Skip to main content

करणी / भानामती खरे कि खोटे

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 16/02/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मि. पा वर करणी भानामती हे खरे कि खोटे ह्या वर बराच गोंधळ उडाला होता, डोळ्यामध्ये खडे घालणारी मुलगी, आणि अंधश्रद्धा निर्मुलन वाले ह्याच्या मध्ये बरीच खडाजंगी चालु होती. ह्या सर्व प्रकारामध्ये मि माझा एक - दोन अनुभव ऐकवू इच्छितो. मी साधारणतः ५-६ मध्ये होतो. त्यावेळी मी माझ्या मावशी कडे शिकायला होतो. त्यावेळेस माझ्या मावशीचे मिस्टर अचानक आजारी पडले. हा हा म्हणता आजार बळावत गेला आणि पाहता पाहता ते अंथरुणाला खीळले, हा डॉक्टर तो वैद्य सर्व उपाय करून झाले. पण काही फरक नाही, शंका कुशंका मनात घर करू लागल्या होत्या, पण सर्व शिकलेले असल्या मुळे करणी भानामती सारख्या कल्पना वर कोणाचाहि विश्वास बसत नव्हता, पण कुठल्याही रोगाचे निदान होत नव्हते. त्या काळी मुंबई च्या मोठ्या दवाखान्यात पण दाखवून काही गुण नव्हता. मला फार काही समजत नसले तरी मोठ्यांच्या गप्पातून त्यांची तब्येत खूप खराब होत आहे हे समजत होते. त्यांचे खाणे पिणे सर्व अंथरुणावर असल्यामुळे आणि मावशी ला मदत म्हणून मी त्यांच्या खोलीत झोपत असे, मला आठवते दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे अभ्यंग स्नानाच्या दिवशी सकाळी ते अचानक जोरात ओरडत होते मी त्याच खोलीत झोपलेलो होतो. उठून पाहतो तर त्यांच्या बेंबी (नाभी ) मधून कापूस जमा झाला होता, त्यांना पोटात खूप दुखत होते. मावशी तो कापूस साफ करत होती व परत परत तेथे कापूस जमा होतो होता. ह्या सर्व प्रकारामुळे मी खूप घाबरलो होतो व तेथे कोपऱ्यात उभा राहून घडलेले सर्व पाहत होतो. घरातील सर्व जन खूप अस्वथ होते, कोणी तरी एका मांत्रिकाला बोलावून आणले. त्याने सांगितले हा करणी चा प्रकार आहे. आणि आमवस्या असल्यामुळे त्यांना त्रास होत आहे. हा त्या करणी व भानामती मधला एक प्रकार आहे. आणि हा प्रकार येथून पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे. त्या दिवसा पासून पुढे बरेच दिवस त्या नाभी तून कापूस निघत होता. आम्ही मुळे तर गमती ने म्हणत पण आसू कि आजी तू हा कापूस का नाही घेत वाती वळायला. कारण तेवढे प्रसंगाचे गांभीर्य आम्हाला नवते. पण पुढे या पेक्षा भयानक प्रसंग येऊ लागले. ते एवढे क्षीण झाले होते कि कूस बदलणे हि मुश्कील होऊन जायचे. वाती भर भात किवा दुध हि त्यांना जात नवते मारता जशी जशी आमावस्या जवळ येत तसा त्यांच्यातला आक्रमक पणा वाढत जात. आमावस्ये च्या रात्री तर ते खूप बे चैन होत, घाण घाण शिव्या देत, त्या रात्री तर आम्ही कोणी भीती पोटी त्या खोली जवळ सुद्धा फिरकत नसू. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत होता. आता मात्र घरच्या मंडळींचा धीर सूटतांना दिसत होता. सगळे रिपोर्ट मात्र नॉर्मल येत असे. त्यामुळे डॉक्टर मंडळी हि चकित होऊ लागली डॉक्टर सोबत मात्रिक पण घरी येऊ लागले होते. हा देव तो देव , ना ना प्रकारचे इलाज करण्यात येऊ लागले. पण काही गुण येत नाही हे पाहून सगळे हतबल होत होते. त्या मध्ये आमावस्ये ला त्यांचे (करणी ) चे प्रताप वाढत होते. मला आठवते तसा एक प्रकार खूप भयानक होता. शिरा पाहिजे म्हणून ते त्या रात्री ओरडू लागले. मावशी तर खूप खूप खुश झाली हा माणूस जेवायला मागतो आहे म्हणून तिने लगेच किचेन मध्ये जाऊन रात्री ११ वाजता शिरा बनविला. त्या माणसाने जवळ पास एक छोटे पातेले भर शिरा खाल्ला. व अजून एक पातेले हवे म्हणून गोंधळ घातला म्हणून मावशी ने अजून शिरा बनवून खाऊ घातला मंडळी २kg जवळ पास त्यांनी शिरा फस्त केला. इथून पुढे तर मटन चिकन च्या फार्मायीशी होऊ लागल्या. ज्या माणसाने कधी अंडा सुद्धा शिवला नाही तो यासर्वाची मागणी करू शकेल??? ज्या माणसाला कूस बदलणे अवघड त्याला आमावस्ये ला दोर खंडाने बांधून ठेवावे लागे का ?? माझा एकदा त्यांनी शर्ट पकडला होता तो अक्षरश फाडून मला माझी सुटका करावी लागली होती, माझ्या वर एवढे प्रेम करणारे काका माझ्या वर एवढे आक्रमक कसे झाले?? या सर्व प्रश्नाची मी उत्तरे आजून शोधात आहे आणि या सगळ्या प्रकारात त्यांची एके दिवशी त्यांची प्राण ज्योत मालवली असो भरपूर गोष्टी आहेत आणि त्या स्व अनुभावाच्या आहेत. त्या आठवणी आल्या तरी अंगावर नुसता काटा येतो. माझा अनुभव सर्व मि. पा. करांसाठी

वाचने 54629
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

खोतानुं, जल्लां तुमी चिपलूनचे ना? मंग ह्ये असले प्ररस्नं पडततंच कशे तुमका? कॉकनातल्या करनी भानामतीच्या गोष्टी सांगल्यांव नाय का तुमका कोनी? तां जांवद्या.. जल्लां सोताच्या दॉल्यांनी बगूनपन इश्वास बसनंव नाय काय तुमचा? खुल्यागत परस्नं इच्यारू नका ह्ये आसले.. काय समजलांव?

आमच्या चाळीत आमच्या घराच्या बरोबर खाली तळमजल्यावर राहणाऱ्या एका कोकणी कुटुम्बाच्या दारासमोर एकदा रात्री अचानक हवेतुन नारळ येउन फुटला. त्यानी बोलावलेल्या मांत्रिकाने हे त्यांच्या एका चुलतभावाने केलेल्या करणीमुळे हे झाले आहे असे पाण्यात बघून सांगितले.घरात एकच गोंधळ उडाला होता आणि त्या चुलत भावावर लगोलग त्या मांत्रिकाने उलट करणी केली असे नंतर आम्हाला कळले. ह्या सर्व प्रकारामुळे मी आणि माझा भाऊ खूप घाबरलो होतो.त्या दिवसानंतर आम्ही घरामध्ये कधीच नारळाने कॅच कॅच खेळलो नाही. पुन्हा खिडकीतून नारळ खाली पडला तर? (सत्य घटना : आशा आहे की त्या कुटुंबातील कोणी हा धागा वाचत नसावा)

त्या दिवसानंतर आम्ही घरामध्ये कधीच नारळाने कॅच कॅच खेळलो नाही. पुन्हा खिडकीतून नारळ खाली पडला तर?
सध्या नारळ पण कित्ती महाग झालेत, नाही? :P

कुणाचा नारळ अन कुणाची "करणी" ! विवेक राव : भानामती च्या संदर्भात काही विशेष अभ्यास करता आहात का ? एक भानामती कट्टा करूया की ?

एवढा दिलखेचक धागा आणि "ओककथा" कश्या नाहीत? कमीतकमी "गळतगेकथा" जरी वाचायला मिळाल्या असत्या तरी धन्य झालो असतो. नारळाची गोष्ट लै भारी. आणखी किस्से येऊद्यात. कमीत कमी शतक दिडशतक तरी फलकावर झळकलेच पाहिजे.

In reply to by रामपुरी

एवढा दिलखेचक धागा आणि "ओककथा" कश्या नाहीत? कमीतकमी "गळतगेकथा" जरी वाचायला मिळाल्या असत्या तरी धन्य झालो असतो. जैसा हुक्म मेरे आका........ ये लिजिए...............................कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण ८. ---

या भानामतीवगैरे बायकांना [?] हेही कळत असले पाहिजे की कोण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत.. त्यांच्या वाटेला जात नाहीत कधी त्या. ज्यांचा विश्वास असतो त्यांनाच नडतात..