✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

द परफेक्ट स्टोर्म......

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 02/23/2012 - 17:11  ·  लेख
लेख
द परफेक्ट स्टोर्म...... एकदा एक सिनेमा बघून कट्ट्यावर गेलो.....मित्राने विचारले "कुठला सिनेमा बघितला"....मी म्हणालो "कबुतर का बदला"....तो म्हणाला " हे काय सिनेमाचे नाव आहे का?"....मी म्हणालो "हो....त्याला तुम्ही "मैने प्यार किया" असे म्हणता"..... आम्ही चित्रपट शौकीन...आम्हाला कुणी एका वाक्यात जरी कथानक सांगितले तरी चालते...कोलेजच्या नावाखाली टाइमपास करत असतांना केवळ पोस्टर बघून "वेट अंटिल डार्क" नावाचा अप्रतिम सिनेमा बघितला......कुणीतरी कथानक सांगितल्यावर आणि मग ते ऐकल्यावर सिनेमा पहायला जाण्यात काय मजा?.....आणि "वेट अंटिल डार्क" सारखे सिनेमे जर कोण कथानक ऐकून बघत असतील तर त्यांना माझा सलाम...."वेट अंटिल डार्क" चे सजेशन फक्त एकाच वाक्यात होऊ शकते.....आंधळ्या बाईने केलेले स्व-संरक्षण....कसे ते पडद्यावर बघा की..... अहो "तुफान" नावाचा अमिताभचा सिनेमा आला होता...त्यावर सर्व वर्तमान पत्रांनी दणकून टीका केली तरीपण "अमिताभच्या" रसिकांनी तो पहायचा सोडले नाही....आणि वर्तमान पत्रांनी नावाजलेला "काकज के फूल"चे पोस्टर बघायला पण कोण गेले नाही.......थोडक्यात ज्याला सिनेमा बघायचा असेल तो कसाही बघेलच आणि ज्याला तो बघायचा नसेल तो तसाही बघणार नाही....मग उगाच कथानक सांगण्यात आपला वेळ का वाया घालावा?....त्यामुळे मी मला आवडलेला सिनेमा सांगत आहे....मला आवडला म्हणून तुम्हाला पण तो आवडलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे आणि माझा तो आग्रह पण नाही आहे.........कधीकधी चांगले सिनेमे नाव माहित नसल्याने बघितल्या जात नाहीत.......म्हणून लिहित आहे..... मागील आठवड्यात काम करत असतांना पेन ड्राईव मध्ये व्हायरस शिरला...ट्रोझन हॉर्स...नावाचा....त्याला योग्य त्या रित्या नामशेष करून टाकले....."ट्रोझन हॉर्स" वरून "ट्रोय" नावाचे काहीतरी वाचलेले आठवले म्हणून गुगलची मदत घेतली आणि मग "ट्रोय" डाऊनलोड करून बघितला...डिरेक्टर आवडला आणि मग "द परफेक्ट स्टोर्म" ह्या सिनेमाचा शोध लागला...जरा चांगला असेल असे वाटले म्हणून त्याला पण कॉम्पूटरच्या हार्डडिस्क टाकून दिले....आणि बघितला.... लिंक देत आहे...कथानक वाचा आणि मग ठरवा.... http://en.wikipedia.org/wiki/The_Perfect_Storm_(film)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला

प्रतिक्रिया द्या
2236 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

इतक्या गावगप्पा मारायच्या

असुर
गुरुवार, 02/23/2012 - 17:19 नवीन
इतक्या गावगप्पा मारायच्या ऐवजी चित्रपटाबद्दल लिहीलं असतं तर बरं होतं. त्यात तुम्ही विकीपेडीयाची लिंक देऊन टाकलीत. हे म्हणजे क्याडबरीच्या रॅपरखाली हिंगाची गोळी निघाल्यासारखं वाटतंय. चव तर बेक्कारच, पण घाण वाससुद्धा येतो त्याचा. --असुर
  • Log in or register to post comments

म्हणजे क्याडबरीच्या रॅपरखाली

विजुभाऊ
गुरुवार, 02/23/2012 - 19:04 नवीन
म्हणजे क्याडबरीच्या रॅपरखाली हिंगाची गोळी निघाल्यासारखं वाटतंय. अरारारारारारारा बेक्कार प्रतिसाद............... १००००००० % मार्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

बेक्क्क्क्क्कार्र!!

तुषार काळभोर
गुरुवार, 02/23/2012 - 21:55 नवीन
बेक्क्क्क्क्कार्र!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

सल्ला आहे....परिक्शण नाही.....

मुक्त विहारि
गुरुवार, 02/23/2012 - 17:23 नवीन
@ असुर.....चित्रपट बघावा हा सल्ला आहे....परिक्शण नाही.....
  • Log in or register to post comments

तगडं मुक्तक...

आत्मशून्य
गुरुवार, 02/23/2012 - 18:17 नवीन
अगदी तंत्रज्ञानाने अत्यंत ओतपोत भरलेलं. मुक्तक म्हणुन टॅग न केल्याने लोकांचा गोधळ उडतोय, मजा येतेय, लगे रहो. पुभाप्र ;) असो स्टारकास्ट सॉलीड होती म्हणुन बघायला गेलो होतो. कथा म्हणुन फार आवडला नाही. कथेचा संबंध नाही पण टीटॅनीक च्या लाटेवर प्रेक्षकांच्या डोक्यावर मारलेली अजुन एक शोकांतीका इतकच वाटुन गेलं. वादळाची द्रुश्ये नक्किच थरारक आहेत पण ...
  • Log in or register to post comments

बादवे,

वपाडाव
गुरुवार, 02/23/2012 - 18:15 नवीन
नेमका कुठला सिनेमा सुचवलाय काही कळेल का?
  • Log in or register to post comments

ओके...

उदय के'सागर
गुरुवार, 02/23/2012 - 18:45 नवीन
ओके...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा