घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही
कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही
आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही
तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही
तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही
मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही
बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही
तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?
बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही
-अनिरुद्ध अभ्यंकर
वाचने
6911
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा!
हा हा!!
In reply to वाहवा! by प्रियाली
खूप छान
अनिरुद्ध
अभ्यंकरजी
उत्तम रचना
वा वा वा! अनिरुद्ध फारच छान गजल.
ह्याच दोन
In reply to वा वा वा! अनिरुद्ध फारच छान गजल. by चतुरंग
सुंदर..
बघत राहिलो दूर तुला ठिपका होताना
नवता
"फ्लॅट" आणि बहुपेडी
In reply to नवता by मुक्तसुनीत
पाल्हाळ नव्हे ..
In reply to "फ्लॅट" आणि बहुपेडी by चित्तरंजन भट
सुरेख
सुरेख
सहमत!!! छान
In reply to सुरेख by वरदा
कोणत्या
सुंदर!
हसरत मोहानी
In reply to सुंदर! by धनंजय
खणखणीत
धन्यवाद!!
बघत राहीलो