आम्ही त्रुतीय वर्षाच्या वर्गात पाऊल ठेवले, अन नेहमी झोपेत असलेले जागे झालो. या वर्षी आम्हाला एक प्रोजेक्ट करुन तो वर्षअखेरीस सादर करणे सक्तीचे होते. (१०० गुण होते त्यासाठी..;)) त्यामुळे एक वेगळाच उत्साह आणि भीती वाटत होती. थोडेसे वैज्ञानिकाचे वारे कानात आणि मनात भरलेले होते. त्यामुळे काहीतरी हटके करायचे असे वाटत होते.
झाले....शोधमोहीम सुरु झाली. आमचे एक आवडते गुरुवर्य सतत याबद्द्ल मार्गदर्शन करत होते. आमच्या वा-याची बहुतेक त्यांना कल्पना आली असावी. ते आम्हाला दिशा देण्याचे प्रयत्न करत होते. त्यांच्या सांगण्यावरुन आम्ही जुने प्रोजेक्ट रिपोर्ट चाळले. पण त्यातला कुठलाही उपक्रम रुचला नाही. मात्र त्यांतूनच काही सवंगड्यांनी त्यांचे विषय निवड्ले आणि प्रोजेक्ट्च्या (ढापेगीरीच्या.....;)) मार्गाला लागले.
नंतर आम्ही लायब्ररीकडे मोर्चा वळविला. (नाहीतरी तेथेच पडिक असायचो. ;)) तिथे वाचता वाचता हवामानविभागात काम करणा-या एका काकांची अन माझी ओळख झाली. आम्ही राहायचो त्या पलीकड्च्या गल्लीतच ते रहात होते. झाले.....नंतर त्यांच्या घराचे उंबरठे झिजवले व त्यांनी त्यांच्या कार्यालयात बोलाविले. तिकडे १-२ दिवस जाऊन पुस्तके चाळली, एकदोघांना भेटले. पण तिथे आम्हाला वेगळे काही करण्यासारखे वाटले नाही.
एव्हाना आमचे सोबती त्यांच्या अभ्यासात व उपक्रमात गुंतले होते. ऑगस्ट उजाडला तरी आमचा उपक्रमाचा विषयच ठरला नव्हता. एक दिवस अचानक आमच्या कॉलेजची माजी विद्यार्थीनी सरांना भेटायला आली. तिची व माझी ओळख झाली. तिला माझ्या प्रोजेक्टबद्द्ल सांगितले तेव्हा तिने एका खगोलशास्त्रातील एका नामवंत संस्थेचे नाव, तिथे जाऊन कोणाला भेटायचे त्यांचे नाव व फोन नं. दिला. अर्थात तिनेही तिच्या उपक्रमाचे तारे तिथेच तोडले होते.
वेळ न दवड्ता आम्ही कॉईनबॉक्सवरून त्या सरांना फोन केला आणि त्यांनी मला एकदाचे भेटायला बोलाविले. दुसरीकडे आम्ही हुश्श झालो. मनात कुठेतरी वाटत होते की, इकडे आपले मनासारखे प्रोजेक्ट नक्की मिळेल. येणा-या रविवारी आम्ही त्यांना भेटायला जाणार होतो. प्रोजेक्टसाठी कॉलेज बंक करणे, कोणीही चालू दिले नसते.
क्रमशः
वाचने
3496
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय हे? ते वरचं तरी कशाला
'क्रमश:'' असा एकच शब्द लिहिला
In reply to काय हे? ते वरचं तरी कशाला by यकु
सहमत.
In reply to 'क्रमश:'' असा एकच शब्द लिहिला by मोहनराव
श्शी बाब्बा ....यकु अस नाय
In reply to काय हे? ते वरचं तरी कशाला by यकु
एकदा टिक आहे पण असल हे अर्धवट
अहो... आमच्याकडे आज विजेची
माफि मागन्यासरख काहि नाहि ...
In reply to अहो... आमच्याकडे आज विजेची by स्वातीविशु
वाट बघेश...
यकु, बडे बुढे कह गये हय की
बडे बुढे कह गये हय की ऐसे
In reply to यकु, बडे बुढे कह गये हय की by प्यारे१
@आता पुढच्या वेळी तुम्ही खरंच
In reply to बडे बुढे कह गये हय की ऐसे by यकु
पुढिल लेखनास शुभेच्छा !
उत्तम सुंदर लेखन