Skip to main content

दुरवरल्या गावाकडची आठवण

Published on बुधवार, 22/02/2012
दुरवरल्या गावाकडची आठवण उदास संध्याकाळी असल्या; त्या उजाड डोंगररांगा पाहून दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून शेणगोठा कचरा काढून झाडून साफ केले घर ते आईची ती घांदल गडबड मजला येथूनी दिसते कपीला चांदी गाय गरीब चारा खात असते मायेचा स्पर्श होताच दुधामध्ये प्रेम उतरते त्याच वेळचे ते निरसे दुध मी टाकतसे पिवून दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून धाब्याचे घर पाटाईचे; त्यात झोका बांधलेला लहान भाऊ त्या झोळीत असे झोपलेला आठवतो तो परवचा झोका देता देता म्हटलेला आठवतो तो अभ्यास अजूनही घोकंपट्टी केलेला जीव वेडा रमतो; जरी तेथे नाही काही उरले अजून दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून चुलीतल्या धुरासारखी मंद आठवण थोडी बाबांची त्यांनीच लावली मजला गोडी अभ्यास करण्याची वह्या पुस्तके दप्तर देवूनी शाळा केली सवयीची काळजी घेतली त्यांनी माझी आयुष्य माती न होण्याची दुर आलो मोठा झालो; का उगाच केला अभ्यास मन लावून? दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून दारापुढला लिंब लावलेला असेल आता मोठा झाला त्याला बघून पाणी घालून काळ कितीक निघून गेला तेथेच खेळलो पडलो रडलो मित्रांना मार दिला घेतला अजूनही का येतात कुणी बाजारकरू तेथे विश्रांतीला? पाणी मागतात का आपल्याकडे ते सारे भाकरी खाऊन? दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून फार पुढे निघून आलो मी तुम्हास दिले दुर ठेवून तुमचे हात रितेच ठेवले टाकले सारे मला देवून राही वाहत्या गर्दीमध्ये तरी एकटा जाई थिजून शहराचे वारे परी न लागे मला घ्या तुम्ही समजून तुम्हास कल्पतो डोंगर समोरचे घेतो त्यांना बघून दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून - पाषाणभेद
लेखनविषय:

वाचन संख्या 2580
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

कविता आवडली.

आवडली.

डोळे पाणावलेत.... मित्रा ............................................................................................................ राही वाहत्या गर्दीमध्ये तरी एकटा जाई थिजून शहराचे वारे परी न लागे मला घ्या तुम्ही समजून ..................................................................................................................

In reply to by ajay wankhede

दुर आलो मोठा झालो; का उगाच केला अभ्यास मन लावून? दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून
असलं काही लिहित नको जाउ रे, फुकट जीव तळमळतो लेका... पुढचा अर्धा तास काही सुचत नै...