Skip to main content

क्लिक्स...

लेखक चिगो यांनी सोमवार, 13/02/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. मी काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतो आहे.. १. आसाममधल्या नगाँव शहरात एका कलाकाराकडून घेतलेलं हे लघु-शिल्प.. मला व्यक्तिशः ह्यातील रंगसंगती खुप आवडली.. २. नगाँवजवळच एका जागी फिरायला गेलो असता (बायकोने) काढलेला हा फोटो.. ३. ज्योतिबाच्या मंदिरात आढळलेली धर्मनिरपेक्षता.. ४. आसामातल्या नगाँववरुन आता महाराष्ट्रातल्या नागावला.. अलिबागजवळच्या नागावमध्ये बघितलेली ही वेगळीच इमारत.. ५. कोचिन (केरळ) इथल्या "चायनीज फिशींग नेट्स" ६. ही आहे "स्लो शटर" फोटोग्राफीमुळे झालेली प्रकाशाची रंग-उधळण.. ७. आणि आता शेवटी ह्याच "स्लो श. फो." मुळे माझ्या पुतणीला असे अग्नीपंख लाभले... पुन्हा भेटूया..
लेखनविषय:

वाचने 7608
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

फोटो क्र. १,५ व ६ आवडले क्र.७ अग्नीपंख खासच. अवांतर - "ज्योतिबाच्या मंदिरात आढळलेली धर्मनिरपेक्षता.." पोटाची रीकामी खळगी धर्मनिरपेक्षता शिकवते आणि टीकवते, पण एकदा का ती भरली की मग मात्र.........काही खर नाही त्या धर्मनिरपेक्षतेच. आसाम + नागभुमीतील अजुन छायाचित्र येऊद्यात. nagaland

मस्त हो चिगो. कलादालनात काहितरी हटके बघायल मिळाले आज. धन्यवाद.

सगळे फोटो मस्त आहेत. पहिल्या फोटोत तर लांडगा वेअरवुल्फ होताना दिसतोय. आणि दुसर्‍या फोटोत क्षितिजावर चंद्रासारखा दिसणारा पांढरा गोल कसला आहे?

कुठे आहेत फोटो? आयज चेक चेक चेक... Smiley कंप्युटर चेक चेक चेक... Smiley फोटो दिसत नसल्याने प्रतिसाद नंतर देतो!

सर्वच फोटो आवडले. बाकी एक प्रश्न पडलाच की आसाम, नागाव(अलिबाग, महाराष्ट्र) आणि कोचिन इथे काय एकाच वेळी हजर होतास की काय... - पिंगू

मस्त फोटोज! पहिला आणी शेवटचा खासच... - (फोटोग्राफर व्हायची ईच्छा बाळगणारा) सोकाजी

सगळ्यांचेच धन्यवाद.. @मराठे, वपा बरोबर बोललाय.. काहीतरी चमकले असेल. पण चमकायला जागा चांगली निवडलीय फोटोत.. ;-) @पिंगु, नाही रं बाबा.. एकाच वेळी सगळीकडे रहायला मी काय भगवान कृष्ण थोडीच आहे. वेगवेगळ्या वेळी काढलीयत ही छायाचित्रे.. @सोत्रि, इच्छा काय बाळगायची नुस्ती. कॅमेरा उचला आणि सुरु करा.. आपोआप जमतंय.. @गवि, स्पा, पियुशा, नाईल, सुड, पन्नासराव.. धन्यवाद.. @सुहास, तुला "जयपाल" म्हणायचंय का ? मला पण तो फोटो आवडला..