✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचा प्रोजेक्ट (उपक्रम).......आमचे आकाशदर्शन

स
स्वातीविशु यांनी
Mon, 02/27/2012 - 16:03  ·  लेख
लेख
आम्ही त्रुतीय वर्षाच्या वर्गात पाऊल ठेवले, अन नेहमी झोपेत असलेले जागे झालो. या वर्षी आम्हाला एक प्रोजेक्ट करुन तो वर्षअखेरीस सादर करणे सक्तीचे होते. (१०० गुण होते त्यासाठी..;)) त्यामुळे एक वेगळाच उत्साह आणि भीती वाटत होती. थोडेसे वैज्ञानिकाचे वारे कानात आणि मनात भरलेले होते. त्यामुळे काहीतरी हटके करायचे असे वाटत होते. झाले....शोधमोहीम सुरु झाली. आमचे एक आवडते गुरुवर्य सतत याबद्द्ल मार्गदर्शन करत होते. आमच्या वा-याची बहुतेक त्यांना कल्पना आली असावी. ते आम्हाला दिशा देण्याचे प्रयत्न करत होते. त्यांच्या सांगण्यावरुन आम्ही जुने प्रोजेक्ट रिपोर्ट चाळले. पण त्यातला कुठलाही उपक्रम रुचला नाही. मात्र त्यांतूनच काही सवंगड्यांनी त्यांचे विषय निवड्ले आणि प्रोजेक्ट्च्या (ढापेगीरीच्या.....;)) मार्गाला लागले. नंतर आम्ही लायब्ररीकडे मोर्चा वळविला. (नाहीतरी तेथेच पडिक असायचो. ;)) तिथे वाचता वाचता हवामानविभागात काम करणा-या एका काकांची अन माझी ओळख झाली. आम्ही राहायचो त्या पलीकड्च्या गल्लीतच ते रहात होते. झाले.....नंतर त्यांच्या घराचे उंबरठे झिजवले व त्यांनी त्यांच्या कार्यालयात बोलाविले. तिकडे १-२ दिवस जाऊन पुस्तके चाळली, एकदोघांना भेटले. पण तिथे आम्हाला वेगळे काही करण्यासारखे वाटले नाही. एव्हाना आमचे सोबती त्यांच्या अभ्यासात व उपक्रमात गुंतले होते. ऑगस्ट उजाडला तरी आमचा उपक्रमाचा विषयच ठरला नव्हता. एक दिवस अचानक आमच्या कॉलेजची माजी विद्यार्थीनी सरांना भेटायला आली. तिची व माझी ओळख झाली. तिला माझ्या प्रोजेक्टबद्द्ल सांगितले तेव्हा तिने एका खगोलशास्त्रातील एका नामवंत संस्थेचे नाव, तिथे जाऊन कोणाला भेटायचे त्यांचे नाव व फोन नं. दिला. अर्थात तिनेही तिच्या उपक्रमाचे तारे तिथेच तोडले होते. वेळ न दवड्ता आम्ही कॉईनबॉक्सवरून त्या सरांना फोन केला आणि त्यांनी मला एकदाचे भेटायला बोलाविले. दुसरीकडे आम्ही हुश्श झालो. मनात कुठेतरी वाटत होते की, इकडे आपले मनासारखे प्रोजेक्ट नक्की मिळेल. येणा-या रविवारी आम्ही त्यांना भेटायला जाणार होतो. प्रोजेक्टसाठी कॉलेज बंक करणे, कोणीही चालू दिले नसते. क्रमशः
  • आमचा प्रोजेक्ट (उपक्रम).......आमचे आकाशदर्शन.......

Book traversal links for आमचा प्रोजेक्ट (उपक्रम).......आमचे आकाशदर्शन

  • आमचा प्रोजेक्ट (उपक्रम).......आमचे आकाशदर्शन....... ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
3491 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

काय हे? ते वरचं तरी कशाला

यकु
Mon, 02/27/2012 - 16:08 नवीन
काय हे? ते वरचं तरी कशाला लिहीलंत. ''क्रमश:'' असा एकच शब्द लिहिला असता तरी चाललं असतं ना..
  • Log in or register to post comments

'क्रमश:'' असा एकच शब्द लिहिला

मोहनराव
Mon, 02/27/2012 - 16:27 नवीन
'क्रमश:'' असा एकच शब्द लिहिला असता तरी चाललं असतं ना..
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सहमत.

धन्या
Mon, 02/27/2012 - 16:44 नवीन
आम्हीही यकु कृष्णमूर्तींनी दिलेले रोखठोक उत्तर वाचून फुटलोच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

श्शी बाब्बा ....यकु अस नाय

पियुशा
Mon, 02/27/2012 - 16:33 नवीन
श्शी बाब्बा ....यकु अस नाय करायच ,अशी नाव नै ठॅवायची ;) लेखिकेला लिहायच आहे ,नविन असेल, नाही तर पहिलाच प्रयत्न असेल तीचा तिला प्रोत्साहन द्या ,म्हणजे ती पुढल्या भागात व्यवस्थित अन विस्तारीत लिहील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

एकदा टिक आहे पण असल हे अर्धवट

गोमटेश पाटिल
Mon, 02/27/2012 - 16:25 नवीन
एकदा टिक आहे पण असल हे अर्धवट ले़ख नहि रुचायचा....
  • Log in or register to post comments

अहो... आमच्याकडे आज विजेची

स्वातीविशु
Mon, 02/27/2012 - 16:36 नवीन
अहो... आमच्याकडे आज विजेची लपाछपी चालू असल्यामुळे सध्या एवढेच लिहू शकले. त्यासाठी सर्वांची माफी मागते. उद्या विज्ञानदिनाच्या निमित्ताने पुढचा भाग पुर्ण करेन. :)
  • Log in or register to post comments

माफि मागन्यासरख काहि नाहि ...

गोमटेश पाटिल
Mon, 02/27/2012 - 16:45 नवीन
माफि मागन्यासरख काहि नाहि ... तुम्हि लिहित रहा अम्हि वाचत राहु.. तुमचा जो प्रोब्लेम आहे ना तोच अमचाहि आहे त्यमुळे असे चान्गले अनुभवि लेख अमच्याकडुन मिस होन्याचि शक्यता असते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीविशु

वाट बघेश...

वपाडाव
Mon, 02/27/2012 - 17:02 नवीन
त्या तोडलेल्या तार्यातुन एकाला ट्युबलाइट बनवुन घरात लावा अन मग पुर्ण करा लेख... मग दिवे लावले तरी म्हणता येइल किमान...
  • Log in or register to post comments

यकु, बडे बुढे कह गये हय की

प्यारे१
Mon, 02/27/2012 - 17:03 नवीन
यकु, बडे बुढे ;) कह गये हय की ऐसे नये लेखकोंको हतोत्साह न करके उनका उत्साह बढाना चाहिए| -जितेन्द्रच्या 'भोला कोणीतरी'चा पंखा प्यारे१ (कंपनीबसमधल्याटीव्हीसीडीप्लेअरचीकृपा) येशा, आमच्या गाववाल्या पोरीला काय म्हनलास तर बगच मग. ;) - वाईकर प्यारे१
  • Log in or register to post comments

बडे बुढे कह गये हय की ऐसे

यकु
Mon, 02/27/2012 - 17:15 नवीन
बडे बुढे कह गये हय की ऐसे नये लेखकोंको हतोत्साह न करके उनका उत्साह बढाना चाहिए|
प्यार्‍या मी उत्साहच वाढवत होतो रे.. मी तर एकच शब्द लिहीला असता तरी चाललं असतं म्हणालो ना :p
आमच्या गाववाल्या पोरीला काय म्हनलास तर बगच मग.
हो का? स्वातीकाकु तुमच्या गावच्या आहेत का? स्वारी बर्का स्वातीकाकू... आता पुढच्या वेळी तुम्ही खरंच नुसतं ''क्रमश:'' लिहीलं तरी काही म्हणणार नाही आम्ही. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@आता पुढच्या वेळी तुम्ही खरंच

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/28/2012 - 08:47 नवीन
@आता पुढच्या वेळी तुम्ही खरंच नुसतं ''क्रमश:'' लिहीलं तरी काही म्हणणार नाही आम्ही.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

पुढिल लेखनास शुभेच्छा !

गणेशा
Mon, 02/27/2012 - 21:15 नवीन
पुढिल लेखनास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

उत्तम सुंदर लेखन

५० फक्त
Tue, 02/28/2012 - 07:55 नवीन
उत्तम सुंदर लेखन
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा