जिलेबी ....
जिलेबी.....
चला मि.पा. करानो , आज शिकुया जिलेबी बनवायला
साहित्य :
मैदा - २ वाट्या
तांदळाची पिठी - २ चमचे
खाण्याचा केशरी कलर (चुटकी भर )
दही - ४ चमचे
तूप साजूक असेल तर उत्तम
सॉसची बाटली नाहीतर दुधाची रिकामी पिशवी
मी दही घातले मैदा आंबवन्याकरिता तुम्ही जर यीस्ट वापरणार असाल तर अर्धा चमचा यीस्ट २ चमचे पाण्यात १० मिनट ठेवून मग मिश्रणात घाला
पाकासाठी :
साखर २ वाट्या .
पाणी १ वाटी.
केसर चिमुटभर .
दुध २ चमचे अथवा लिंबाचा रस १/२ छोटा चमचा .
कृती :
एका भांड्यात मैदा चाळून घ्या , त्यात दही / (यीस्ट) ,तांदळाची पिठी अन थोड पाणी घालून मिक्स करून घ्या
मिश्रण जास्ती घट्ट अथवा पातळ नको
हे असे हवे
आता हे मिश्रण १० -१२ तास आंबावन्या करिता घट्ट झाकून ठेवा.
अन उद्या जिलब्या कशा पड्तील ;) गोल होतील की त्रिकोणी ?की आणखी कशा ? याचा विचार करत झोपी जा ;)
असो....
सकाळी जिलेबिच मिश्रण दुप्पट फुगल असेल .
आता आधी पाक करून घेउया .
२ वाट्या साखर अन एक वाटी पाणी असे प्रमाण घेऊन साखरेचा पाक तयार करून घ्या
( टीप : पाकात किंचित लिंबू पिळले अथवा २ चमचे दुध घातले तर पाक स्वच्छ होतो )
आता जिलेब्या तळून घेऊया
तळण्याकरीता पसरट भांड असेल तर उत्तम !
तूप गरम करा आता मिश्रण सॉसच्या बाटलीत घालून गोल गोल जिलब्या पाडायचा प्रयत्न करां.
हम्म ....आता आमच्यासारखे नवशिके असाल तर पहिल्या पाच - सहा जिलब्या तुम्हाला भारताच्या नकाशाची आठवण नक्किच करून देतील ! पण तुम्ही हार मानु नका ;)
आता मंद आचेवर जिलब्या तळून घ्या अन साखरेच्या पाकात दोनेक मिनिट डीप करून घ्या
गरमागरम क्रिस्पी जिलेब्या खायला तयार आहेत
ही पहा आमची जम्बो जिलेबी ;)
(अजून एक : - जिलेब्या लगेच खायच्या असतील तर साजूक / साध्या तुपात तळा
अन जास्ती वेळ कुरकुरीत ठेवायच्या असतील तर तेलात तळलेल्या जास्ती वेळ क्रिस्पी राहतील )
असो .....ही रेसेपी देउन आम्ही आमचे (मि.पा.वरचे ) नाव सार्थ केले आहे ;)
आपली क्रुपाभिलाषी __/\__
जिल्बुशा नगरकर ;)

वाचने
23053
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
वा वा जिल्बे... लयच भारी दिसत
>>>जिल्बुशा नगरकर कोण म्हणतं
In reply to >>>जिल्बुशा नगरकर कोण म्हणतं by प्यारे१
जिल्बे... लै भारी !!
In reply to >>>जिल्बुशा नगरकर कोण म्हणतं by प्यारे१
खीक्क....
In reply to खीक्क.... by सोत्रि
चला आपण आमच्या कुटीत जाऊन
In reply to चला आपण आमच्या कुटीत जाऊन by प्यारे१
५० ह घ्याल ना?
In reply to खीक्क.... by सोत्रि
हात, घड्याळ.. जिकडेतिकडे
छान , झकास !! मुख्तार नकवी
In reply to छान , झकास !! मुख्तार नकवी by सुहास..
सदर फोटोतील हात धागाकर्त्या
In reply to छान , झकास !! मुख्तार नकवी by सुहास..
पियु......तूने मार डाला.....
In reply to पियु......तूने मार डाला..... by मृगनयनी
नैने, 'तुलापण ' हात
In reply to नैने, 'तुलापण ' हात by प्यारे१
फक्त हात आवडायला काही हरकत
In reply to फक्त हात आवडायला काही हरकत by गवि
तो एखाद्या चाळिशीतील स्त्रीचा
In reply to फक्त हात आवडायला काही हरकत by गवि
एखाद्या चाळिशीतील स्त्रीचा दिसत असला तरी
In reply to नैने, 'तुलापण ' हात by प्यारे१
नैने, 'तुलापण ' हात
फोटो दिसत नसल्याने निराशा
In reply to फोटो दिसत नसल्याने निराशा by गणेशा
वेल्कम ब्याक !!!
जिल्ब्या छानच......पण
छानच ग पियुशा
वाह. छान.
In reply to वाह. छान. by तर्री
जलेबी-फाफडा
छ्या घोर निराशा झाली.
चकल्याजिलब्या दिसतायत. ;) पिवशाबैंनी नव्यागतांना मिपावर जिलब्या कश्या टाकाव्या यावर आपली पदरची मौलिक माहिती मोकळी केली असेल या आशेने धागा उघडला होता...पण छ्या घोर निराशा झाली.In reply to छ्या घोर निराशा झाली. by गणपा
+१
In reply to +१ by मी-सौरभ
(ढिसक्लेमरः यावरुन सदर
In reply to (ढिसक्लेमरः यावरुन सदर by प्यारे१
..
मि.पा.वरच्या एका अत्यंत
जिलब्या मस्तच
छानच दिसतायत.
In reply to छानच दिसतायत. by रेवती
आज्जे,
In reply to आज्जे, by वपाडाव
आपण नुसता पाक तरी करायला शिका
पियुषा!
In reply to पियुषा! by पैसा
+१
अरे वा.
आता थोडं पाकृविषयी,
In reply to आता थोडं पाकृविषयी, by वपाडाव
@त्या केचपसाठी वापरण्यात
वा... जलेबी बाई उर्फ जिल्बुशा
मस्तंच!
जम्बो जिलेबी भारीच आहे...
.
अत्यंत आवडीचा प्रकार
छान सोपी रेसिपी..
२६ जानेवारी होऊन गेलि.. (
In reply to २६ जानेवारी होऊन गेलि.. ( by JAGOMOHANPYARE
१५ ऑगस्ट/२६
झकासच !!
वाव जलेबी...
वाह वाह
जिलब्या आवडल्या... आणि
मस्त
जिलब्या पडल्याच का शेवटी!!
अत्यंत आवडती..
सर्व वाचकाना , ढॅन्यवादस !!!
चित्रांवरून तरी सदर जिलब्या
In reply to चित्रांवरून तरी सदर जिलब्या by कॉमन मॅन
वा वा वा.... इतक्या जिलेब्या
In reply to चित्रांवरून तरी सदर जिलब्या by कॉमन मॅन
फक्त जिलबीच नाही...कोणताही
मस्त ... तोन्डाको पाणि
जिलेब्या..
In reply to जिलेब्या.. by प्रभाकर पेठकर
'जलेबीSSS?'
In reply to 'जलेबीSSS?' by चिंतामणी
व्वा...!