Skip to main content

माझी सुंदर आई

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 26/07/2008 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. संगीतकार---सी. रामचंद्र) नसे देखिले त्या देवा जरी त्या देखण्या काय जरूरी अगे,आई कमलमुखी तू सुंदर असता रूप तयाचे कसे वेगळे कुठले मानव कुठले देव फुलती सर्व तुझ्याच पदरी दुनेयेत ह्या स्वर्ग असे पायतळी तो तुझ्याच वसे भरती ममतेने नयन जिचे मुर्ती देखण्या काय जरूरी अगे,आई कमलमुखी तू सुंदर असता रूप तयाचे कसे वेगळे कधी दुःखाचे ऊन असे कधी नैराशाचा मेघ बरसे हे कमलहस्त तुझ्या दुवांचे सर्सावती मम माथ्या वरती अगे,आई कमलमुखी तू सुंदर असता रूप तयाचे कसे वेगळे तूं असता असो अंधार जरी सूर्यनारायणाची काय जरूरी अगे,आई कमलमुखी तू सुंदर असता रूप तयाचे कसे वेगळे तुझ्या स्तुतीसुमनांच्या शब्दापुढे कुठलाही शब्द थोर नसे देवा जवळी असो सर्व माया तुझ्या ममतेला मोल नसे अगे,आई कमलमुखी तू सुंदर असता रूप तयाचे कसे वेगळे जवळी दुनियेतली दौलत जरी तू असता आम्हा काय जरूरी अगे,आई कमलमुखी तू सुंदर असता रूप तयाचे कसे वेगळे श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:

वाचने 2216
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया