Skip to main content

निर्णय

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 22/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
घट्ट मिटलेल्या डोळ्यापुढे अस्वस्थ अंधारात रंगीढंगी चित्र-विचित्र विक्षेप करत नाचत राहिल्या आकृत्या लहानाच्या मोठ्या आणि मोठ्याच्या लहान होत ठेंगा दाखवत दात विचकत हसत राहिल्या आकृत्या कान मुद्दाम बंद केले होते हात बांधून कानाशी एका दगडात पाडून टाकले चिवचिवणारे दोन पक्षी तरी राहिले आदळत आवाज भित्र्या भिंतींना भेदून शिरत राहिली नको ती कुजबुज पडदे सगळे छेदून पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप अंधार पिऊन फाकणारी आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी जरबेने पाउल टाकणारी मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी? डोळे उघडून एकदा तरी पाहायलाच हव…
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1964
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कविता आवडली. अशा परिस्थितीत डोळे उघडून बघायला धीर लागतो.

आवडली.. अशा परिस्थितीत डोळे उघडून बघायला धीर लागतो. खरे आहे, आणि अनेक वेळा प्रयत्न देखिल करावा लागतो.... अनेक वेळा ती चाहुल आपल्याला नकोच असते किंवा ती चाहुल आहे हे सुद्धा आपले मन नाकारते...

मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी?
क्या बात है!! What a thought!!

आवडलि कविता !!!

पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप अंधार पिऊन फाकणारी आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी जरबेने पाउल टाकणारी वा! मस्त !! खुप आवड्ले....लगे रहो.

सगळी कविताच आवडली. अंधारात हरवून जायला सोपं आहे, पण दुसरं दार उघडणं, त्यासाठी आधी डोळे उघडणं हेच फार कठीण!

मनापासुन भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. जे काही इथे उतरलय ते प्रत्येक वेळी कठिन प्रसन्गातुन जाताना खोल खोल जाणवलय. तुम्हालाही नक्किच हा अनुभव कधी न कधी आलाच असेल. ..