आज प्रेमदिन आणी एकही पाकृ नाही???? असे आत्ताच आपल्या एका मिपाकर मैत्रीणीने विचारले...असं कसं होईल...आजचा दिवस खास आहे म्हणून खास पाकृ देत आहे :) तुम्ही नक्की करुन पहा आणी आपल्या प्रियजनांना खाऊ घाला :)
अतिशय सोप्पी आणी नो बेक... नो एग अशी पा़कृ आहे ;)
साहित्यः
२०० ग्राम क्रीम चीज
१५० मिली फ्रेश क्रीम
२५० ग्राम कॅन्ड मॅंगो पल्प (आंब्याच्या सीझनमध्ये ताजा आमरस वापरलात तर उत्तम)
१-१/२ वाटी मारी किंवा कुठल्याही डायजेस्टीव्ह बिस्किटांचा चुरा
२-३ टेस्पून बटर
१/२-३/४ वाटी साखर (रसाच्या गोडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टेस्पून जिलेटीन पावडर
दीड टीस्पून वेलचीपूड
पाकृ:
प्रथम मारी बिस्किटांच्या चुर्यात वितळलेले बटर घालून नीट एकजीव करावे.
तुमच्याकडे जर का स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर त्यात ह्या बटर घातलेल्या चुर्याचा बेस दाबून तयार करावा. नसेल तर कुठल्याही बाऊल/ वाईन ग्लासमध्ये चमच्या च्या मदतीने बेस दाबून तयार करावा. तयार ग्लासेस / टीन फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.
आता मिक्सींग बाऊलमध्ये क्रीमचीज, फ्रेश क्रीम व साखर घालून बीटरने फेटून घ्यावे.
३ टेस्पून पाणी मायक्रोव्हेवमध्ये १०-१५ सेकंद गरम करून घ्यावे व त्यात १टेस्पून जिलेटीन पावडर घालून ती पूर्ण विरघळू द्यावी. हे मिश्रण आंब्याच्या रसात घालून एकजीव करावे. (घाई गडबडीत ह्याचे फोटो काढायचे राहून गेले :( )
आता अर्ध्यापेक्षा जास्त जिलेटीनमिश्रीत आंब्याचा रस त्यात घालावा. वेलचीपूड घालून परत एकदा बीटरने बीट करुन घ्यावे.
फ्रिजमध्ये ठेवलेले ग्लासेस/ टीन काढून त्यावर ह्या चीजच्या मिश्राणाचा जाडसर थर पसरावा.पुन्हा फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.
१५ मिनिटांनी त्यावर उरलेल्या आंब्याच्या रसाचा थर द्यावा व रात्रभर फ्रिजमध्ये किंवा ६-७ तास सेट होण्यासाठी ठेवावे.
दुसर्या दिवशी स्प्रींगफोर्म केकटीनच्या कडेने हलकेच सुरी फिरवून त्याचे रिंगण काढावे. आवडत असल्यास त्यावर चॉकलेट सॉस / मिश्र फळ्यांच्या/ आंब्याचा तुकड्यांनी किंवा असेच पुदिनाची पाने लावून सर्व्ह करावे.
ग्लासमध्ये सर्व्ह करत असाल तर असेच सर्व्ह करा दिसायला ही छान दिसतं :)
मिपावर येऊन एक वर्ष कधी पूर्ण झाले समजले नाही... आज ही पाकृ तुम्हा सगळ्या मिपाकर मित्र-मैत्रीणींसाठी आहे :) असेच प्रेम असु द्या :)
वाचने
18472
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज एखादी तायडी काही तरी
खल्लास!!!!!! ते कोको पावडरने
अगं ते कोको पावडरचा
In reply to खल्लास!!!!!! ते कोको पावडरने by प्राजु
वॉव....! छान आयडीया आहे..
In reply to अगं ते कोको पावडरचा by सानिकास्वप्निल
जबरा !!!!!! कातील,
In reply to खल्लास!!!!!! ते कोको पावडरने by प्राजु
तोंपासू..
(No subject)
पहाता क्षणीच खावासा वाटणारा
झक्कास ..मस्त..लाजवाब....
लाजवाब!!!
समयोचित व सुंदर
अग्ग्ग्ग्ग! भारी
शब्द नुरले !!!!!!
In reply to अग्ग्ग्ग्ग! भारी by रेवती
मस्त
अतिशय सुंदर.......करुनच पहाते
खल्लास
आई आई गं!!
झकास.. कसला केक बनला आहे आणि
उत्कृष्ट.... फार आवडली
तुम्ही जेंव्हा भारतात याल ना
५० जपून बरं... चमचे मागता
In reply to तुम्ही जेंव्हा भारतात याल ना by ५० फक्त
व्वा !!!
आई गं...... कातिल
मस्तच. नक्की करुन बघेन.
आभार!!
खल्लास!
सुपर्ब
सुरेख!!
..
ज ह ब ह र ह !!!
खल्लास!
हाय सानिका, तुझ्या पाककृती
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
In reply to हाय सानिका, तुझ्या पाककृती by चैत्रपालवी
थॅन्क यू वेरी मच सानिका.
हा तुमची रेशिपी बघून बनवला.
वरच्या फोटोच्या जवळ ठेवला तर
In reply to हा तुमची रेशिपी बघून बनवला. by सूड
अगदी!!
In reply to वरच्या फोटोच्या जवळ ठेवला तर by उगा काहितरीच