कालचा व्हॅलेन्टाइन डे , " ब्युटी अँड द बीस्ट" हा कार्टून सिनेमांमधील माझा सर्वात लाडका सिनेमा पाहून मी साजरा केला. लहानपणी बाबांबरोबर हा सिनेमा पाहील्याचे आठवते. तेव्हा खूप म्हणजे खूपच आवडला होता. स्नो व्हाईट , लेडी अँड द ट्रँप वगैरे सिनेमे तर या सिनेमापुढे कुछ भी नही असे तेव्हा वाटले होते. याचे मुख्य कारण स्नोव्हाईट इतकी गोरीपान, फुलासारखी छान आहे की तिच्याशी स्वतःला "आयडेंटीफाय" करताच येत नाही. याउलट ब्युटी अतिशय "प्लेन" आणि पुस्तकी कीडा आहे. लहानपणी मी सहज ब्युटीशी स्वतःला आयडेंटीफाय करू शकले असावे. ते असो. पुढे माझ्या मुलीबरोबर एक रिमेक पहाण्याचा योग आला होता पण त्याला ओरीजनल डिस्ने ची सर नखभर देखील नव्हती.
तर काय सांगत होते, काल मला डेस्परेटली हा सिनेमा पहायचा होता पण सार्याच मैत्रिणी "बिझी बिझी" मग काय एकटी उठले केली टॅक्सी आणि व्हॅलेंटाइन्स डे की शाम डिस्ने के नाम करून आले. पण खरच आता प्रौढ वयात या सिनेमाचा आनंद पुनश्च लुटताना ती संध्याकाळ अक्षरक्षः सत्कारणी लागली. मी हसले, रडले, घाबरले, रोमांचित झाले. किती नाना प्रकारच्या भावना त्या जादूमय चित्रांनी मनात उचळंबविल्या.
बेल ही काही पारंपारीक रीत्या सुंदर म्हणावी अशी तरुणी नाही. तसं पाहता गेलं तर पाश्चात्य जगात "फेमिनाइन" समजला जाणारा गुलाबी रंग एकदाही तिच्या अंगावरील वस्त्रप्रावरणात दिसत नाही. तिचे रंग आहेत निळा आणि पिवळा. ती खरे पाहता कल्पनेत रममाण होणारी, पुस्तकांच्या राज्यात स्वतःला हरवून बसणारी अशी "इंटुक" म्हणावी अशी मुलगी आहे. संपूर्ण सिनेमाचे कथानक तिच्या त्यागावर , तिच्या आंतरीक शक्तीवर उभे आहे. स्वतःच्या स्वातंत्र्याचे बलीदान करून तिने बीस्टच्या पडक्या राजवाड्यात जन्मभर रहाणे स्वीकारले आहे.
बीस्ट स्वतः तर अतिशय कुरुप, हिडीस आहे. तो रागीट आहे, शीघ्रकोपी आहे पण मनाने तितकाच दयाळू आहे. शापदग्ध राजपुत्र असल्याने दिसावयास कितीही अक्राळविक्राळ असला तरी त्याचे मन मात्र मानवी आहे. पुढे त्या दोघांची जसजशी मैत्री होत जाते तसतसा तो अधिकाधिक "रिलॅक्स" होत जातो, त्याचे भाव कोमल बनत जातात, त्याच्या कृतीमधून ते प्रतीत होतात आणि डिस्नेच्या कुंचल्याची कमाल, संगीतकाराच्या संगीताची जादू आपल्या डोळ्यात पाणी उभे करते.
२ सुरेख संदेश लहान मुलांपर्यंत पोहोचविण्यात, त्यांच्यावर बिंबविण्यात हा सिनेमा अतिशय आकर्षकरीत्या यशस्वी होतो - एक म्हणजे बाह्य सौंदर्यास महत्व न देणे आणि दुसरे प्रेमात असलेली ताकद जिच्या योगे व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र स्थित्यंतर येऊ शकते आणि एका बीस्ट चे रुपांतर राजपुत्रात होऊ शकते.
नायक-नायिका वगळता अन्य पात्रे देखील फार मजेशीर आहेत. बीस्ट चा आवाज ज्याचा कोणाचा आहे पण ऐकायला खूप छान वाटतो. कथेत "गॅस्टन" नावाचा एक रेमेडोके व्हीलन देखील आहे.
आपल्या मुलांना जरूर दाखवावा असा सिनेमा आहे.
वाचने
3553
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
झाली का परीक्रमा? लेख टाक.
In reply to :) by आत्मशून्य
आलास का परत?
In reply to :) by आत्मशून्य
काय हे ?
+१
In reply to काय हे ? by परिकथेतील राजकुमार
अॅनिमेशन पटाबद्दल म्हणताय की
अॅनिमेशनपट.
In reply to अॅनिमेशन पटाबद्दल म्हणताय की by गणपा
हायला !
In reply to अॅनिमेशन पटाबद्दल म्हणताय की by गणपा
चाळीशी आली दुसर काय?
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
याच चित्रपटावरील माझा थोडा
शुचि, खरेच हा एक नितांतसुंदर
शुची धन्यवाद!
छान ओळख करून दिलीस.
सुरेख
बीस्ट ज्याने साकार केला त्या
धन्स.
छान ओळख करुन दिलीत. जाता
छान ओळख करुन दिलीत, आणि
सर्वांचे मन:पूर्वक आभार.