Skip to main content

रात्ररात्रभराची ही जागरणं

लेखक Gajanan Mule यांनी शुक्रवार, 24/02/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
रात्ररात्रभराची ही जागरणं नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय अस्वस्थ मनाचं उनाड वागणं ... स्वतःलाच पुन्हा पुन्हा काहीतरी मागणं... चालता चालता एकटं नसल्याची जाणीव ... आणि आजूबाजूला भेडसावणारी तुझी उणीव ... चांदण्यांनी माझ्या नकळत हिरावून घेतलेली माझी झोप ... आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ... घेऊन जा ... खूप वाढलंय आणि दिवसेंदिवस अधिकाधिक वाढतंच चाललय हे ... रात्ररात्रभराची ही जागरणं .. नि प्रत्येक घटकेला येणारी तुझी सय . - गजानन मुळे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1370
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत आणि वेळोवेळी अशाच कविता लिहा या शुभेच्छा! >> आणि माझ्या अंगणातलं तुझ्या कवितेचंरोप ... घेऊन जा ... हे विशेषतः आवडलं.

मस्त!

छान आहे कविता !! आवडली !!!