Skip to main content

एक कविता

लेखक राजो
Published on बुधवार, 29/02/2012
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला… Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना 'virus' लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang झालेय PC सारखी मातीची स्थिती वाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही website एकविसाव्या शतकातली पीढी भलतीच 'cute' contact list वाढत गेली संवाद झाले mute computer च्या chip सारखा माणूस मनानं खुजा झालाय अन 'mother' नावाचा board, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय floppy Disk Drive मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही अन फाटली मनं सांधणारा internet वर धागा नाही विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यांनाही आता लागते face book.....!!
लेखनविषय:

वाचन संख्या 1895
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आवडली कविता...... .......................................................................................................................................................... सुनो नन्द''जिधर कभी कोई रास्ता बनाकर ना चला, उस तरफ हि रास्ता बनाकर चलना''

श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी चुकुन "फुलबाग" / "ऊमलत्या कळ्या (?)" छाप काव्यस्पर्धेत भाग घेतला होता कि काय ?ढकलपत्र म्हणून ठिक आहे.ह्या कवितेला पहिला नंबर मिळाला असेल तर क्र.२ आणि ३ / ४ / ५ च्या कविता ही द्याव्या. जरा करमणूक.