घट्ट मिटलेल्या डोळ्यापुढे अस्वस्थ अंधारात
रंगीढंगी चित्र-विचित्र विक्षेप करत नाचत राहिल्या आकृत्या
लहानाच्या मोठ्या आणि मोठ्याच्या लहान होत
ठेंगा दाखवत दात विचकत हसत राहिल्या आकृत्या
कान मुद्दाम बंद केले होते हात बांधून कानाशी
एका दगडात पाडून टाकले चिवचिवणारे दोन पक्षी
तरी राहिले आदळत आवाज भित्र्या भिंतींना भेदून
शिरत राहिली नको ती कुजबुज पडदे सगळे छेदून
पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप
अंधार पिऊन फाकणारी
आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी
जरबेने पाउल टाकणारी
मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की
एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी?
डोळे उघडून एकदा तरी पाहायलाच हव…
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1964
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारीच गो सोनल...
आवडली
आवडली.. अशा परिस्थितीत डोळे
छान आहे कविता
सुंदर
मस्तच
छान ..
पापण्यांच्या फटीतून तेव्हाच
सुंदर रचना... पुन्हा एकदा
सुंदर रचना!
आवडली मस्त मस्त
मनापासुन भरभरुन प्रतिसाद