✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

करणी / भानामती खरे कि खोटे

व
विवेकखोत यांनी
गुरुवार, 02/16/2012 - 16:18  ·  लेख
लेख
मध्यंतरी मि. पा वर करणी भानामती हे खरे कि खोटे ह्या वर बराच गोंधळ उडाला होता, डोळ्यामध्ये खडे घालणारी मुलगी, आणि अंधश्रद्धा निर्मुलन वाले ह्याच्या मध्ये बरीच खडाजंगी चालु होती. ह्या सर्व प्रकारामध्ये मि माझा एक - दोन अनुभव ऐकवू इच्छितो. मी साधारणतः ५-६ मध्ये होतो. त्यावेळी मी माझ्या मावशी कडे शिकायला होतो. त्यावेळेस माझ्या मावशीचे मिस्टर अचानक आजारी पडले. हा हा म्हणता आजार बळावत गेला आणि पाहता पाहता ते अंथरुणाला खीळले, हा डॉक्टर तो वैद्य सर्व उपाय करून झाले. पण काही फरक नाही, शंका कुशंका मनात घर करू लागल्या होत्या, पण सर्व शिकलेले असल्या मुळे करणी भानामती सारख्या कल्पना वर कोणाचाहि विश्वास बसत नव्हता, पण कुठल्याही रोगाचे निदान होत नव्हते. त्या काळी मुंबई च्या मोठ्या दवाखान्यात पण दाखवून काही गुण नव्हता. मला फार काही समजत नसले तरी मोठ्यांच्या गप्पातून त्यांची तब्येत खूप खराब होत आहे हे समजत होते. त्यांचे खाणे पिणे सर्व अंथरुणावर असल्यामुळे आणि मावशी ला मदत म्हणून मी त्यांच्या खोलीत झोपत असे, मला आठवते दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे अभ्यंग स्नानाच्या दिवशी सकाळी ते अचानक जोरात ओरडत होते मी त्याच खोलीत झोपलेलो होतो. उठून पाहतो तर त्यांच्या बेंबी (नाभी ) मधून कापूस जमा झाला होता, त्यांना पोटात खूप दुखत होते. मावशी तो कापूस साफ करत होती व परत परत तेथे कापूस जमा होतो होता. ह्या सर्व प्रकारामुळे मी खूप घाबरलो होतो व तेथे कोपऱ्यात उभा राहून घडलेले सर्व पाहत होतो. घरातील सर्व जन खूप अस्वथ होते, कोणी तरी एका मांत्रिकाला बोलावून आणले. त्याने सांगितले हा करणी चा प्रकार आहे. आणि आमवस्या असल्यामुळे त्यांना त्रास होत आहे. हा त्या करणी व भानामती मधला एक प्रकार आहे. आणि हा प्रकार येथून पुढे वाढत जाण्याची शक्यता आहे. त्या दिवसा पासून पुढे बरेच दिवस त्या नाभी तून कापूस निघत होता. आम्ही मुळे तर गमती ने म्हणत पण आसू कि आजी तू हा कापूस का नाही घेत वाती वळायला. कारण तेवढे प्रसंगाचे गांभीर्य आम्हाला नवते. पण पुढे या पेक्षा भयानक प्रसंग येऊ लागले. ते एवढे क्षीण झाले होते कि कूस बदलणे हि मुश्कील होऊन जायचे. वाती भर भात किवा दुध हि त्यांना जात नवते मारता जशी जशी आमावस्या जवळ येत तसा त्यांच्यातला आक्रमक पणा वाढत जात. आमावस्ये च्या रात्री तर ते खूप बे चैन होत, घाण घाण शिव्या देत, त्या रात्री तर आम्ही कोणी भीती पोटी त्या खोली जवळ सुद्धा फिरकत नसू. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत होता. आता मात्र घरच्या मंडळींचा धीर सूटतांना दिसत होता. सगळे रिपोर्ट मात्र नॉर्मल येत असे. त्यामुळे डॉक्टर मंडळी हि चकित होऊ लागली डॉक्टर सोबत मात्रिक पण घरी येऊ लागले होते. हा देव तो देव , ना ना प्रकारचे इलाज करण्यात येऊ लागले. पण काही गुण येत नाही हे पाहून सगळे हतबल होत होते. त्या मध्ये आमावस्ये ला त्यांचे (करणी ) चे प्रताप वाढत होते. मला आठवते तसा एक प्रकार खूप भयानक होता. शिरा पाहिजे म्हणून ते त्या रात्री ओरडू लागले. मावशी तर खूप खूप खुश झाली हा माणूस जेवायला मागतो आहे म्हणून तिने लगेच किचेन मध्ये जाऊन रात्री ११ वाजता शिरा बनविला. त्या माणसाने जवळ पास एक छोटे पातेले भर शिरा खाल्ला. व अजून एक पातेले हवे म्हणून गोंधळ घातला म्हणून मावशी ने अजून शिरा बनवून खाऊ घातला मंडळी २kg जवळ पास त्यांनी शिरा फस्त केला. इथून पुढे तर मटन चिकन च्या फार्मायीशी होऊ लागल्या. ज्या माणसाने कधी अंडा सुद्धा शिवला नाही तो यासर्वाची मागणी करू शकेल??? ज्या माणसाला कूस बदलणे अवघड त्याला आमावस्ये ला दोर खंडाने बांधून ठेवावे लागे का ?? माझा एकदा त्यांनी शर्ट पकडला होता तो अक्षरश फाडून मला माझी सुटका करावी लागली होती, माझ्या वर एवढे प्रेम करणारे काका माझ्या वर एवढे आक्रमक कसे झाले?? या सर्व प्रश्नाची मी उत्तरे आजून शोधात आहे आणि या सगळ्या प्रकारात त्यांची एके दिवशी त्यांची प्राण ज्योत मालवली असो भरपूर गोष्टी आहेत आणि त्या स्व अनुभावाच्या आहेत. त्या आठवणी आल्या तरी अंगावर नुसता काटा येतो. माझा अनुभव सर्व मि. पा. करांसाठी
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54374 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

आपले मत व्यक्त करताना लेखकाच्या भावनांचा हि विचार व्हावा.

विवेकखोत
Fri, 02/17/2012 - 13:36 नवीन
हा सर्व प्रकार संपत्ती च्या वादाचा आहे, पण असो जुन्या गोष्टी उकरून काढून मनस्ताप करून घेण्याची माझी इच्छा नाही. आणि बोलणार्या लोकांपैकी स्वतः अनुभव असणारे मला नाही वाटत कोणी आहे, मी ऐकले, त्याने सांगितले असे बोलणारे भरपूर लोक आहेत, आणि आमच्या घरात बरेच लोक उच्य शिक्षित आहेत त्या मुळे मनोविकार, इतर काही रोग वा अजून काही आणि करणी या प्रकारामध्ये गल्लत होणार नाही बाकीच्या लोकांसाठी हा कदाचित चेष्टेचा विषय असेल पण आमच्या साठी नक्कीच नाही, जेव्हा या कारण मुळे एखादा माणूस दगावतो तेवा तर नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

हा सर्व प्रकार संपत्ती च्या

मृगनयनी
Fri, 02/17/2012 - 14:31 नवीन
हा सर्व प्रकार संपत्ती च्या वादाचा आहे, पण असो जुन्या गोष्टी उकरून काढून मनस्ताप करून घेण्याची माझी इच्छा नाही.
:| ह्म्म्म... जर तुम्हाला माहित आहे, की हा प्रकार सम्पत्तीच्या वादातून निर्माण झालेला आहे आणि जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढून मनस्ताप करवून घेण्यात तुम्हाला रस नाहीये.. तर मग हा धागा काढलाच्च्च का... असाही एक मोठ्ठा प्रश्न येतोच्च!!!!
आणि बोलणार्या लोकांपैकी स्वतः अनुभव असणारे मला नाही वाटत कोणी आहे, मी ऐकले, त्याने सांगितले असे बोलणारे भरपूर लोक आहेत,
बरं... मग आम्ही असा काही अनुभव घ्यावा.. अशी इच्छा आहे का तुमची? :|
आणि आमच्या घरात बरेच लोक उच्य शिक्षित आहेत
आमच्या घरात सगळेच जण उच्चशिक्षित आहेत...
त्या मुळे मनोविकार, इतर काही रोग वा अजून काही आणि करणी या प्रकारामध्ये गल्लत होणार नाही
आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही... की उच्चशिक्षित लोकांना मनोविकार होत नाही..असे म्हणायचे आहे का?
बाकीच्या लोकांसाठी हा कदाचित चेष्टेचा विषय असेल पण आमच्या साठी नक्कीच नाही, जेव्हा या कारण मुळे एखादा माणूस दगावतो तेवा तर नक्कीच नाही.
माझ्याकडून मी तुम्हाला काही उपाय सुचवलेले आहेत.. जे तुम्ही आत्ताही अ‍ॅप्लाय करू शकतात.... :) आणि चेष्टेबद्दलच्च म्झणत असाल, तर तुम्ही या तुमच्या लेखात देखील... "पोटातून बाहेर पडणार्‍या कापसाच्या वाती करायच्या" ...वगैरे सन्दर्भ देऊन तुमच्या काकांना झालेल्या भनामतीची थट्टाच्च्च केलेली आहे की!!!!... तेव्हा तुम्हाला दगावणार्‍या माणसाबद्दल- काकांबद्दल काहीच कसे वाटले नाही हो!!!! :| _______ अर्थात शेवटी येवढा मनस्ताप करून घेण्यापेक्षा तुम्ही हा धागा काढायलाच्च नको होता.. असे मनापासून वटते.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

मला वाटते आहे कि थोडे विषयांतर होत आहे,

विवेकखोत
Fri, 02/17/2012 - 14:50 नवीन
अहो मृग नयनी मला वाटते आहे कि थोडे विषयांतर होत आहे, या सर्व प्रकारास १८ वर्षा पेक्षा हि जास्त कालावधी लोटला असून मध्यंतरी मि. पा वर अंध श्रद्धे चा विषय सुरु झाल्या मुळे आठवला, १) "पोटातून बाहेर पडणार्‍या कापसाच्या वाती करायच्या" .. त्या वेळेस मि इयत्ता ५ मध्ये असल्याचे हि नमूद केले आहे, २) आमच्या घरात सगळेच जण उच्चशिक्षित आहेत. म्हणजे करणी किवा मनोविकार हे समजण्यात गल्लत करणार नाही असे म्हणायचे होते. ३)अर्थात शेवटी येवढा मनस्ताप करून घेण्यापेक्षा तुम्ही हा धागा काढायलाच्च नको होता.. असे मनापासून वटते बऱ्याच लोकांसाठी करणी हा निव्वळ थट्टेचा विषय असतो वा आहे वरील प्रतिक्रिया वलयात तर तुमाला कळेल ४) आणि जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढून मनस्ताप करवून घेण्यात तुम्हाला रस नाहीये. कारण या गोष्टी का झाल्या कोणी केल्या या आठवण्यात किवा प्रकाशित करण्यात रस नाही आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

२) आमच्या घरात सगळेच जण

गवि
Fri, 02/17/2012 - 15:08 नवीन
२) आमच्या घरात सगळेच जण उच्चशिक्षित आहेत. म्हणजे करणी किवा मनोविकार हे समजण्यात गल्लत करणार नाही असे म्हणायचे होते. या धाग्यावर मी तिसर्‍याचौथ्यांदा तेच म्हणतो की तुम्हाला खात्रीच आहे की हा मनोविकार नाही आणि भानामती / करणी आहे.. भले ती इस्टेटीच्या वादातून असो की आणखी काही.. तुम्ही हे अमानवी अतींद्रिय अनुभव स्वतःला आले असं म्हणता (भले पाचवीत का असेना) तरीही तुम्ही हे सर्व लिहीताना "करणी / भानामती खरे की खोटे" अशी शंका उत्पन्न करता.. तुमचा उद्देश लोकांचं मत विचारण्याचा आहे की करणी भानामती आहेच्च मुळी हे सांगण्याचा आहे? अर्थात तुम्ही हे सांगू इच्छिता, विचारु किंवा चर्चा करु इच्छित नाही.. या आधी हेच वक्रोक्तीने म्हटलं होतं.. पण चेष्टेने / टिंगलीने नक्कीच नव्हे.. आणि ज्या विषयाची टिंगल झाली तर दुखावले जाईल असे विषय शक्यतो पब्लिकली मांडू नयेय, इन दॅट केस.. खरं तर उदाहरण द्यायची गरज नाही पण वेळ आहे म्हणून लिहितो.. समजा मी इथे धागा काढून म्हटलं की "माझे दिवंगत वडील मला त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी अमावास्येला त्यांच्या खुर्चीत बसलेले दिसले." मला खात्री आहे की ते माझे वडीलच होते. मला मनोविकार असण्याचा प्रश्नच नाही. तर माझा प्रश्न असा की भुतेखेते खरी की खोटी? आता पहा.. इथे मला मृत व्यक्ती दिसल्याची खात्री आहे.. म्हणजे "भूत खरे" असं माझं पक्कं विधान आहे.. तरीही मी प्रश्न विचारायचा की ते खरं की खोटं.. कोणी उलट मत दिलं की खोटं.. तर म्हणायचं "मी सुशिक्षित आणि शहाणा असल्याने भास आणि सत्य यातला फरक मला कळतो. मी दारुही पीत नाही. त्यामुळे मानसिक असणं शक्यच नाही.." जर कोणी गमतीने काही बोललं की "काय म्हणाले वडील?", "अभ्यास करण्यावरुन ओरडले का?" इ इ. तर म्हणायचं की माझ्या वडिलांबाबतीतली ही वेदनादायक आठवण आहे.. या बाबतीत चेष्टेचा विषय होऊ शकत नाही.. --------------- अशा रितीने काथ्याकूट होऊ शकत नाही हो साहेब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

यांचे पाय (आणि हातही) धरा रे

यकु
Fri, 02/17/2012 - 15:25 नवीन
यांचे पाय (आणि हातही) धरा रे कुणीतरी.. गविकाकांच सदर सुरु कराच संपादको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रचंड अनुमोदन!!!! गविकाकांचे

अन्या दातार
Fri, 02/17/2012 - 16:12 नवीन
प्रचंड अनुमोदन!!!! गविकाकांचे सदर चालू झालेच्च पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

+१

हंस
Sat, 02/18/2012 - 12:11 नवीन
हमारी मांग पुरी करो, वरना.......... (सं.मं. हळुच घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

कुणी प्रोफेशनल करणी/भानामती करणारे माहीत आहेत का?

दादा कोंडके
Fri, 02/17/2012 - 14:38 नवीन
राजा, कलमाडी यांच्यावर करावी म्हणतोय. स्पाँसर तर करेनच शिवाय त्यासाठी कलमाडीच्या दाढीचा केस उपटून आणण्याची 'रीक्स' घ्यायला तयार आहे. :) अजुनही ब्लॅकलीस्ट वर बरेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

=)) =)) =)) =)) =))

मृगनयनी
Fri, 02/17/2012 - 14:43 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) दादा कोन्डके'जी... त्यापेक्षा एखाद्या हत्तीच्या शेपटीचा केस उपटून तो सोन्याच्या अन्गठीत घालून ती अन्गठी परिधान करा... एका आठवड्याच्या आत करोडों रुपयांमध्ये लोळाल!!! ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

मी १३ वर्षाचा होतो तेव्हां

आत्मशून्य
Fri, 02/17/2012 - 15:12 नवीन
मी १३ वर्षाचा होतो तेव्हां सहल म्हणुन मित्राच्या एका शेतामधे हुरडा खायला व १ रात्र जागायला गेलो होतो. रात्री ८ वाजता सोबतीला चंद्रप्रकाश असुनही घनदाट भासणार्‍या काळोखात आम्ही ४ जण हातात टॉर्च सांभाळत शेतामधे पाउल वाटांनी गप्पा मारत फिरत होतो. मला लहर आली म्हणुन कंपुपासुन मी जरासा मागे थांबलो तो कोणी तरी सटकन माझ्या कानाखाली वाजवली. व दबकं कुजबुजत हसणं माझ्या कानी आलं, इथं थांबण्यात माझं काय चुकलं ? मी चोर वगैरे नाही अशा नजरेत वर बघीतलं , तो डोळ्यामधे केवळ चंद्रप्रकाश घुसला इतर काही कळलचं नाही, लगेच आजु बाजुला बघीतलं तर कोणीही न्हवतं. परीसर संपुर्ण सपाट होता कोठेही लपायला खड्डा, झाड, आडोसा वगैरे जवळपास न्हवत की चटकन गायब होता यावं. मला लागलं तसच जोरात आवाजही झाला जे समोर चालणार्‍या मित्रांना सहज ऐकु जाणे अपेक्शीत होते. पण ते चालतच राहीले. जेव्हां मला हाक दिली अरे मागे का थांबला आहेस ? मी त्यांना विचारलं आता इथे इतर कोणी आहेत काय , शेतात काम करणारे लोकं वगैरे ? अर्थातच नकार आला. त्यांना मी सांगितलं मला कोणी तरी मारलं आहे म्हणुन मी मागे पडलो होतो पण बाजुला कोणीच दिसत नाहीये .... तर अर्थात त्यांनी हसण्यावारी न्हेलं. मी सुध्दा या घटनेचा धसका वगैरे कधीच घेतला नाही, वा आजही मला याचा फोबीया वगैरे तर अजिबात नाही. पण घडलेल्या घटनेचं कुतुहल आहे. राहीली गोश्ट भानामती/करणीची तर स्वतःला मला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात. एकदा एका मित्राला कर्वे पुतळ्या जवळील एका नाडी केद्रांत घेउन गेलो होतो (तिथं काय घडलं ही वेगळी गोश्ट आहे) तर त्या केद्रां बाहेर करणीचे लाल लिंबु आम्हाला पडलेले दिसले होते. पण एक असा नगही माझ्या चांगल्या माहीतीत आहे जो सकाळ झाली की करणीची (लाल) लिंब हुडकत त्याच्या गावभर फिरतो व पुरेशी जमल्यावर त्याचे सरबत बनवुन फार आवडीने पितो. नादच आहे त्याचा तो.
  • Log in or register to post comments

तरीच!! मला राहून राहून तुझ्या

यकु
Fri, 02/17/2012 - 16:20 नवीन
तरीच!! मला राहून राहून तुझ्या कानाखाली का मारावी वाटायची. (ब्लॅकबेल्ट धारक आहेस हे माहितीय म्हणून गप बसलोय ;-)) भूताला पण तसंच वाटलेलं, म्हणजे बघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अरे आता करा मारामारी ..

गवि
Fri, 02/17/2012 - 16:24 नवीन
अरे आता Image removed. करा मारामारी ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सुरक्षित

पैसा
Fri, 02/17/2012 - 16:32 नवीन
सुरक्षित अंतर ठेवा! (यशवंता सुरक्षित अंतरावर आहे, म्हणून एवढ्या जोरात बोलतोय!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यशवंता खरा हुशार आहेस रे बाबा!

आत्मशून्य
Fri, 02/17/2012 - 17:25 नवीन
वेळीच आवरलसं की स्वतःला. कारण मी भुताचा मुर्खपणा सहन करु शकेन ! महा-मुर्खाचा न्हवे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

तरी पण मी आज रुम वर येणार

यकु
Fri, 02/17/2012 - 17:27 नवीन
तरी पण मी आज रुम वर येणार नाहीये ऽऽऽऽ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

पोरा, Stupidity isn't इतकी always painful... रे

आत्मशून्य
Fri, 02/17/2012 - 18:00 नवीन
जिथे असशील तिथुन असशील तसाच परत ये, वा हे वाचल्या वाचल्या ताबडतोप फोन कर. या शाहण्या लोकांच्या जगात तुझा कसा निभाव लागणार याची फार चिंता वाटु राहीली है. माझंही काही चुकलं माकलं वाटत असेल्/नसेल तरीही क्षमा कर. इतकच काय तुझ्या कधी ही नसुटणार्‍या मुर्खपणाबद्दल इथे तुला कोणी काहीही टाकुन बोलणार नाही, अगदी एका शब्दानेही... मग तरं झालं ? आता राग गिळुन टाक बघु ;) १० ते १ उलट आकडे मोजत शाहण्या बाळा सारखं लवकर परत ये रे मुडद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

छान छान गोष्टी!

कवितानागेश
Fri, 02/17/2012 - 16:39 नवीन
छान छान गोष्टी! पण अशा बेसिक गोष्टीवर गोंधळ निर्माण होउन धागा काढवा याचे वाईट वाटतंय... माणसाची मते नेहमीच ठाम असवीत, मग भले ती चुकीची का असेनात! अवांतरः हव्या तिथे, हव्या तशा, हव्या तेवढ्या स्मायली आपल्या पण टाकून घ्याव्यात. कारण येथे आंतर्जाल शुद्धीकरण मोहिम चालू आहे.
  • Log in or register to post comments

अजून लोकांचे 'अनुभव' ऐकायला

गणपा
Fri, 02/17/2012 - 16:48 नवीन
अजून लोकांचे 'अनुभव' ऐकायला आवडतील.
  • Log in or register to post comments

अजून लोकांचे 'अनुभव' ऐकायला

मृगनयनी
Fri, 02/17/2012 - 20:58 नवीन
अजून लोकांचे 'अनुभव' ऐकायला आवडतील. बॉर्र.... सत्यसाईबाबांना म्हणे एक कर्णपिशाच्च वश झाले होते. हातचलाखीने स्वतःच्या किमोनोतून भस्म, उदी वगैरे काढण्याचे काम फक्त सत्यसाईबाबा स्वतःचे स्वतः करायचे.. बाकी "कुणाचे काय "चाल्लेये.. कोणाच्या काय व्यथा आहेत.. हे ते "कर्णपिशाच्च" सत्यसाईबाबांना कानात सान्गायचे.. आणि अर्थातच ते पिशाच्च फक्त स.सा.बा. नाच्च दिसायचे... स.सा.बा.'च्या मृत्यूनन्तर ते पिशाच्च कुठे गेलं.. हे माहित नाही....... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

स.सा.बा. नंतर ते पिशाच्च निवृत्त झाले असेल !

तर्री
Fri, 02/17/2012 - 21:21 नवीन
अपनेही जाल मी शिकारी फस गया था अबउसे मुक्ती मिली.
  • Log in or register to post comments

!

मेघवेडा
Fri, 02/17/2012 - 22:49 नवीन
खोतानुं, जल्लां तुमी चिपलूनचे ना? मंग ह्ये असले प्ररस्नं पडततंच कशे तुमका? कॉकनातल्या करनी भानामतीच्या गोष्टी सांगल्यांव नाय का तुमका कोनी? तां जांवद्या.. जल्लां सोताच्या दॉल्यांनी बगूनपन इश्वास बसनंव नाय काय तुमचा? खुल्यागत परस्नं इच्यारू नका ह्ये आसले.. काय समजलांव?
  • Log in or register to post comments

आमच्या चाळीतील भानामती

संपत
Fri, 02/17/2012 - 22:53 नवीन
आमच्या चाळीत आमच्या घराच्या बरोबर खाली तळमजल्यावर राहणाऱ्या एका कोकणी कुटुम्बाच्या दारासमोर एकदा रात्री अचानक हवेतुन नारळ येउन फुटला. त्यानी बोलावलेल्या मांत्रिकाने हे त्यांच्या एका चुलतभावाने केलेल्या करणीमुळे हे झाले आहे असे पाण्यात बघून सांगितले.घरात एकच गोंधळ उडाला होता आणि त्या चुलत भावावर लगोलग त्या मांत्रिकाने उलट करणी केली असे नंतर आम्हाला कळले. ह्या सर्व प्रकारामुळे मी आणि माझा भाऊ खूप घाबरलो होतो.त्या दिवसानंतर आम्ही घरामध्ये कधीच नारळाने कॅच कॅच खेळलो नाही. पुन्हा खिडकीतून नारळ खाली पडला तर? (सत्य घटना : आशा आहे की त्या कुटुंबातील कोणी हा धागा वाचत नसावा)
  • Log in or register to post comments

भले!

अन्नू
Fri, 02/17/2012 - 23:00 नवीन
त्या दिवसानंतर आम्ही घरामध्ये कधीच नारळाने कॅच कॅच खेळलो नाही. पुन्हा खिडकीतून नारळ खाली पडला तर?
सध्या नारळ पण कित्ती महाग झालेत, नाही? :P
  • Log in or register to post comments

हाहाह..

तर्री
Fri, 02/17/2012 - 23:02 नवीन
कुणाचा नारळ अन कुणाची "करणी" ! विवेक राव : भानामती च्या संदर्भात काही विशेष अभ्यास करता आहात का ? एक भानामती कट्टा करूया की ?
  • Log in or register to post comments

एवढा दिलखेचक धागा आणि "ओककथा"

रामपुरी
Sat, 02/18/2012 - 02:54 नवीन
एवढा दिलखेचक धागा आणि "ओककथा" कश्या नाहीत? कमीतकमी "गळतगेकथा" जरी वाचायला मिळाल्या असत्या तरी धन्य झालो असतो. नारळाची गोष्ट लै भारी. आणखी किस्से येऊद्यात. कमीत कमी शतक दिडशतक तरी फलकावर झळकलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments

हे घ्या

हंस
Sat, 02/18/2012 - 12:22 नवीन
एवढा दिलखेचक धागा आणि "ओककथा" कश्या नाहीत? कमीतकमी "गळतगेकथा" जरी वाचायला मिळाल्या असत्या तरी धन्य झालो असतो. जैसा हुक्म मेरे आका........ ये लिजिए...............................कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण ८. ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

या भानामतीवगैरे बायकांना [?]

एम.जी.
Sun, 02/19/2012 - 21:41 नवीन
या भानामतीवगैरे बायकांना [?] हेही कळत असले पाहिजे की कोण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत.. त्यांच्या वाटेला जात नाहीत कधी त्या. ज्यांचा विश्वास असतो त्यांनाच नडतात..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा