यासाठी म्हणून दादाने नागपुरला कुठल्यातरी पानठेलावाल्याकडून "असली माल" टायपातली भांग जुगाडली. तिला पाट्यावर चांगली घोटून रात्रभर मुरण्यासाठी म्हणून ठेऊन दिल्या गेलं.
दुसर्या दिवशी दादाचा ग्रुप आला आणि मग त्यांना भांग सर्व्ह करण्यात आली. दादाचा एक मित्र मला आग्रह करुन "अरे, ले ना यार.. कुछ नहीं होता!" म्हणत चढवत होता. आता, त्याआधी २-३ वर्षं आमचा काका आम्हाला "अस्सल, कडक भांग आहे. जास्त पिऊ नको, चढेल.." म्हणून नुस्ती ठंडाई पाजायचा. दोन -तीन ग्लास पिऊनही काय होणार त्याने? म्हणून मग मी पण "अरे, घेतली आहे आपण.. आरामात पचवतो येवढी तर !" म्हणून ३-४ ग्लास भांग रीचवली.. मस्तपैकी भांग प्यायची, आणि होळी खेळत संदलच्या तालावर धांगडधिंगा करायचा हे सुरु होतं..
भरपुर नाचून झाल्यावर हळूहळू भांग भिणायला लागली.. घरात आलो, तर पप्पा आणि काकांचं "लिटल लिटल" सुरु होतं. मी आईला म्हणालो, "आई, काय हे? कितीवेळचे पिताहेत?" (मला तेव्हा "ड्रिकींग एटीकेट्स"ची काहीच माहिती नव्हती.) आईने माझ्याकडे "चढलीय मुडद्या तुला" ह्या नजरेने पाहीले. मी गप बसलो. पण पुन्हा पाचेक मिनिटांनी "श्या !! इअत्की नाही प्यायची.." म्हणून सरळ पप्पा आणि काकांच्या समोरची बाटली उचलून घेतली !! शप्पथ सांगतो, फक्त भांगेच्या नशेत एवढी हिम्मत झाली माझी.. नायतर, बापासमोर फाटायची आपली..
झालं. तिथून आंघोळीला गेलो, आणि आंघोळ करतांना पायांची जाणीवच हरवली.. पार पाय नाहीतच गुढघ्यातून असं वाटायला लागलं. माझी टरकली. मी भराभर आंघोळ आटपून, कपडे घालून गप खोलीत जाऊन पडलो..
थोड्या वेळानी उठून बघतो, तर सगळी दुनिया गरागरा फिरत होती.. ओसरीत पाहीलं, तर दादाचा अख्खा ग्रुप रंगून, कमी जास्त तारेत ओसरीत बसला होता. (ज्याने मला आग्रहाने पाजली त्याला तर गाडीत घालून नागपुरला न्यावं लागलं.) मी एका बेडवरुन उठून दुसर्या बेडवर पडायचो. पुन्हा उठलो, की ओसरीत पहायचं आणि पुन्हा दुसर्या बेडवर पडायचो. असा हा माझा ह्या बेडवरुन त्या बेडवरचा "पलंग छोड" कार्यक्रम, कितीवेळ सुरु होता कोण जाणे..
बर्याच वेळाने मला भूक लागल्यावर दोन तीन पुरणपोळ्या चापल्या. (गोडाने भांग आणखी चढते, असं म्हणतात..) ह्यादरम्यान, दादाच्या ग्रुपने आणि काका मावशींना मी कधी निरोप दिला तेही बरोबर आठवत नाही (किंवा हलतं-हलतं आठवतं.) आणि जी झोप काढली ती पार दुसर्या दिवशी दुपारी उठलो..
होळीनंतर दोन दिवसांनी परीक्षा होती. नागपुर युनिव्हर्सिटीला सायन्सवाल्यांना पहील्या वर्षी दोन "लँग्वेज पेपर" असायचे. त्यातल्या सप्लिमेंटरी इंग्लिशचा पेपर होता.. भांगेच्या नशेत मी सिलॅबसपेक्षा दुप्पट अभ्यास करुन मी पेपरला गेलो. (सिलॅबसमध्ये पाच-सहाच धडे होते. मी पुर्ण पुस्तक वाचून गेलो होतो.) "फ्लॉरेन्स नाईटिंगेल" वरचा धडा ह्या नशेत वाचल्याचं पक्कं आठवतंय.. पेपर झाल्यावर पहीलं काम कुठलं केलं असेल तर ते म्हणजे मित्राकडून पुढच्या (इंग्लिशच्या)पेपरचा सिलॅबस माहीत करुन घेतला.. बिना-नशेचा एवढा अभ्यास करायची हिम्मत नव्हती आपली.. ;-)
वाचन संख्या
5789
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>> "श्या !! इअत्की नाही
मस्त किस्से
In reply to >>>> "श्या !! इअत्की नाही by यकु
खपलो
अशा खूप गोष्टी ऐकून भांग या
+१
In reply to अशा खूप गोष्टी ऐकून भांग या by गवि
मस्त किस्सा चिगो. आता
:)
In reply to मस्त किस्सा चिगो. आता by प्रचेतस
झकास किस्सा..
भांग हे प्रकरण असं आहे त्याचा
शुभेच्छा
खुप काय काय किस्से ऐकलेत
केसाला पाडायच्या भांगाशिवाय
"भांग"
मस्त!
ही ही ही .. मी घेतली होती
लईच बेक्कार हा प्रकार,
होळीची सुरुवात
आमच्या कॉलेजात उत्तर भारतीय
:( ;(
भांगेबद्दल वर अनेक सदस्यांनी
बाकी विवेचन उत्तम खालील दोन
>>>काहीसा असहमत. भांग न घेता
- जय महाकाल -
In reply to >>>काहीसा असहमत. भांग न घेता by यकु
हॅहॅहॅ
In reply to - जय महाकाल - by वपाडाव
ध्यानामुळे खरोखर मेंदुत बदल
In reply to >>>काहीसा असहमत. भांग न घेता by यकु
हा एकिव किस्सा आहे, असाच
धन्यवाद सगळ्यांचे...