Skip to main content

मॅंगो चीजकेक ...खास प्रेमदिनानिम्मीत्त

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 14/02/2012 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रेमदिन आणी एकही पाकृ नाही???? असे आत्ताच आपल्या एका मिपाकर मैत्रीणीने विचारले...असं कसं होईल...आजचा दिवस खास आहे म्हणून खास पाकृ देत आहे :) तुम्ही नक्की करुन पहा आणी आपल्या प्रियजनांना खाऊ घाला :) अतिशय सोप्पी आणी नो बेक... नो एग अशी पा़कृ आहे ;) साहित्यः २०० ग्राम क्रीम चीज १५० मिली फ्रेश क्रीम २५० ग्राम कॅन्ड मॅंगो पल्प (आंब्याच्या सीझनमध्ये ताजा आमरस वापरलात तर उत्तम) १-१/२ वाटी मारी किंवा कुठल्याही डायजेस्टीव्ह बिस्किटांचा चुरा २-३ टेस्पून बटर १/२-३/४ वाटी साखर (रसाच्या गोडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून जिलेटीन पावडर दीड टीस्पून वेलचीपूड . पाकृ: प्रथम मारी बिस्किटांच्या चुर्‍यात वितळलेले बटर घालून नीट एकजीव करावे. . तुमच्याकडे जर का स्प्रींगफोर्मचा केक टीन असेल तर त्यात ह्या बटर घातलेल्या चुर्‍याचा बेस दाबून तयार करावा. नसेल तर कुठल्याही बाऊल/ वाईन ग्लासमध्ये चमच्या च्या मदतीने बेस दाबून तयार करावा. तयार ग्लासेस / टीन फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे. . . आता मिक्सींग बाऊलमध्ये क्रीमचीज, फ्रेश क्रीम व साखर घालून बीटरने फेटून घ्यावे. . ३ टेस्पून पाणी मायक्रोव्हेवमध्ये १०-१५ सेकंद गरम करून घ्यावे व त्यात १टेस्पून जिलेटीन पावडर घालून ती पूर्ण विरघळू द्यावी. हे मिश्रण आंब्याच्या रसात घालून एकजीव करावे. (घाई गडबडीत ह्याचे फोटो काढायचे राहून गेले :( ) आता अर्ध्यापेक्षा जास्त जिलेटीनमिश्रीत आंब्याचा रस त्यात घालावा. वेलचीपूड घालून परत एकदा बीटरने बीट करुन घ्यावे. . फ्रिजमध्ये ठेवलेले ग्लासेस/ टीन काढून त्यावर ह्या चीजच्या मिश्राणाचा जाडसर थर पसरावा.पुन्हा फ्रिजमध्ये १५ मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे. . . १५ मिनिटांनी त्यावर उरलेल्या आंब्याच्या रसाचा थर द्यावा व रात्रभर फ्रिजमध्ये किंवा ६-७ तास सेट होण्यासाठी ठेवावे. . . दुसर्‍या दिवशी स्प्रींगफोर्म केकटीनच्या कडेने हलकेच सुरी फिरवून त्याचे रिंगण काढावे. आवडत असल्यास त्यावर चॉकलेट सॉस / मिश्र फळ्यांच्या/ आंब्याचा तुकड्यांनी किंवा असेच पुदिनाची पाने लावून सर्व्ह करावे. ग्लासमध्ये सर्व्ह करत असाल तर असेच सर्व्ह करा दिसायला ही छान दिसतं :) . मिपावर येऊन एक वर्ष कधी पूर्ण झाले समजले नाही... आज ही पाकृ तुम्हा सगळ्या मिपाकर मित्र-मैत्रीणींसाठी आहे :) असेच प्रेम असु द्या :) .

वाचने 18472
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

आज एखादी तायडी काही तरी पेश्शल घेउन येणार हा आमचा होरा चुकु दिला नाहीत. धन्स. मिपावाच्या प्रथम वर्षपुर्तीबद्दल शुभेच्छा !!!.

In reply to by प्राजु

ते कोको पावडरचा हार्ट शेप मी घरीच साध्या कागदाचा स्टेन्सील वापरून केले आहे :) बाजारात ही असले स्टेन्सील मिळतात :)

पहाता क्षणीच खावासा वाटणारा क्येक फोटो आणी पा.कृ.सांगायची श्टाइल...नेहमी प्रमाणेच एकदम अप-टु-डेट...आणी झक्कास...! :-)

ताई, फारच सुन्दर पाक्रु. :-) अभिनन्दन.

पाकृ , निवेदन व सजावट सारेच अप्रतिम. मिपा परिवारात वर्ष पूर्ती बद्दल अभिनंदन.

अग्ग्ग्ग्ग! भारी पाकृ. प्रेमदिन व मिपावर वर्षपूर्तीच्या शुभेच्छा! आज सगळेजण भारीच प्रेमळपणे वागतायत असे वाटते आहे.:)

In reply to by रेवती

प्रथम तर पाकृ एकदम, जबरा, खतरा, आणी टकाटक. आता....... आज सगळेजण भारीच प्रेमळपणे वागतायत असे वाटते आहे.......बद्दल ही घ्या माझी माशी शिन्कली.....;) वाटरमार्क फिका किन्वा एका कोपर्यात असावा अस्स वाटतय, नाहीतर तो पदार्थात तरन्ग्तोय असा भास होतोय.

ते शेवटचे दोन फोटो कसले आहेत! काय बोलू? जावू दे... दर वेळी नवीन शब्द कुठून आणायचे?

उत्कृष्ट.... फार आवडली पाकृ... आणि अर्थातच प्रेझेन्टेशन.... ह्या कलाकृतीला सलाम.

In reply to by ५० फक्त

५० जपून बरं... चमचे मागता मागता हाताचे फटु मागू लागला आहात. उद्या . . . . . . स्वप्निल मागाल. कसं जमायचं? ;)

खुप खुप आभार.... आता आम्बे नाहि ग ताई मिलत... मी strawberry ने try करेन... मिपावर वर्षपूर्तीच्या शुभेच्छा!!

शब्दच संपले....

आमच्या डाएट प्रोग्रामची सरे 'आम' कत्ल करण्यात आलेली आहे!

हाय सानिका, तुझ्या पाककृती नेहमी वाचते. आणि करुनही बघत असते. खूप छान होतात आणि मुख्य म्हणजे न चुकता! तुला खूप खूप धन्यवाद. ही पाककृती पण नेहमीप्रमाणेच छान! मला एक शंका आहे पण. क्रीमचीझ म्हणजे काय? इकडे (जर्मनीमध्ये) काय नावाने मिळतं कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.

In reply to by चैत्रपालवी

धन्यवाद प्रतिसादाबद्दल :) क्रीमचीज हे मऊ आणी जास्तं फॅट्स असलेले चीज असते. मी ह्या पाकृत Philadelphia cream cheese वापरले आहे कदाचित जर्मनी मध्ये ही मिळू शकेल हे :)

In reply to by सूड

वरच्या फोटोच्या जवळ ठेवला तर त्या फोटोला नजर लागणार नाही ;-) ;-) ;-) हघ्या हेवेसांनलगे ;-)