Skip to main content

कविता हवी आहे

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 25/02/2012 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आमच्या बाळाशी खेळताना माझी आई त्याला अनेक छान छान कविता, गाणी म्हणून दाखवते. काल असंच कविता म्हणत बाळाशी खेळताना तिला लहानपणी शाळेत असलेली ग. ह. पाटीलांची "पाखरांची शाळा" ही कविता अर्धवट आठवली. इंटरनेटवर शोध घेतल्यावर इथे त्या कवितेच्या चार ओळी सापडल्या - पाखरांची शाळा भरे पिंपळावरती चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करीती उतरते उन जाते टळूनी दूपार पारावर जसा यांचा भरतो बाजार संपूर्ण कविता मात्र मला सापडली नाही. मिपाकरांकडून ही कविता मिळण्यास नक्की मदत होईल असा विश्वास आहे. त्याबद्दल मिपाकरांना आगाऊ (म्हणजे इन् ऍड्व्हान्स बर्का!) धन्यवाद. आपला, (आभारी काव्यरसग्राही मिपाकर) प्रशांत

वाचने 3520
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

तुमचा धागा गायब होण्याच्या बेतात आहे.. :P टीप:- मिसळपाव .कॉम हे मराठी कविता गाणी इत्यादी साठीचे शोध-यंत्र नसून ते एक अभिव्यक्ती संकेत स्थळ आहे.. :)

मग इथे काय म्हटले आहे त्याचा खुलासा होईल का?
काथ्याकूट हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता खास राखून ठेवले आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. सबब, निरनिराळ्या विषयांवरील चर्चाप्रस्तावांचे इथे स्वागत आहे. येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!
एखादी कविता इंटरनेटवर कुठे मिळेल, किंवा कुणाकडे मिळू शकेल का? हा प्रश्न चर्चेसाठी नियमबाह्य आहे का? वृत्तपत्रे, वाहिन्यांवरील बातम्या, ज्योतिषांची हजामत, क्रिकेटचे अतिसार इत्यादि कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते तर एका मराठी संकेतस्थळावर मराठी कवितेविषयी केलेल्या विचारणेवर चर्चा होणे नियमबाह्य ठरते का?

दुपारी असेच कोणीतरी मराठी गाणे वगैरे कुठे मिळेल असे विचारलेले..तो धागा गायब झाला म्हणून तुम्हाला आगाऊ कल्पना देतोय..बाकी काही नाही.. :)

फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. हे तुम्हीच लिहिले आहे कि..मग विचारून कसल्याची अपेक्ष्या करताय?

या संकेतस्थळावर एखादी कविता अथवा मराठी गाणे कोणाला पाहिजे असेल तर विचारावयास काय हरकत आहे ? मराठी भाषा आज चालतीबोलती ठेवावयाची असेल तर असल्या प्रश्नांना उत्तरे मिळण्याची सोय असणे आवष्यक आहे. मात्र ही बाब सर्वस्वी संपादकमंडळाच्या मर्जीतील आहे हे मला एकदम मान्य आहे. त्यामुळे माझा वाटा म्हणून मी सांगू इच्छितो की माझ्याकडे किमान हजार-दोन हजार शालेय कविता, गाणी, नाट्यगीते यांचा संग्रह आहे. जर कोणाला अशी काही माहिती पाहिजे असेल व त्यांनी व्य.नि. वर विचारले तर मोठ्या आनंदाने शक्य असेल ती मदत मी करेन. आठवणीतील कविता ..४ भाग (शालेय कविता) गाणी मनातील..गळ्यातील ..१० भाग (भावगीते) नाट्यसंगीत ५०० पेक्षा जास्त कवितासंग्रह १५० + निरनिरान्राळ्या कवींचे ( मात्र बरेचसे ३० वर्षांपूर्वीचे ) ( आणि हो, ७-८ उर्दू गझलसंग्रह ही) आपल्याकरिताच आहे. काही मदत झाली तर तुमच्या बरोबर माझाही आनंद वाढणार आहे. शरद

In reply to by शरद

श्री. शरद, रसिक मिपाकरांना (किंवा तुमच्या प्रतिसादावरुन वाटते त्याप्रमाणे इतर जणांनाही) मदत करण्याची तुमची वृत्ती आवडल्या गेलेली आहे, हे नमुद करु इच्छितो. उगाच आपल्या अकलेचे तारे तोडत, काड्या सारण्यापेक्षा ही वृत्तीबाळगणे जास्त गरजेचे आहे..

In reply to by चिगो

>>>उगाच आपल्या अकलेचे तारे तोडत, काड्या सारण्यापेक्षा ही वृत्तीबाळगणे जास्त गरजेचे आहे, और ये लगा सिक्सर..!!!! ;-)

In reply to by शरद

अवश्य. व्यनिमध्ये/़खवमध्ये विचारणे हे पर्याय आहेतच. पण मला जर माहिती असेल की अमुक अमुक सदस्याकडे अमुक अमुक प्रकारची माहिती उपलब्ध असण्याचा संभव आहे, तरच त्याचा उपयोग होईल. अनेकदा आपल्याला हवी असलेली माहिती नक्की कोणाकडे असेल हे माहिती नसतं. शिवाय मला हवी असलेली माहिती इतरही अनेक सदस्यांना हवी असू शकते. त्यादृष्टीने चर्चा किंवा अन्य फोरम उपलब्ध असणे गरजेचे आहे. बाय द वे, तुमच्याकडे असलेले कवितासंग्रह मुद्रित स्वरूपात आहेत की त्यांच्या मुलायमप्रती आहेत. मुलायमप्रती असल्यास आंतरजालीय दुवे कृपया द्यावे किंवा ते उतरवून घेण्याचे अन्य पर्याय सांगावे ही विनंती. आपला, (आभारी) प्रशांत

In reply to by शरद

आपला मदत करण्याचा स्वभाव कौतुकास्पद आहे. :-) (बाकी व्यनी मध्ये.) धन्यवाद.