Skip to main content

७.४७ ची कर्जत ट्रेन

लेखक रेशा यांनी रविवार, 04/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
"आज पण लेट का ग ट्रेन?" "अरे देवा म्हणजे परत घरी जायला उशीर आणि सगळाच गोंधळ ग!!" , "रेल्वे म्हणजे ना काही सिस्टिमच नाही", "अगदी वैताग आहे, "अरे ४ दिन भी ट्रेन time से आई ना, तो वो central railway ही नही" ... C. S .T .स्टेशन वरची ती एक संध्याकाळ असते .. थोडक्यात दिवस नॉर्मल असतो, central railway च्या trains पुन्हा एकदा काही अपरीहार्य, घोषित अथवा अघोषित कारणामुळे उशिराने धावत असतात ...... या सगळ्या गोंधळात "ती" ही अशीच सामान्य स्त्री सारखी गाडीची वाट पाहणारी, घारीसारखे पिल्लांकडे डोळे लावणारी, रोज तीळ तीळ खपणारी, स्वतःचे पोट मारणारी पण पिल्लांना खाऊ मात्र न विसरता नेणारी ,,, साडीचा पदर खोचून purse छातीशी कवटाळून "आक्रमाण" ( :D :D ) च्या तयारीत उभी असलेली,... तेव्हाध्यातच ट्रेन येते ... अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळाच फक्त दिसलेला महाभारतात, तसेच तिलाही train चे doorच फक्त दिसत असते, सगळ्यांना ढकलून, स्वतः धक्के खाऊन ती एकदाची आत जाते आणि 2nd right window मिळाली म्हटल्यावर जग जिंकल्या सारखी खुश होते. मग कोणी 4th seat साठी भांडत असते, तर कोणी स्वतःच्या group बरोबर मस्त गप्पा ठोकत असते, सुख-दुःख share करत असते, तर कोणी मिळालेला वेळ मस्त एन्जोय करत असते, रुमालापासून ते अगदी ड्रेस मटेरियल पर्यंत आणि शेंगदाण्यां पासून ते खाकरे, सामोसे पर्यंत काहीतरी विकणारे विक्रेते ओरडत असतात .... ती हे सगळे सरावाने बघत असते आणि त्यात गजबजाटात झोपायचा प्रयत्न ही करते, सकाळपासून दमल्याने कधी कधी तिचा डोळाही लागतो, आजही डोळ्यावर झापड येत असते; तोच तिला पुसटसा हुंदका ऐकू येतो,.. आणि ती जागी होते बघते तर काय निलीमा काकू आणि त्यांचा ग्रुप शांत शांत आणि काकू डोळ्याला मध्येच पदर लावतायत ,,, हे बघून तिची झोप पार उडून जाते ,,, आणि जरा आजू बाजूला चौकशी केल्यावर कळते की निलिमा काकू रीटायर होतायत ह्या महिन्याच्या ३० तारखेला... अरे म्हणजे परवाच की... ऐकून तिलाही जरा आत कुठेतरी वाईट वाटते ,,, मग त्या ग्रुपच्या आज शांत शांत असण्याचे कारण कळते ,,. ती जराशीच पण खिन्न होते,,,,, तिला आठवते तिची आणि निलीमा काकूंची पहिली भेट.. नेहमीप्रमाणे ट्रेन मध्ये jump करताना सुटलेला तिचा हात.. तिच्या हातावर पाय देऊन चढलेल्या त्या मुली... मग तिला झालेली जखम,,, आणि गाडीखाली जाता-जाता अचानक तिच्या हाताला मजबूत बसलेली पकड,,,, 'जीवन दानच' म्हणा ना... हो निलीमा काकूच ती!!! ,, स्वतःच्या स्पोन्डेलीसीस चा विचार न करता त्यांनी तिला, दुखऱ्या हातानेही घट्ट पकडून ठेवले,, बिथरलेल्या "ती" ला पाणी दिले, ती जरा शांत झाल्यावर तिला आईच्या मायेने यथेच्छ ओरडून, "काही अक्कल आहे का तुला?? काही झाले मग? मुलांचे काय होईल ह्याचा तरी विचार करत जा जरा!", असे म्हणून त्या चक्क रडल्या,,, तशी तिची नि त्यांची काही खास ओळख नव्हती नाही म्हणायला ७.४७ pm च्या S (कर्जत) ट्रेन ला त्या दोघी डोंबिवली पर्यंत एकत्र असायच्या... त्यातही फक्त smile exchange पुरतीच काय ती ओळख. पण ती बघायची त्यांच्या group मधली त्यांची जागा, त्यांचे प्रेम, त्यांच्याबद्दल तिच्या मनात एक आदर होता आणि तो दुणावलेला, जेव्हा तिचा सुटलेला हात त्यांनी सावरला, तिच्या डोळ्यात सहज पाणी आले, ते पाणी "त्या दिवशी" त्या नसत्या तर काय झाले असते? म्हणून होते, की त्या उद्यापासून train मध्ये नसणारेत यामुळे जास्त होते? हे तिलाही आता सांगता नाही येणार. आणि.. तिच्या मनात सहजच एक विचार आला, खरच आपल्याला एखाद्या गोष्टीची व्यक्तीची किती सवय होते ना?? ज्या गाडीच्या लेट होण्याला आणि प्रवासाला आपण त्रासून कटकट करून सामोरे जातो, त्याची पण सवय होऊन जाते. रुळावरून धावणाऱ्या त्या ट्रेन च्याही पेक्षा जास्त वेगात तिचे विचार धावत होते, खरंच निलीमा काकू काय करणार उद्यापासून? घरात कोंडल्यासारखे तर नाही ना वाटणार त्यांना? फक्त ४ दिवस गावाला गेले आणि ट्रेन पासून लांब असलो आपण तरी चुकल्या चुकल्या सारखे होते. आणि ..ऑफिस rejoin केल्यावर आणि सकाळ संध्याकाळ त्या ट्रेन चे दर्शन घेतल्यावर आपले life च जणू रुळावर आल्यासारखे वाटते. दिवसाचे ३- ४ तास तर प्रवासातच मोडतात. किती लोक भेटतात, खुप काही शिकवून जातात, कधी कधी आपल्यालाच आपण पुन्हा नव्याने भेटतो, तर कधी कोणामध्ये स्वतःला पाहत असतो नकळतपणे, काहींशी ऋणानुबंध जुळतात तर काहीवर दिवसभराचे frustration निघते ... आणि कधी एखादी घटना खूप हसवून जाते तर कधी एखादा साधी क्लीप विकणारा आपल्याला फसवून जातो .. आणि तसेही ,,," "three Cheers for निलीमा aunty " yeeeee ... "ओये दिदी, केक लो ना aunty की send -off party हे आज, ध्यान किधर है आपका?" ह्या sweety च्या वाक्याने "ती" भानावर येते, तिच्या चौफेर उधलेल्या विचारांना जरा लगाम घालते आणि black forest वर मस्त ताव मारते. निलीमा काकुना सगळ्या मिळून मस्तपैकी एक group फोटो gift करतात will miss u असे सांगतात आणि सगळ्या मिळून त्यांना bye bye करतात, त्यांच्या नवीन life साठी शुभेच्छा देतात आणि ती काकूंच्या मागूनच train मधून उतरते,.. आणि दोघीही एकमेकींकडे पाठ करून आपलाल्या घराचा रस्ता धरतात. आज 2 तारीख .. नवीन दिवस (काकूंच्या retirement नंतरचा पहिलाच working day उजाडतो.. ती तिथेच तशीच "आक्रमणाच्या" तयारीत उभी असते, धडपडत आत शिरून जागा पकडते, बाजूच्या group मध्ये सगळे चेहेरे तेच असतात पण आजपण wrong window रीकामी ठेवलेली असते, निलीमा काकूंसाठी ,,, मग कोणीतरी म्हणते "अरे आता त्या नाही ना येणार, बस ग चिंगे, कोणीतरी दुसरे येऊन बसायच्या आत "शिफ्ट"' व्हा "... त्या window seat वर, आज काकू नसतात. पण त्यांच्या जागेवर कोणीतरी 'shift ' झालेलेच असते ,,,, ते पाहून तिला उगाच हसू येते, अजून एक धडा शिकते ना ती, ७.४७ च्या कर्जत ट्रेन मध्ये, "आयुष्य कधी कोणासाठीच थांबत नाही, जागा बदलतात, चेहेरे बदलतात पण नवीन सूर्य, नवा दिवस प्रत्येच आधीच्या दिवसाला "काल" बनवत असतो आणि कोणासाठी काहीच थांबत नसते, बाकीच्यांसाठी सगळं काही तेच असतं; फक्त.. फक्त एक चेहेरा कमी झालेला असतो त्या दृश्यातून ..... sweety च्या भाषेत सांगायचे तर life goes on ... live your life to its fullest ...Smile :) :) cheers and move on .. ... रेघोटी
लेखनविषय:

वाचने 5377
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ। समेत्य च व्यपेयातां तद्वद् भूतसमागमः॥ लिखाण आवडलं. पुलेशु

आयुष्य कधी कोणासाठीच थांबत नाही, जागा बदलतात, चेहेरे बदलतात पण नवीन सूर्य, नवा दिवस प्रत्येच आधीच्या दिवसाला "काल" बनवत असतो आणि कोणासाठी काहीच थांबत नसते, बाकीच्यांसाठी सगळं काही तेच असतं; फक्त.. फक्त एक चेहेरा कमी झालेला असतो त्या दृश्यातून ..... sweety च्या भाषेत सांगायचे तर life goes on ... :) आयुष्याचं सालं हे असंच असतं....! -दिलीप बिरुटे

>>आयुष्य कधी कोणासाठीच थांबत नाही, जागा बदलतात, चेहेरे बदलतात पण नवीन सूर्य, नवा दिवस प्रत्येच आधीच्या दिवसाला "काल" बनवत असतो आणि कोणासाठी काहीच थांबत नसते, बाकीच्यांसाठी सगळं काही तेच असतं; फक्त.. फक्त एक चेहेरा कमी झालेला असतो त्या दृश्यातून ..... sweety च्या भाषेत सांगायचे तर life goes on ... आतापर्यंतच्या प्रवासात सोबतीला असलेल्या-नसलेल्या सगळ्यांचेच चेहरे भराभर डोळ्यासमोर येऊन गेले.

In reply to by सूड

आतापर्यंतच्या प्रवासात सोबतीला असलेल्या-नसलेल्या सगळ्यांचेच चेहरे भराभर डोळ्यासमोर येऊन गेले.
७:३२ ची विरार - चर्चगेट लोकल आणि त्यातले सहप्रवासी ह्यांची प्रकर्षाने आठवण झाली. - (१५ वर्ष मुंबई लोकलने प्रवास केलेला) सोकाजी

रेशा.. ..लेख छान लिहिलास..मला माझे ते जुने दिवस आठवले, गाडीतले मित्र त्यान्च्याबरोबरच्या गप्पा टप्पा, खाणे..वगैरे, त्या जुन्या दिवसान्ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. विनोद१८

"आयुष्य कधी कोणासाठीच थांबत नाही, जागा बदलतात, चेहेरे बदलतात पण नवीन सूर्य, नवा दिवस प्रत्येच आधीच्या दिवसाला "काल" बनवत असतो आणि कोणासाठी काहीच थांबत नसते, बाकीच्यांसाठी सगळं काही तेच असतं; फक्त.. फक्त एक चेहेरा कमी झालेला असतो त्या दृश्यातून ..... sweety च्या भाषेत सांगायचे तर life goes on ..." सुंदर ओळी!

मस्त लिहिलंय, या अशा अनुभवांसाठी कधीतरी मायमुंबईत काम करायची इच्छा आहे. बघुया कधी पुर्ण होते ते.

तिच्या चौफेर उधलेल्या (उधळलेल्या) विचारांना जरा लगाम घालते आणि black forest वर मस्त ताव मारते. घटनेचे गांभिर्य पाहता, त्यातून व्यक्त होणार्‍या भावनेच्या विपरीत वरील वाक्य आहे. ब्लॅक फॉरेस्ट म्हंटल्यावर डोळे पुसणार्‍या काकूंच्या दु:खाचा विसर पडून केकवर ताव मारण्याची कृती कुठेतरी खटकली. त्या पेक्षा 'तिच्या चौफेर उधळलेल्या विचारांना जरा लगाम घालते. ब्लॅक फॉरेस्ट तिच्या कितीही आवडीचा असला तरी आज तो फारच अगोड लागला.' असे वाक्य असते तर प्रसंगाला अनुरुप ठरले असते. असो. मुळात, प्रदीर्घ कालावधीच्या सहवासाने सहप्रवाशांच्या सुखदु:खात आपण एकरूप झालेलो असतो. त्यांचा वियोग हा एक आघातच असतो पण त्याच बरोबर जिवन रहाटगाडग्यात कोणी कोणासाठी थांबून राहू शकत नाही, एका मर्यादे पलीकडे गुंतुन पडत नाही हे वैश्विक सत्य वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. निलीमाकाकूंशी जुळलेले भावनिक नाते जास्त तपशिलात आले असते तर लेख अजून प्रभावी झाला असता. लेखिकेच्या भावनांची तिव्रता वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असती असे वाटते. तसेच, खालील शब्द वगळता आले असते तर जास्त बरे वाटले असते. लेट, ट्रेन, सिस्टिमच, time, central railway, C. S .T ., स्टेशन, नॉर्मल, central railway, trains, purse, :D, ट्रेन, train, door, 2nd right window, 4th seat, group, share, एन्जोय, ड्रेस मटेरियल, रीटायर, ग्रुपच्या, ट्रेन, jump, pm, S, ट्रेन, smile exchange, group, train, लेट, ट्रेन, ट्रेन, rejoin, ट्रेन, life, frustration, क्लीप, , three Cheers for aunty yeeeee aunty send -off party, sweety, black forest, group, gift, will miss u, bye bye, life, train, retirement, working day, group, wrong window,शिफ्ट, window seat, shift, ट्रेन, sweety, life goes on ... live your life to its fullest ...Smile :) cheers and move on ..

In reply to by प्रभाकर पेठकर

काकूंच्या दु:खाबद्दल चकार शब्दही लिहिलेला नसताना तुम्हालाच कुठुन दिसले? काकू निवृत्त होत आहेत म्हणून दु:खी ती मुलगी आहे. त्या निवृत्त होणार या बातमीने उठलेली मनातील काहूरे बाजूला करुन केकवर ताव मारण्यात चूक काय बरे? बाकी रेड कलर्ड शब्दांच्या बाबतीत सहमत ;)

In reply to by अन्या दातार

काकूंच्या दु:खाबद्दल चकार शब्दही लिहिलेला नसताना तुम्हालाच कुठुन दिसले? काकू डोळ्याला मध्येच पदर लावतायत ,,, हे बघून तिची झोप पार उडून जाते ह्या वाक्यावरून मला वाटले काकू दु:खाने येणारे अश्रू पुसण्या/लपविण्यासाठी डोळ्याला पदर लावित होत्या. त्या 'आनंदाश्रू' लपविण्यासाठी किंवा डोळ्यात काही कचरा गेला असेल म्हणून डोळ्यांना पदर लावित असतील हे माझ्या लक्षातच नाही आले. माझे वाक्य मी क्षमा मागुन परत घेतो. मनातील काहूरे बाजूला करुन केकवर ताव मारण्यात चूक काय बरे? मुळात काकू दु:खी आहेत असा गोड गैरसमज मी करून घेतल्याने, लेखिका त्यांच्या दु:खात सहभागी आहे असा माझा दुसरा गोड गैरसमज झाला. सगळंच चुकत गेलं. मला वाटलं काकू रडताहेत आणि आपण केकवर ताव मारतोय जरा विसंगत होत आहे. सध्या तशी पद्धत असेल तर माहित नाही. प्रसंगाला आलेले दु:खद गांभिर्य (जे मला चुकून जाणवले होते) जर निलीमा काकूंनी २-४ डायलॉगने हलके-फुलके केले असते तर मग हसत हसत सर्वांनी केकेवर ताव मारणे समजू शकले असते. असो. मुळात लेख समजण्यातच माझी चुक झाली आहे तेंव्हा हे सर्व स्पष्टीकरणही हास्यास्पद होऊ शकतं. आपल्या 'रेड कलर्ड' शब्दांच्या सहमती बद्दल धन्यवाद. ('ती आजकालची बोली भाषा आहे.' असे म्हणून कोणी असहमतीही दर्शवेल. त्यामुळे तुमच्या सहमतीला, माझ्या मनात, विशेष महत्त्व आहे.)

In reply to by प्रभाकर पेठकर

'तिच्या चौफेर उधळलेल्या विचारांना जरा लगाम घालते. ब्लॅक फॉरेस्ट तिच्या कितीही आवडीचा असला तरी आज तो फारच अगोड लागला.' हे अगदीच टिपिकल साचेबद्ध आणि अपेक्षीत झालं असतं. केक वर ताव मारणे हे जास्त संयुक्तीक वाटतं आणि अशा परिस्थितीत तसंच होतं. आम्हीही अनेकांना सेंड ऑफ दिले आहेत आणि काही वेळा घेतलेही आहेत. जे आहे ते व्यवस्थीत आहे.

In reply to by आदिजोशी

आम्हीही अनेकांना सेंड ऑफ दिले आहेत आणि काही वेळा घेतलेही आहेत. खरं आहे तुमचं म्हणणं. काळ बदलतो. त्यातून सेंड ऑफ देण्याघेण्याचा काडीमात्र अनुभव नसताना मी असा प्रतिसाद द्यायला नको होता. क्षमा मागतो.

In reply to by वपाडाव

आंदो और आंदो...
सहमत लेकीन उसको थोडा थोडा वेळ के बाद प्रकाशित करो उरलेले लेखक को भी जागा रखो. (मुंबईकर काकूंच हिंदी आवडणारा)

In reply to by मी-सौरभ

बरोबर हय. जिलबीसारखा लॉट मे मत पाडो. थोडा थोडा वाढो लोणचेसारखा. यहा पे खार खाना सबको आवडता हय.

In reply to by सूड

यहा पे खार खाना सबको आवडता हय.
:-o यहाँपे कौन किस्के उप्पर 'खार खा रैला' हय? मेरेकु मालूमीच नै पड्या..... ;-)

लोकल मधला हा जागा 'रि-कामी' होण्याचा भावपूर्ण किस्सा अवडला...या निमित्तानी मला वाचतानाच अ वेन्सडे मधिल नसुरुद्दीन शहाचा अनुपम खेर सोबत असलेला पूर्ण डायलॉग/प्रसंग/कथन अठवले,,,''बॉम्बस्फोट होण्यापूर्वी त्या डब्यात भेटणारे रोजचे सर्व साथीदार-आणी नेमकी त्याच दिवशी न.शहाची ती ट्रेन चुकल्यामुळे दुसर्‍या दिवसापासुन त्यांच्यात मागे राहिलेला तो एकटाच,,,ही अवस्था...! न.शहाला हसुन अपली एंगेजमेंट रिंग दाखवणारा तो एक युवक-आणी आज त्याची दरवाजात मोकळी असलेली ''जागा''... या प्रसंगाचं हृदयस्पर्शी कथन सिनेमात ऐकताना मनावर जो काटा उभा राहिला होता,तसेच काहिसे हा लेख वाचताना झाले.. :-(

मस्त लिखाण... असे अनेक अनुभव घेतले आहेत. तसेच पेठकर काका म्हणाले, तसे ते शब्द वगळून मराठीत लिहिले असते तर छान वाटलं असतं. असो. पुलेशु :) :)

वरची उपचर्चासुद्धा वाचली. अशा परिस्थितीत आपण जरासे दु:खी होतो आणि लगेच विसरून कामाला लागतो. कारण जास्त वेळ दु:ख करीत रहाणं अशा वेगवान आयुष्यात परवडत नाही, शिवाय रोजची बघायची सवय यापलीकडे या रोज दिसणार्‍या व्यक्तींमधे आपली फार गुंतवणूकही नसते. इंग्रजी शब्द मात्र खटकतील इतके जास्त आले आहेत. ज्या शब्दांना पर्याय नाही असे इंग्रजी शब्द वापरणं अपरिहार्य असतं पण या लेखातल्या बहुतेक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द जरा विचार केला तर नक्कीच आठवतील!

पन......आपली ......७.४७ ची कर्जत ट्रेन? इथेच नाहि तर ! प्रत्यक्ष जिवनात देखिल आसे घडत आसते !

लेख भावला ह्यात मुंबईकरांचे जीवनशैलीचे उत्कृष्ट वर्णन केले आहे. अगदी पु ल म्हणतात तसे " मुंबईकराच्या आयुष्यात भूतकाळाला स्थान नसते". पण मी अर्धा मुंबईकर असल्याने . कॉलेज दिवसात व अजूनही सुट्टीत भारत वारीवर आल्यावर मुंबईतून लोकल ने प्रवास करणाच्या योग येतो. आमच्या पालकांनी २५ वर्ष डोंबिवली ते सी एस टी प्रवास केला. त्या आठवणींना उजाळा देणारी ही प्रतिक्रिया गेली काही काही वर्ष खिशाला दरवर्षी भाववाढीचा भुर्दंड न बसलेला व लोकल च्या वेळापत्रकाशी सुत जमवलेला मुंबईकर त्या गर्दीच्या डब्यात रोजच्या आयुष्यातील २ ते ३ तास घालवतो. त्यातही विरंगुळा म्हणून पुरुषमंडळी भजनी मंडळे चालवतात. मोठ्यामोठ्याने कर्कश आवाजात( त्यांच्या नुसार चालीत भजने म्हणतात.) मुलुंड स्टेशनात गाडी शिरताना गणरायाचा जयघोष करतात. त्यातून डब्यातील काही मिपाकर नेहमीच्या प्रवासात खिडकीतून दिसणार्या निसर्गाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहात त्यावर मिपावरसुरेख लेख लिहितात. बायका डब्यात हळदी कुंकू त्यात वाणे वाटणे किंवा एखाद्या व्रताचे उद्यापन साजरे करतात. सखी चे वाढदिवस साजरे करतात. सिनेमा ,डेली सोप ,मुलांचे मार्क त्यांच्या भविष्यावर परिसंवाद मांडतात. पुरुष मंडळी क्रिकेट आणी राजकारणावर चर्चा अगदी महाचर्चा झोडतात. ह्यात कितीतरी वेळा एखाद्या नेत्याच्या उल्लेख कोड शब्दात करतात. उगाच त्याच्या समर्थकांच्या भावना दुखावुन राडा होऊ नये हा त्यामागील हेतू असतो.तरी जागेवरून किंवा दरवाजावर लोंबकळून हवा खाण्यासाठी समूहाने राडे घालतात. पण ह्या बाबतीत बायका पुरुषांना मागे टाकतात. घरचा आणी नोकरीचा दुहेरी व्याप सहन करणार्या ह्या महिला जरा ठिणगी पेटली की महाराडे घालतात. ह्यांच्या डब्यात टिकल्या पासून अनेक गोष्टी विकायला येणारी लहान मुले व त्यांच्याशी घासाघीस करणारा महिला वर्ग डब्यातच मीना बाजार भरवतात. माझ्या तोंडावर अजूनही आलम मुंबईत फक्त रेल्वे च्या डब्यात विकायला येणारा पिवळा व पांढरा ढोकळा व त्या सोबतची हिरवी चटणी व मिरची ची चव रेंगाळत आहे. "शिर्डी वाले साई बाबा किंवा परदेसी परदेसी जाना नही" ही हमखास गाणी आपल्या ठराविक अवीट गोड चालीत गाणारे इंडियन आयडियल किंवा छोटे उस्ताद हे तर डब्यात ओर्केस्टा जमवतात. माझ्या सारखे दादर ला फास्ट ट्रेन ला एका दरवाजातून चढणारे सर्व प्रवाशांची कोंडी मोडत कुर्ल्याला दुसर्या दरवाजातून उतरतात तेव्हा हमखास सहप्रवाश्यांच्या शिव्या खातात. " एका स्टोप के लिये कायको फास्ट ट्रेन मे चढते हो. , एक नंबर पे स्लो ट्रेन मे क्यो नही जाते." पण माझ्यासारखे नतद्रष्ट "क्या करे ओ गाईज, हम हे आदत से मजबूर" ह्या रिकी बेहेला च्या घोषवाक्या प्रमाणे परत पुढचे पाढे पंच्चावन करायला मोकळे असतात. आजही मुंबईत आलो की शक्यतो ट्रेन ने प्रवास करतो. कारण सर्व गुण दोषासकट एक गोष्ट नक्की कि लोकल एवढी जलद व स्वस्त प्रवास सेवेला मुंबईत अजूनही पर्याय नाही. म्हणजे एकेकाळी मुंबईत छोटीसी बात मध्ये विद्या सिंन्हा व अमोल पालेकर हे नोकरीसाठी बस ने चर्चगेट पर्यंत प्रवास करत.( ते ही बसून) किंवा बातो बातो मे मध्ये हाच अमोल टीना सोबत लोकल मधून बसून प्रवास करायचा.( ते ही बसुन ) तो जमाना जुना झाला.पण आजही लोकल मध्ये गर्दीत चढण्यासाठी गाडी फलाटावर आली कि डब्यातून लोक उतरली की सर्वात प्रथम डब्यात चढण्यासाठी नुसते आपण सज्ज व्हायचे की पाठचा गर्दीचा लोंढा आपल्याला सुखुरूप पणे आत ढकलतो. नी तोच डब्याबाहेर ही काढतो. अश्यावेळी वाटते. " ए दिल हे मुश्कील जीना यहा, जरा बचके जरा बचके ये हे मुंबई मेरी जान"
आता जर्मन कंपनीच्या नव्या लोकल मुंबईकरांच्या सेवेस आल्या आहेत. ता.क बाबांच्या सुचने वरून रेल्वे मध्ये प्रायोगिक तत्वावर सिमेन्स च्या नवीन गाड्यामध्ये म. रेल्वेकडून सेकंड क्लास डब्यातही, फर्स्ट क्लासप्रमाणे आरामदायी सीट्स पुरवण्यात येणार आहेत. म्हटलच आहे " सम थिंग इज बेटर देन नथिंग"

कंपनी च्या बसमधून कामाला जाणे , स्वता: च्या टू व्हीलर वरून जाणे , कारमधील पूल, या सार्‍यापेक्षा रेल्वेने लटकून जाणे माणसाचे आयुष्य समृद्ध करते. मी ज्यावेळी पुण्याहून मुंबईकडे जातो त्यावेळी " आज पशा आला नाही कारे.. ? च्यायला कुठे उलथला ? पासून" अरे आण्णा जाम आजारी आहेत रे" अशा गोष्टी ऐकायला मिळतात. मुंबईकर हा पुणेकरा पेक्षा मो़कळा असल्याचे दिसते.

अपेक्षेपेक्षा जास्तीच प्रतिसाद मिळाला .. धन्यवाद :) सुचना आमलात आणण्याचा पुढच्या लेखात नक्कीच प्रयत्न करेन ,... :) :) पेठकर काका आपल म्हणण पटल आणि सुचनांचा नक्कीच विचार करेन :) ब्लाक फोरेस्ट .. च्या प्रसंगाबद्द्ल म्हणाल तर ... मला ताव मरण तितकच सहाजिक वाटत जितक तिचं निलीमा काकूंबद्दलचा प्रसंग आठवून दु:खी होणं खरच रोजच्या अश्या प्रसंगांत गुंतुन पड्ण शक्यच नसतं ,,,, अर्थात हे माझे वैयक्तीक मत झाले,,.. :) इग्रजी शब्दांबद्द्ल ची चुक सुधारायचा पुर्ण प्रयत्न राहील पुढच्या प्रत्येक लेखात :) !!! रेशा