Skip to main content

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

लेखक चिन्या१९८५ यांनी मंगळवार, 22/07/2008 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्. समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ तेच सरकार बनवतील' अशा थाटात यांचे मुलायम सिंग आणि अमर सिंग वावरत होते.पण निकालांनंतर चित्रच पालटल.कधी नव्हे ते कम्युनिस्टांचे ५२ खासदार निवडुन आले आणि त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठींबा दिला.त्यांच्या व इतर युपीए च्या घटक पक्षांच्या आधारे सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर समाजवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांच्याशिवायच सरकार बनु लागले.मग अमर सिंग तरीही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला 'बिनबुलाये मेहमान' बनुन गेले.आधीच सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने सोनिया मॅडम निश्चिंत होत्या त्यांनी सरळ सरळ 'अमर सिंग येथे काय करत आहेत??' म्हणुन त्यांना जवळपास हाकलुन दिले.त्यानंतर अगदी मागच्या वर्षीपर्यंत अमर सिंग 'काँग्रेसनी आमचा कसा अपमान केला' हे सांगत फिरत होते.पण मायावतींनी त्यांचा फडशा पाडल्यावर मात्र त्यांना महत्व मिळत नव्हते.आणि शेवटी अणुकरारावरुन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढल्यावर लगेच तेच अमर सिंग सोनिया व इतर काँग्रेस नेत्यांकडे फेर्‍या मारुन भाव खाउ लागले.आणि कारण सांगताना सांगु लागले की 'कम्युनल' पक्षांना सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत्.त्याचबरोबर कम्युनल आडवाणींपेक्षा बुश बरे अशीही टुम सध्या उडवत आहेत्.पण या सर्व निरर्थक गोष्टी आहेत हे तेही जाणतात आणि आपणही जाणतो.मुळात बसपचा 'हत्ती' अडवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणुन समाजवादीने केलेला हा संधिसाधुपणा आहे.राष्ट्रीय पटलावर आपल महत्व दाखवुन देण्याचा प्रयत्न आहे.यात कम्युनल विरोध कुठेच नाही.मुलायम सिंग युपीच्या निवडणुका हरल्यावर अनेक कार्यक्रमात सांगत फिरत होते की 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो'.हे वाक्य सगळ काही सांगुन जात्.म्हणजे वेळ आली तर आम्ही काँग्रेसबरोबरच काय तर भाजपबरोबरही युती करु शकतो असे यात स्पष्ट होते.मग कम्युनल विरोध आलाच कुठुन??? दुसरा संधिसाधु पक्ष म्हणजे करुणानिधींचा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजे 'द्रमुक'.यांचा संधिसाधुपणा तर फारच स्पष्ट आहे. हिंदुंना 'चोर' म्हणणार्‍या आणि आयुष्यभर हिंदुविरोध करणार्‍या या पक्षाने मागच्या वेळी त्यांच्याच वैचारीक शत्रु असलेल्या भाजपला पाठींबा दिला.आणि गेले ४ वर्ष तेच भाजपाला पाठींबा देणारे करुणानिधी आता म्हणतात की 'भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षांना दुर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र याव्.कम्युनल पार्ट्या हिंदु मुस्लिम एकीसाठी मारक आहेत्'.आता कम्युनलविरोधाचा मुखवटा चढवुन द्रमुक त्यांच्या कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेसशी युती करुन आहे.भारतीय राजकारणात सर्वाधिक विरोधाभास असलेली ही युती आहे.राजीव गांधीची हत्या करणार्‍या 'एलटीटीइ'ला द्रमुकचा पाठींबा होता आणि अजुनही तो पाठींबा आहे असे म्हणायला वाव आहे.मुळात राजीव गांधी हत्येची चौकशी करणार्‍या जैन आयोगाने 'द्रमुक नेतृत्वावर कायदेशीर आरोप ठेवणे शक्य आहे' असा अहवाल दिल्यानंतर काँग्रेस्-द्रमुक युती व्हायची शक्यताच निर्माण व्हायला नको होती.द्रमुकचा जन्म जिच्यापासुन झाला ती जस्टिस पार्टी काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यात कडवी विरोधक होती.काँग्रेस स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता तेंव्हा ही पार्टी ब्रिटीशांना समर्थन देत होती,काँग्रेसने सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली देश एकसंध ठेवला होता तेंव्हा द्रमुक 'द्रविडनाडु' या देशाची मागणी धरुन होता,काँग्रेसने हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणुन महात्मा गांधींपासुन तशी भुमिका घेतली होती तेंव्हा कट्टर हिंदीविरोधाचे नेत्रूत्व द्रमुक करत होता,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली त्याकाळात तर द्रमुक लंकेतील तामीळींसाठी चिडला होता.इतका प्रचंड विरोधाभास असलेली द्रमुक-काँग्रेस युतीही 'कम्युनल्'ला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी झाली.पण ही करताना (तसे सांगताना तरी),त्याच कम्युनल भाजपबरोबर आपण ५ वर्ष सरकारात राहीलेलो आहोत हे द्रमुक विसरतो. देवेगौडांचे सेक्युलर जनता दल तर संधिसाधुपणा लपवायचाही प्रयत्न करत नाहीत्.आपण कधी इकडे तर कधी तिकडे अशी सततची पळापळ करुन आपल्याला कुठलीही वैचारीक बैठक नाही हे त्यांचा पक्ष दाखवुन देत असतो.आत्ता परवाच एकाच दिवशी युपीए बरोबर आणि युपीए विरोध्यांबरोबर देवेगौडा दिसले होते.यांनी काँग्रेसबरोबर युती करुन धरम सिंग यांचे सरकार कर्नाटकात आणले आणि मग लगेच ते पाडुन भाजपाबरोबर सरकार आणले.त्यांचा मुलगा २० महीने मुख्यमंत्री आणि पुढचे २० महीने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे ठरले.पण स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल संपल्यावर कारभार भाजपकडे सोपवण्यास गौडांनी नकार दिला मग परत काँग्रेसबरोबर जायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही म्हणुन परत भाजपला पाठींबा दिला आणि ७ दिवसात तो काढुनही घेतला.हे सगळ करत असताना आपला संधिसाधुपणा उघडा पडतोय याचीही त्यांना चिंता नव्हती.मग देवेगौडांनी मुलाचा निर्णय होता असे म्हणुन सारवासारव केली. हे सर्व होतानाच आपल्या पक्षाचे नाव सेक्युलर आहे म्हणुन कम्युनल राजकारणाचा विरोधही ते अधुनमधुन करतात्.पण काहीच दिवसात परत ते भाजपबरोबर युती होउ शकते असेही सांगतात. आत्ताच काही दिवसांपुर्वी 'केंद्रात भाजपबरोबर युती होउ शकते' असेही त्यांनी स्पष्ट केले आणि हे केल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीचे वारे पलटले आणि त्यात आपणही बातम्यांमधे याव म्हणुन धर्मनिरपेक्षांचा पंगतीत जाउन देवेगौडा परत बसले आहेत. या सर्वांपेक्षा मायावतींची बहुजन समाज पार्टी तरी बरी.कारण ते सरळ सरळ हे मान्य करतात की 'आम्ही संधिसाधु आहोत.फायद्यासाठी आम्ही कुणाबरोबरही जाउ'.संसदेत एकदा कांशीराम म्हणाले होते की 'आम्ही संधिसाधु आहोत असे तुम्हीच म्हणता आणि वरुन आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणुन टिकाही करता.मग तुम्हीच सांगा की आम्ही कुणाबरोबर जाव की ज्यामुळे आमचा फायदा होईल?'.जुन्या काळी मनुवादी म्हणुन ,कम्युनल म्हणुन ज्यांच्यावर टिका बसपने केली,त्यांच्याच बरोबर बसपने अनेकदा युतीही केली.सध्या पक्ष देशभरात वाढवण्यासाठी मायावती प्रयत्न करत आहेत्.ते करण्यासाठी वेळ पडल्यास 'कम्युनल' पक्षांशी युती करतील आणि वेळ पडल्यास त्यांना 'कम्युनल' आहेत म्हणुन विरोधही करतील्.बाकी युपीए सरकारला बाहेरुन पाठींबा देताना उत्तर प्रदेशच्या विकासाबरोबर जातीयवाद्यांना विरोध हाही मुद्दा होताच की!सध्या मायावती देशात युपिबाहेर सगळीकडे स्वतःचे उमेदवार उभ्या करत आहेत आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला होतोय.कारण त्या काँग्रेसचा मतदार स्वतःकडे खेचत आहेत.गुजरातमधे १५-१६ काँग्रेसचे मतदार त्यांनी घरी बसवले तर कर्नाटकात १०-११ काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यामुळे हरले.अनेकदा भाजपबरोबर युती करणार्‍या आणि नरेंद्र मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या प्रचारासाठी सभा घेणार्‍या मायावती राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देताना म्हणाल्या की 'भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते कम्युनल आहेत.कम्युनल पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत व्हायला नको म्हणुन बसपने नेहमीच लढा दिलेला आहे'.असे असले तरी त्यांनी संधिसाधुपणा मान्य केलाय हे तरी ठिक आहे. बाकी एका दृष्टीने राष्ट्रवादीवरही हा आरोप ठेवला जाउ शकतो.कारण सोनियांच्या परदेशी मुळाचा मुद्दा घेउन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर काहीच महीन्यात महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसशी युती केली आणि सरकार बनवले.ते करताना 'राष्ट्रिय स्तरावर हे होणार नाही 'हे सांगितले आणि मग हळुहळु पवार भाजपकडे झुकु लागले.वाजपेयींचा उघड गौरव करु लागले.मग काही जागांवरुन बोलणी फिस्कटल्यावर पवारांनी सोनियांच्या काँग्रेसबरोबर लोकसभेसाठी निवडणुकपुर्व युती केली.मग त्यांच्या सरकारातही ते सामील झाले.'सोनिया पंतप्रधान आमच्याशिवायच होतील म्हणुन आम्ही त्यांना पाठींबा देतो' असे पवारांनी सांगितले.आणि हे केल्यानंतर सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले.त्यानंतर काहीच महीन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या.त्यात शरद पवारांनी असेही सांगितले की 'सोनिया पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कृषीमंत्रीपद स्विकारले'.पण हे करत असताना 'डबल कम्युनल' शिवसेनेशी ते संबंध ठेवुन आहेत्.पुण्यात त्यांची सेनेशी युतीही आहे. याप्रमाणे प्सुडोसेक्युलर कम्युनलच्या नावाखाली संधिसाधुपणा करतात्.तर या कम्युनल पक्षांचा इतका खरच दोष आहे का???आणि खरच हे पक्ष कम्युनल आहेत का हा प्रश्न कोणीच विचारत नाही.महाराष्ट्रात तर सेना-युती शासनाच्या वेळी सांप्रदायीक दंगे जवळपास झालेच नव्हते.नरेंद्र मोदींना धर्मनिरपेक्ष लोक शिव्या देत असतात पण १९६९ साली गुजरातमधे २००२ सालपेक्षा कितीतरी मोठी दंगल उसळली होती हे विसरतात्.अनेक दंगली धर्मनिरपेक्ष सत्तेवर असताना झाल्या आहेत तरीही शिवसेना-भाजप सारखे पक्ष सत्तेत आल्यास अराजक माजेल असे एक चित्र निर्माण केले जाते जे साफ चुकीचे आहे.मुळात हिंदुंवरील अन्याय आणि हेटाळणी बंद केली तर आपोआपच या पक्षांचा जनाधार कमी होईल्.पण हे लक्षात न घेता धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत येताच हिंदुविरोध सुरु करतात्.रामसेतुचा मुद्दाही त्यातलाच्. भाजप्-शिवसेना या पक्षांना कम्युनल म्हणने कितपत बरोबर आहे हाही एक मुद्दा आहेच्.धर्मांध मुस्लिम देशविरोधी कारवाया करु शकतो म्हणुन त्यांच्या धर्मांधतेला आळा घालण्याची मागणी कम्युनल कशी ठरते??एका दृष्टीने बघितल्यास कम्युनला शक्तींना सत्तेपासुन दुर ठेवण्याच्या नावाखाली प्सुडोसेक्युलर संधिसाधुपणा करतात्.त्यामानाने शिवसेना-भाजप युती गेले २० वर्ष एका मुद्द्याच्या जोरावर टिकुन आहे.अनेकदा त्यांच्यातले संबंध ताणले गेले पण सत्तेसाठी संधिसाधुपणा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड टाळली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26918
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

१०००% सहमत जोशि साहेब आपणाशि...... हिंदू मधिल जे सेक्यूलर आहेत ...ते तो पर्यत जागे होणार नाहित्...जो पर्यत... त्याच्या घरातिल श्रधा स्तान असणारे देवारे हे मुस्लिम येउन तोडनार नाहित... काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच

एडी भौ !!!! एकदम मनातल बोललास !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

संहिता व सूनिल ....मान्य आहे वरिल माहिति देणारे स्त्रोत हे हिंदू संस्थांनि चालवलेले आहेत ....पण डोंगरितिल हनूमान मंदिर पाड्ण्याचे बातमि ५व्या पानावर ४ ओळि मध्ये देणार्‍या व दर ६ डिसेला बाबरि मश्जिदे बाबत पान रंगवणार्‍या म्.टा. पेशा आधिक पारदर्शक आहेत.....

त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का? अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल. मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशा काही विधानां मुळेचं एक हिंदु सुध्धा त्यांना मत देताना कचरतो. आले सत्तेवर तरि अघाडि असेल आनि मग आहेचं पुन्हा हिदुंचे हाल. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!! ऍडी तुम्ही इतकं छान लिहिता.(ट्रकवाले सारखा हळुवार लेख लिहिणारे तुम्हीचं ना?)हे वाक्य तुमच्याकडुन येईल असं अजिबात वाटलं नव्हतं.

In reply to by नारायणी

या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? नाही कारण दंगली करणारे लोक गुंडच असतात असे नाही. आणि जेव्हा दंगली होतात तेव्हा त्यात सहभाग घेणारे युध्द म्हणूनच भाग घेतात. आता त्या युध्दात आपलीच माणसे मारली जाऊ शकतात ही दुर्दैवी बाब आहे. पण म्हणूनच माझा त्या वाक्याला आक्षेप नाही. निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हो कदाचित माझ्या आईला कोणी मारले तर मी मारेकर्‍याला न मारता त्याच्या आईला मारेन म्हणजे त्याला जाणीव होईल की आई जाण्याचे दु:ख काय असते ते. आता तुम्ही म्हणाल की त्यात त्याच्या आईचा अपराध काय होता तर मी म्हणेन माझ्या तरी आईचा अपराध काय होता? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का? नाही हिंदुत्व म्हणजे हेच नाही पण परिस्थिती प्रत्येक गोष्ट घडवत असते. ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल. अहो तसे बघाल तर अनेक मुस्लिम कलाकार, सैनिक, पोलिस आणि प्रशासकिय अधिकारी, शास्त्रज्ञ, कवि फाळणीनंतर पाकिस्तानात गेले म्हणून त्यामुळे देश बंद पडला का? (अब्दुलकरीम खां साहेबांचा चाहता) पुण्याचे पेशवे

In reply to by नारायणी

निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? बरोबर आहे. पण जनता भडकल्यावर जनतेला कोण समजावणार?? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. ते तसेच करतात. हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात त्यांनी दहशतवाद्यांना मदत करायची थांबवली की मग दंगली होणारच नाहीत. आणि कोण अपराधी,कोण निरपराधी हे ठरवण अवघड असत. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग शिवसेना म्हणत नाही की सर्वांना मारुन टाका. धर्मांध मुस्लिमांना विरोध आहे.पण आता जे देशभक्त आहेत त्यांनी यांना पकडुन द्यायला हव. मुस्लिम लोकांच्या बस्त्यांमधे ही सगळी काम होतात. तिथल्या देशभक्त मुस्लिमांनी देशद्रोह्यांना ,धर्मांधांना पाठीशी घालु नये,त्यांना पकडुन द्याव. पण ते तस करत नाहीत्.ते गप्प रहातात. मग दंगली झाल्या की या धर्मांधांबरोबर यांचही घर जळत. पण आजपर्यंत प्रखर राष्ट्राभिमानी मुस्लिम संस्था झालेली नाही की जी म्हणेल की आम्ही प्रखर देशभक्त आहोत,इस्लाम आणि देशभक्ति यांच्यातील निवड करायची झाल्यास आम्ही देशभक्तीच निवडु.बहुसंख्य मुस्लिम समाज मुल्ला,मौलवीच्या ऐकण्यात असतो. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशी भाषा त्यांनी कधी केलिय्???मागच्या वर्षी लालबागच्या गणपतीसमोर मुस्लिमांनी फटाके फोडुन स्वागत केले होते. त्याचे बाळासाहेबांनी अग्रलेख लिहुन कौतुक केले होते.२ वर्षांपुर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर काही मुस्लिमांनी रॅली काढुन बॉम्बब्लास्टचा निषेध केला होता. बाळासाहेबांनी त्यावेळेसही रॅलीत भाग घेणार्‍या मुस्लिमांना अग्रलेखातुन सलाम केला होता.पण तुमची सेक्युलर मिडीया तुम्हाला हे सांगत नाही. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!! कुठल्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही???हिंदुत्ववाद्यांच्या शासनात कायदा आणि सुव्यवस्था कितीतरी चांगली असते कारण मुस्लिमांना हा संदेश जातो की त्यांचा माज चालवुन घेतला जाणार नाही.

In reply to by नारायणी

मी जे लिहीलंय ते पुर्ण विचरांतीच लिहीलं आहे. चुकून काहीही नाही. त्यावेळी जे रहिले त्यांना आता मारा असं मी म्हणालो नहिये. पण आता जे आहेत त्यांना तरी धाकात ठेवा. कारण ते अतिरेक्यांना समर्थन देतात हे सत्य आहे. जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हो. कारण त्यांनी आधी मारलेला मनुष्य सुद्धा कुणाचा मुलगा / भाऊ / नवरा होताच ना. हेचं का हिंदुत्त्व? नाही. हे स्वसंरक्षण. मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. म्हणूनच धाकात ठेवायचं. नाहितर ते आपलीच सिस्टीम आपल्याविरुद्ध वापरतील. बराच काळ बुळचट अहिंसा कवटाळून बसल्याने हे प्रकार झाले आहेत आणि आपण दुसरा गाल पुढे केला की ती लोकं दुसर्‍या गालावरही थापड मारत आहेत. गोध्रा मधे झालेल्या दंगलींमधे सगळ्यांनी मुसलमान मारल्या गेले म्हणून दु:ख व्यक्त केलें. पण ते का मारल्या गेले ह्याचा विचार नाही केला. कधी ऐकलंय का हिंदू पारसी दंगल झाल्याचं. मिळून मिसळून रहाणे म्हणजे काय हे मुसलमानांना महितीच नाहिये. कुठेही बघा, ह्यांचे कायम वेगेळे भागच असतात. धाकात असल्या शिवाय मुसलमान सरळ वागत नाही हा इतीहास आहे. ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

वा. सगळे मुद्दे cover केले तुम्ही. अशी भाषा त्यांनी कधी केलिय्??? हा .... असं नका म्हणु. नक्किचं ते असं बोलतात. कुठे,कधी हे सगळे तपशील नाहित मझ्याकडे पण शिवसेनेने केलेल्या अशा काही भडक विधानांमुळेचं मला हा पक्ष आवडत नाही .त्यामुळे माझी ईथे नक्किचं चुक झालेली नाही. बाकी तुम्हि बाळासाहेंबा विषयी जे जे सांगितलत ते मला खरोखर माहित नव्हतं. हे खरं असेल तर उत्तमचं.

In reply to by नारायणी

हे खर आहे.वाटल्यास मी लिंक्स देतो. बाळासाहेबांनी मुस्लिमांविरुध्द भडकावु भाषण नक्की दिली आहेत. पण सरसकट सगळ्यांना काढुन टाका अथवा मारुन टाका असे ते म्हणालेले नाहीत्.मी सामना वाचतो त्यामुळे मला माहीत आहे.मुस्लिमविरोधी लेखांमधे नेहमीच धर्मांध मुस्लिम लिहिलेले असते पण मिडीयावाले भाषांतर करताना धर्मांध काढुन टाकतात्.बाळासाहेबांची भुमिका स्पष्ट आहे. मुस्लिमांनी इथल्या मातीशी इमान ठेवाव तर त्यांच्याविरुध्द दंगे होणार नाहीत.

ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं. काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच (एक हिन्दुस्तानी) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

हिंदूचे दमण आणि मुस्लिमाचे तूष्टिकरण याचे ताजे उदहरण .... अमरनाथला दिलेलि जमिन.... ३ दिवसाच्या मुस्लिमाच्या आंदोलना नंतर सरकारने निर्णय माघारे घेतला पण गेलि २५ दिवस हिंदू जम्मू येथे आंदोलन करतायत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातायत......

In reply to by अमितकुमार

तेच ना. ठिकठीकाणी यांचे डबल स्टँडर्ड्स दिसुन येतात. आता अमरनाथला १००एकर जमीनही हिंदुंना मिळु नये???बर त्या जमिनी कुणाच्याही नाहीत.त्यामुळे त्याचा तोटा तर कुणालाच नाही. हिंदुंच्या सोईसाठी मुस्लिम काहीच करत नाहीत्.सरकार करत तर त्याचा विरोध करत. मग हिंदुंनी त्यांची काळजी का घ्यावी??

अश्या मुद्द्यावर माझे सो कॉलड सेक्यूलर मित्र गप्प राहने पसंत का करतात ?

घ्या !! बन्गलूरू मध्ये अजुन बॉम्ब्स्फोट झालेत !!! आणी फक्त निष्पाप लोकाना त्रास ह्या सर्वाचा !!!! सहन शक्ती ला सुद्धा मर्यादा असतात !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मिपावर बरेच दिवसानी मुद्देसूद चर्चा चालली आहे (कृपया ह्या वाक्यावरुन प्रस्तुत लेखकाला गुद्दे देवु नयेत) पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

आज परत बॉम्बस्फोट झाले. काय चाललय काय???

पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~