जिलेबी ....

Primary tabs

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
16 Feb 2012 - 3:40 pm

जिलेबी.....
चला मि.पा. करानो , आज शिकुया जिलेबी बनवायला
साहित्य :

मैदा - २ वाट्या
तांदळाची पिठी - २ चमचे
खाण्याचा केशरी कलर (चुटकी भर )
दही - ४ चमचे
तूप साजूक असेल तर उत्तम
सॉसची बाटली नाहीतर दुधाची रिकामी पिशवी
मी दही घातले मैदा आंबवन्याकरिता तुम्ही जर यीस्ट वापरणार असाल तर अर्धा चमचा यीस्ट २ चमचे पाण्यात १० मिनट ठेवून मग मिश्रणात घाला

पाकासाठी :
साखर २ वाट्या .
पाणी १ वाटी.
केसर चिमुटभर .
दुध २ चमचे अथवा लिंबाचा रस १/२ छोटा चमचा .

कृती :
एका भांड्यात मैदा चाळून घ्या , त्यात दही / (यीस्ट) ,तांदळाची पिठी अन थोड पाणी घालून मिक्स करून घ्या
मिश्रण जास्ती घट्ट अथवा पातळ नको
हे असे हवे

आता हे मिश्रण १० -१२ तास आंबावन्या करिता घट्ट झाकून ठेवा.
अन उद्या जिलब्या कशा पड्तील ;) गोल होतील की त्रिकोणी ?की आणखी कशा ? याचा विचार करत झोपी जा ;)
असो....
सकाळी जिलेबिच मिश्रण दुप्पट फुगल असेल .

आता आधी पाक करून घेउया .
२ वाट्या साखर अन एक वाटी पाणी असे प्रमाण घेऊन साखरेचा पाक तयार करून घ्या
( टीप : पाकात किंचित लिंबू पिळले अथवा २ चमचे दुध घातले तर पाक स्वच्छ होतो )

आता जिलेब्या तळून घेऊया
तळण्याकरीता पसरट भांड असेल तर उत्तम !

तूप गरम करा आता मिश्रण सॉसच्या बाटलीत घालून गोल गोल जिलब्या पाडायचा प्रयत्न करां.
हम्म ....आता आमच्यासारखे नवशिके असाल तर पहिल्या पाच - सहा जिलब्या तुम्हाला भारताच्या नकाशाची आठवण नक्किच करून देतील ! पण तुम्ही हार मानु नका ;)

आता मंद आचेवर जिलब्या तळून घ्या अन साखरेच्या पाकात दोनेक मिनिट डीप करून घ्या
गरमागरम क्रिस्पी जिलेब्या खायला तयार आहेत

ही पहा आमची जम्बो जिलेबी ;)


(अजून एक : - जिलेब्या लगेच खायच्या असतील तर साजूक / साध्या तुपात तळा
अन जास्ती वेळ कुरकुरीत ठेवायच्या असतील तर तेलात तळलेल्या जास्ती वेळ क्रिस्पी राहतील )

असो .....ही रेसेपी देउन आम्ही आमचे (मि.पा.वरचे ) नाव सार्थ केले आहे ;)

आपली क्रुपाभिलाषी __/\__
जिल्बुशा नगरकर ;)

प्रतिक्रिया

वा वा
जिल्बे...
लयच भारी दिसत आहेत या जिलब्या :)

प्यारे१'s picture

16 Feb 2012 - 3:46 pm | प्यारे१

>>>जिल्बुशा नगरकर

कोण म्हणतं ....... विनोदबुद्धी नसते म्हणून?

जिल्बे आपलं हे , पिवशे, लिजेबी मस्त गं!
बा द वे, ५० हातातलं घड्याळ मागतील, सांभाळ बरं ! ;)

वपाडाव's picture

16 Feb 2012 - 3:55 pm | वपाडाव

बा द वे, ५० हातातलं घड्याळ मागतील, सांभाळ बरं !

घड्याळावर थांबले का, मला वाटलं नेलपेंट पण मागतात का काय?

सोत्रि's picture

16 Feb 2012 - 4:28 pm | सोत्रि

बा द वे, ५० हातातलं घड्याळ मागतील, सांभाळ बरं !

ठ्ठो.... प्यार्‍या तु आता एक 'साधू' बनला आहेस नाहीतर एक बीयरचा टीन तुला माझ्यातर्फे द्यायचा विचार झाला होता हा प्रतिसाद वाचून. :D पण जर तु 'संधीसाधू' बनला असशील तर ही ऑफर ओपन आहे असे समज ;)

- (हलकट) सोकाजी

प्यारे१'s picture

16 Feb 2012 - 4:47 pm | प्यारे१

चला आपण आमच्या कुटीत जाऊन 'चर्चा' करु! ;)
तहानलेल्या व्यक्तींसाठी एक 'पाणपोई' उभारणार काय याबाबत देखील मार्गदर्शन करावं लागणार आहे, आम्ही ते करुच.

ऑन अ शिरेस नोट : धन्स!

५० ह घ्याल ना?
नाहीतर, तुम्ही आमचे हात गब्बर स्टाईल मागायचात!
हे हात मला दे प्यार्‍या, कमेंटा टाकतोस काय म्हणून :P

चिंतामणी's picture

18 Feb 2012 - 9:32 am | चिंतामणी

:O :-O :shock:

नक्की काय म्हणायचे आहे तुला?

५० हलके घ्याल ना?

की

५० हळूच घ्याल ना? Skype Emoticons

हात, घड्याळ.. जिकडेतिकडे नुस्ते राजकारण अन इलेक्शन...

सुहास..'s picture

16 Feb 2012 - 3:50 pm | सुहास..

छान , झकास !!

मुख्तार नकवी मोड >>> छान पैकी घड्याळ , नेल-पॉलीश लावुन स्वयंपाक करता की हो !! ;) ÌÌ

अन्या दातार's picture

16 Feb 2012 - 4:00 pm | अन्या दातार

सदर फोटोतील हात धागाकर्त्या जिल्बुषा यांचाच असल्याबद्दल काय पुरावा आहे आपल्याकडे?

जिलब्या तश्याही तुम्हाला चांगल्याच जमतात; फरक एवढाच की यंदा त्या स्वयंपाकघरात झाल्या ;)

अवांतर: आज संध्याकाळी जिलेबी खायला बाहेर पडलेच पाहिजे

मृगनयनी's picture

17 Feb 2012 - 2:36 pm | मृगनयनी

पियु......तूने मार डाला..... ;) ;) ;)

बाय द वे... वरच्या एका फोटोतला "तो" हात, "ते" नेलपेन्ट", "ते" घड्याळ तुझेच्च आहे का?

;) ;) ... छान आहे... :)

प्यारे१'s picture

17 Feb 2012 - 2:52 pm | प्यारे१

नैने,
'तुलापण ' हात आडौला?
कलियुग कलियुग म्हणतात ते हेच रे रामा!

पोरांनो, काम्पिटीशन वाडली हाय हे ध्यानात घ्या. ;)

-पळण्याच्या तयारीत प्यारे१

फक्त हात आवडायला काही हरकत नाही.. याचा अर्थ काम्पिटिसन असंच नव्हे..

मलाही आवडला.. तो एखाद्या चाळिशीतील स्त्रीचा दिसत असला तरी छान आहे... खायला करुन वाढणारा हात सुंदरच असतो..

अन्या दातार's picture

17 Feb 2012 - 3:17 pm | अन्या दातार

तो एखाद्या चाळिशीतील स्त्रीचा दिसत असला तरी छान आहे... खायला करुन वाढणारा हात सुंदरच असतो..

एक तीर, दो शिकार ;)

असो, थोडी दुरुस्ती:
चांगले खायला करुन वाढणारा हात सुंदरच असतो ;)

मृगनयनी's picture

17 Feb 2012 - 8:08 pm | मृगनयनी

नैने,
'तुलापण ' हात आडौला?
कलियुग कलियुग म्हणतात ते हेच रे रामा!

पोरांनो, काम्पिटीशन वाडली हाय हे ध्यानात घ्या.

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

प्यारे... मी पियुशाला माझी 'मिपावरची वहिनी' मानते रे..!!!! ;) ;) ;)

फोटो दिसत नसल्याने निराशा झाली असली तरी त्यासाठी सवडीने हा धागा पुन्हा घरी बघितला जाईन..
तुर्तास हा धागा वाचल्याबद्दल रिप्लाय दिला आहे.

वपाडाव's picture

16 Feb 2012 - 4:11 pm | वपाडाव

वेल्कम ब्याक !!!

इरसाल's picture

16 Feb 2012 - 4:16 pm | इरसाल

एक निरीक्षण...........
हातावरून जिल्बीकर्ती खात्या(पित्या नाही)घरची वाटतेय.;)

अवान्तरः हाताचा फोटो मागील काही आरोप खोडण्यासाठी मुद्दाम काढला आहे. अस आमचा बातमीदार....बा.दे.नगरकर कळवतो.

जाई.'s picture

16 Feb 2012 - 4:13 pm | जाई.

छानच ग पियुशा

तर्री's picture

16 Feb 2012 - 4:19 pm | तर्री

जिलेबी हा आवडता पदार्थ. फाफड्या सोबत ही अजुनच खुलून येते.

सोत्रि's picture

16 Feb 2012 - 4:32 pm | सोत्रि

उगाचचं,

जेठालाल गडा, गडा एलेक्ट्रोनिक्स्वाले आठवले :)

- (जलेबी-फाफडा आवडणारा) सोकाजी

गणपा's picture

16 Feb 2012 - 4:39 pm | गणपा

या तर खर्‍या खुर्‍या चकल्या जिलब्या दिसतायत. ;)

पिवशाबैंनी नव्यागतांना मिपावर जिलब्या कश्या टाकाव्या यावर आपली पदरची मौलिक माहिती मोकळी केली असेल या आशेने धागा उघडला होता...पण छ्या घोर निराशा झाली.

मी-सौरभ's picture

16 Feb 2012 - 4:56 pm | मी-सौरभ

बाकी कलयुग आलयं हेच खरं...
इतके दिवस बॅचलर बाप्ये झायरात करत होते आता बाया पण करायला लागतील असं वाटत आहे ;)

(ढिसक्लेमरः यावरुन सदर धागाकर्ती बॅचलर आहे असा निष्कर्ष काढू नये ही विनंती.)

प्यारे१'s picture

16 Feb 2012 - 4:58 pm | प्यारे१

(ढिसक्लेमरः यावरुन सदर धागाकर्ती बॅचलर आहे असा निष्कर्ष काढू नये ही विनंती.)

नाहीये काय?

मी-सौरभ's picture

16 Feb 2012 - 5:00 pm | मी-सौरभ

ते आमाला काय ठावूक..
इथे अजून डुप्लिकेट की खरा आयडी हाच प्रश्न अनुत्तरीत आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2012 - 4:49 pm | अत्रुप्त आत्मा

मि.पा.वरच्या एका अत्यंत विनोदी आणी रुपकात्मक पक्वान्नाची....पाक-कृती ;-) केल्या बद्दल ग्गोगोड शुभेच्छा..

अवांतर-ह्या धाग्यावर २०/२० जिलब्यांच्या ५कड्या पडून धागा शंभरी गाठो...ही अन्नपूर्णेचरणी प्रार्थना ;-)

प्रचेतस's picture

16 Feb 2012 - 5:00 pm | प्रचेतस

जिलब्या मस्तच पाडल्यात.
पिवशीबै, तुम्ही आता हलवाईणबै पण झाल्यात तर.

रेवती's picture

16 Feb 2012 - 6:43 pm | रेवती

छानच दिसतायत.

वपाडाव's picture

16 Feb 2012 - 6:49 pm | वपाडाव

दिसायला काय... काहीही छान दिसतंय... चव कशी झालीये कुणास ठौक ??

अवांतर : म्हटलं होतं ना, खुस्पट काढेन म्हणुन... घे आता... ;)

आपण नुसता पाक तरी करायला शिका आणि मग खुसपटं काढा महाशय.
तेवढं बरं जमतय? आँ?

पैसा's picture

16 Feb 2012 - 6:59 pm | पैसा

लै भारी धागा! पाकृ आणि फोटोंसाठी तुला १०/१० मार्क्स. आणि 'जिलब्या' म्हणून चिडवणार्‍याना 'एक लुहारकी' मारल्याबद्दल १००!!! याला म्हणतात सही अ‍ॅटिट्युड.

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2012 - 8:38 am | नगरीनिरंजन

याला म्हणतात सही अ‍ॅटिट्युड.

सहमत आहे.

जिलेबीची जिलेबी आवडली बरं का!

Pearl's picture

16 Feb 2012 - 7:02 pm | Pearl

अरे वा. सोपी पाकृ.
जिलब्या एतक्या सोप्या असतात हे माहिती नव्हतं :)
अगदी खर्‍या जिलब्यांसारख्या दिसताहेत ;-)
पाक कोणता करायचा? एकतारी का?

वपाडाव's picture

16 Feb 2012 - 7:17 pm | वपाडाव

त्या केचपसाठी वापरण्यात येणार्‍या बाटली ऐवजी जर खळ काढलेलं एखादं सुती कापड वापरलं (किंवा गाळणं म्हणु) तर जिलेब्या थोड्याश्या लहानही (व्यासाने) होतील. अन त्या लौकर पाक शोषुन घेतील. अन बारीक/लहान असल्याने फार वेळ क्रिस्पी राहतील.

पाकात बुडवुन काढलेल्या जिलेब्या अन थंड व घट्ट दही यांची गंमत न्यारीच...
ह्याच जिलेब्या, पाकात न बुडवता श्रीखंडासोबत खाल्यास धमाल येते.(श्रीखंड घरी हाटलेले व थोडेसे पातळ हवे, खुप घट्ट नको).

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2012 - 9:27 pm | अत्रुप्त आत्मा

@त्या केचपसाठी वापरण्यात येणार्‍या बाटली ऐवजी जर खळ काढलेलं एखादं सुती कापड वापरलं (किंवा गाळणं म्हणु) तर जिलेब्या थोड्याश्या लहानही (व्यासाने) होतील. अन त्या लौकर पाक शोषुन घेतील. अन बारीक/लहान असल्याने फार वेळ क्रिस्पी राहतील.>>> अस्सं होय...! बरं..बरं...बरं...! सांगू हो आंम्ही पुढच्या वेळी बदल करायला... ;-)
तो पर्यंत ह्या कश्या वाट्टात ते सांगा बरं---

वा... जलेबी बाई उर्फ जिल्बुशा नगरकर उर्फ ट्विटी. ;)

प्रास's picture

16 Feb 2012 - 9:50 pm | प्रास

अरे व्वा! :P

पियुशाबैंना छान जमल्या की जिलब्या! जिलब्या दिसायला छान आहेतच. फोटोही चांगले आलेत.

घरच्यांपैकी कुणाचं मिपावर अकाऊंट नैये का? असल्यास त्यांना चवीबद्दल काहीतरी लिहायला सांगाल का?

जम्बो जिलेबी भारीच आहे... ;) आता जिलेब्या आणणे झाले. उद्याचा बेत पक्का. सकाळी लाईट मिसळ आणि संध्याकाळी अर्धा-पाव किलो जिलेब्या..

- पिंगू

पिंगू's picture

17 Feb 2012 - 3:44 am | पिंगू

प्रकटाआ

सानिकास्वप्निल's picture

16 Feb 2012 - 10:06 pm | सानिकास्वप्निल

अत्यंत आवडीचा प्रकार
जिलब्या खुपचं छान दिसत आहे पियु :)
तों.पा.सू :)

कौशी's picture

16 Feb 2012 - 10:26 pm | कौशी

छान सोपी रेसिपी आवडली,
आता करून बघणार..

JAGOMOHANPYARE's picture

16 Feb 2012 - 11:09 pm | JAGOMOHANPYARE

२६ जानेवारी होऊन गेलि.. ( आमच्याकडे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जिलेबी खातात.. कोल्हापूर जिल्हा)

राजो's picture

17 Feb 2012 - 6:27 pm | राजो

१५ ऑगस्ट/२६ जानेवारी

राजारामपुरी..

जिलेबी स्टॉल्स...

"मेरे देश की धरती... सोना उगले... उगले हीरे.. मोती.."

सूड's picture

16 Feb 2012 - 11:39 pm | सूड

झकासच !!

अन्नू's picture

17 Feb 2012 - 1:38 am | अन्नू

वाव जलेबी... Smiley

विशाखा राऊत's picture

17 Feb 2012 - 2:20 am | विशाखा राऊत

जिलेबी.. क्या बात है पियु.. मस्तच :)

इन्दुसुता's picture

17 Feb 2012 - 9:21 am | इन्दुसुता

जिलब्या आवडल्या... आणि जिल्बुषा हे नाव सुद्धा... :)

sneharani's picture

17 Feb 2012 - 10:50 am | sneharani

मस्त ग!!
ह्या प्रमाणात किती लोकांसाठी जिलेबी बनवता येईल? ;)

मोहनराव's picture

17 Feb 2012 - 1:48 pm | मोहनराव

जिलब्या पडल्याच का शेवटी!! छान हं!!

चिगो's picture

17 Feb 2012 - 2:30 pm | चिगो

जिलेबी मला प्रचंड आवडते, आणि आता त्यांची रेशिपी टाकून आमच्या जिभेची कुचंबणा केल्याबद्दल पियुबैंचा निषेढ.. ;-)

जबरा झाल्यायत जिलेब्या, पियुशा.. तोंडाला पाणी सुटून आता जमिनीवर थारोळं होणार आहे..

सर्व वाचकाना ,
ढॅन्यवादस !!! __/\__

चित्रांवरून तरी सदर जिलब्या ह्या शिकाऊ वाटताहेत. अर्थात त्यांची चव छान असेलही. परंतु जिलबी ही जशी चवीला उत्तम असली पाहिजे तशीच ती दिसायलाही छान हवी. साधारणत: अशी -

असो. पुढील प्रयत्नांकरता शुभेच्छा..

वा वा वा.... इतक्या जिलेब्या बघुन मल्लिका शेरावतचीच आठवण आली-
जलेबी बाई...! ;)

फक्त जिलबीच नाही...कोणताही पदार्थ चवीला आणि दिसायला छान हवा अशीच अपेक्षा असते. पण नेहमीच दिसायला बरा पदार्थ चवीच्या बाबतीत चांगला असेलच असं नाही. त्यामुळे खात्रीशीर ठिकाणीच पदार्थ घेणं कधीही उत्तम.

जेनी...'s picture

17 Feb 2012 - 10:36 pm | जेनी...

मस्त ...

तोन्डाको पाणि सुट्या :Sp :-S) :sick:

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2012 - 3:25 am | प्रभाकर पेठकर

पुर्वी धारा तेलाची एक जाहिरात लागायची. आई बोलते म्हणून एक लहान मुलगा घर सोडून चालला आहे. त्याला 'रामूचाचा' सांगतो, 'घरी आईने जिलेब्या केल्या आहेत' त्यावर आपला सगळा राग विसरून जिलेब्यांच्या स्वप्नात, रंग, रुप आणि स्वादाच्या आठवणीत हरवलेला तो निरागस मुलगा म्हणतो, 'जलेबीSSS?' आणि घरी परततो. ते त्याचे विशिष्ट आवाजातील 'जलेबीSSS?' कायम लक्षात राहिले.
आज पुन्हा जिलेब्यांचे छायाचित्र आणि पाककृती पाहून त्याच मुलाचा तो निरागस, गोSSSड चेहरा डोळ्यांसमोर आला.

छायाचित्र आणि पाककृती नंबर १.

अभिनंदन पियुशा.

चिंतामणी's picture

20 Feb 2012 - 9:18 am | चिंतामणी

ही घ्या ती जाहीरात आणि तो गोड निरागस मुलगा.

प्रभाकर पेठकर's picture

20 Feb 2012 - 4:51 pm | प्रभाकर पेठकर

चिंतामणी साहेब,
मजा आली पुन्हा इतक्या दिवसांनी ती जाहिरात बघताना. धन्यवाद.