Skip to main content

निःशब्द

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 28/02/2012 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ कुणी म्हणाले तिथेच बनती जुळती तुटती रेशीमगाठी मी न पाहिले हात तयाचे तुझ्या किनारी सापडले घर आयुष्याच्या अंक पटावर दिले घेतले हिशेब झाले समर्पणाच्या वाटेवरचे आज पडावे पहिले पाउल उलगडताना ह्रदयाची धून सूर कापरा कातर कातर शब्दांची वीण उसवीत जाती शब्दांवाचून डोळ्यांचे तळ तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1461
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

उलगडताना ह्रदयाची धून सूर कापरा कातर कातर शब्दांची वीण उसवीत जाती शब्दांवाचून डोळ्यांचे तळ
अत्यंत हुच्च!!

आयुष्याच्या अंक पटावर दिले घेतले हिशेब झाले समर्पणाच्या वाटेवरचे आज पडावे पहिले पाउल उलगडताना ह्रदयाची धून सूर कापरा कातर कातर शब्दांची वीण उसवीत जाती शब्दांवाचून डोळ्यांचे तळ> कविता आवडली. करड्या अक्षरातील विशेष आवडले.