Skip to main content

कृपाशंकर सिंह यांच्या पुस्तकाला शीर्षक सुचवा

लेखक सू डोकू यांनी सोमवार, 05/03/2012 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
कृपाशंकर सिंह यांना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केल्याचा साक्षात्कार नुकताच झाला असून, या आपल्या जीवनातल्या वाटचालीविषयी त्यांनी एक पुस्तक लिहण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सतरंज्या उचलण्यात राजकारणांत आयुष्य घालविणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच, आयुष्यभर लोकलच्या हँडलला लटकून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना जे आजपर्यंत कधी जमले नाही ते कृपाशंकर सिंह यांना कसे शक्य झाले याचे रहस्य या पुस्तकातून उलगडले जाणार आहे. ही बातमी आम्हाला कळताच आम्ही त्यांच्या पुस्तक प्रकाशनाचे हक्क त्वरित मिळविले आहेत. पण ते हक्क देतानाच कृपाशंकर सिंह यांनी "ते पुस्तकला काय नाव द्यायचा ते तुमीच बगा" असे सांगितल्यामुळे आता आम्ही या पुस्तकाच्या शीर्षकाच्या शोधात आहोत. आमच्या मनात काही नांवे आहेत ती याप्रमाणे, 'तरंगा'तून तुरुंगाकडे सोनिया कृपा यूपी ते दिल्ली व्हाया महाराष्ट्र याकरिता आम्ही या पुस्तकाला शीर्षक सुचवा ही स्पर्धा येथे आयोजित केली आहे, ज्यांचे शीर्षक या पुस्तकांसाठी निवडले जाईल, त्या विजेत्यास या पुस्तकाची एक प्रत भेट म्हणून देण्यात येईल.

वाचने 4000
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्षमस्व महात्मन! काही आगळिक, प्रमाद माझ्याकडून अजाणतेपणी घडला असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी!

In reply to by सू डोकू

झोंबतय का हो फार ? आम्ही सांगितलेले नाव फारच मनाला लागलेले दिसतेय बॉ तुमच्या. ;) असो... पुढील चर्चा खवत करू.

In reply to by परिकथेतील राजकुमार

झोंबले नाही ब्वा तुम्ही जसे नाव सुचविले, तसेच आम्हालाही सुचले इतकेच.

कुटुंब रंगलंय काळ्या पैशात. बाप नंबरी बेटा दस नंबरी

अनेक शीर्षके असु शकतील कारण कृपाशंकर यांच्या लीला अगाध आहेत. त्यामुळे विश्वकोशा सारखे अनेक भाग बनू शकतील. मला भावलेली काही (भाग - अ ते आ साठी): १ कमरेवरचे डोईवर २ हिमनगाची काहीच टोके (वर आलेली) ३ विषवल्ली आम्हा सोयरे ४ सोनियांची कृपा