Skip to main content

मुक्तिबंध

लेखक रेशा
Published on रवीवार, 26/02/2012
मलाही एकदा मृद्क्कण बनून गरारा वार्यावर भरारायचय खूप खूप उंच जाऊन एकदा त्या आभाळाला शिवायचं नात, मुलगी, बहिण, प्रेयसी मैत्रीण सुद्धा नाही बनायचंय हात पसरून खुल्या मनान फक्त मी म्हणून जगायचंय बांधीव उंबरा ओलांडून मला स्वत:ला ओळखायचंय मोकळा मोकळा श्वास घेऊन मनावरल मळभ पुसायचंय तो उंबरा ओलांडताना मन स्थिर ठेवायचंय खोल काही तुटेल आत तरी स्वत:ला सावरायचंय स्वैर करताना संचार जगापासून अलिप्त राहायचंय सारे सारे तुटतील आधार तरी स्वप्नांना जगवायचंय त्या स्वप्नांचा ध्यास घेऊन वेड्यासारख त्यांमागे धावायचंय सारी सारी बंधने झुगारून फक्त एकदाच स्वत:साठी जगायचंय
लेखनविषय:

वाचन संख्या 1300
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

रेशा कविता छान :) स्वैर करताना संचार जगापासून अलिप्त राहायचंय सारे सारे तुटतील आधार तरी स्वप्नांना जगवायचंय अशा आधारहीन स्वप्नाना काय अर्थ मग ? बाकी तु म्हणतेस तस मुक्त जगण समस्त स्रीवर्गाला(अपवाद सोडता) अशक्य आहे ;) कारण स्त्री ही कुठल्या न कुठल्या नात्यामध्ये स्वतःला गुफुन घेते /किवा गुन्तली तरी जाते :) ( मी फक्त मत नोन्दवले ) :)

In reply to by पियुशा

अशा आधारहीन स्वप्नाना काय अर्थ मग ?
पियुबै, निदान मानवी जीवनात तरी थोडीशी फँटसी हवीच की. प्रत्येक ओळ तुम्ही प्रत्येक क्षण जगाल असं नाही, पण थोडा काळ तरी जगू शकता ना?? रेशे, कविता छान आहे.

मिपावर स्वागत! पहिल्याच कवितेत जिंकलंस ग! ही फक्त स्त्रियांचीच नाही, प्रत्येक माणसाचीच सुप्त इच्छा असावी कधीतरी पतंगासारखं वार्‍यावर जायची !

तो उंबरा ओलांडताना मन स्थिर ठेवायचंय खोल काही तुटेल आत तरी स्वत:ला सावरायचंय
ह्या ओळी विशेष आवडल्यात.

आभार मंड्ळी ... निरर्थक नाहीयेत ती स्वप्न इच्छा जरुर आहे ...