Skip to main content

रस्ता

Published on शुक्रवार, 02/03/2012
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या.. जागेमधूनी, लागती शर्यती पळा पळा हो, कोण पुढे ते, स्वार कसे धावती पल्याड जाण्या, सज्ज होते, पिकलेले एक पान खबरदार, जर जाल पुढे तर, चिरडतील हो छान मातीचा होता, . तेव्हा हा सम़ंजस होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता तिथेच भरते रस्त्याकडेला, चिमण्यांची शाळा भेदरलेल्या नजरा, आणिक वाहनांच्या माळा भयाण वेगे चाकरमानी, उडवितात गाड्या वेगापुढती विवेक बुडे जो , आवरा हो नाड्या वाहनांपेक्षा जीवन जेव्हां स्वस्त होत जाता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता संध्या 01 Feb 2010
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3096
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जे न देखे रवी मध्ये,या कवितेचे लोणी मिळेल...तेंव्हा...तिकडे या.. ;-)

नुसते 'रस्ता' असे नांव देण्यापेक्षा 'सुजाण नागरिकांचा रस्ता' असे नांव जास्त परिणामकारक वाटले असते.