Skip to main content

पद्मभूषण प्राण सिकंद यांचा आज 92वा वाढदिवस... ...

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 12/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो हिन्दी सिनेजगतातील खलनायक पद्मभूषण प्राण सिकंद यांचा आज 92वा वाढदिवस... ...
...त्यांच्या आयुर-आरोग्याचे शुभ चिंतन!...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3150
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

फक्त खलनायक...? त्यांनी चरित्र भुमिका देखिल छान उभ्या केल्या होत्या.बघा जंजीर्,उपकार.......इत्यादी फार सुंदर अभिनय होता.

अतिशय सच्चे आणि सज्जन कलाकार, त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! (अवांतरः शम्मी कपूरने आणखी काही महिने काढले असते ते हे तिघे असे एकत्र दिसले असते कुठे तरी....) http://www.indicine.com/images/gallery/bollywood/events/prans-90th-birt…"

.

प्राण यांना अनेकानेक शुभेच्छा. राम और श्याम मधली त्यांची करारी जजर जबरदस्त. जंजीरमधला शेरखान तर काय वर्णावा. हिंदी चित्रपटसृष्टीतला कदाचित सर्वश्रेष्ठ खलनायक. अमजद खान यांना गब्बरची उंची नंतर कधीच गाठता आली नाही पण प्राण यांनी बहुतेक खलनायकी भूमिका अजरामर केल्या.

मनःपूर्वक शुभेच्छा.जून १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली तेव्हा चित्रपट दुनियेतील सर्व लोक गप्प होते. अपवाद होता प्राण ह्यांचा. स्क्रीन नियतकालिकात लेख लिहून त्यांनी विरोध नोंदवला होता.शेवटच्या क्षणी अटक टळली होती.पडद्यावर समोर राज्,देव्,दिलिप्,नूरजहा,मधुबाला वा कोणीही असो, प्राण ह्यांचे व्यक्तिमत्व,अभिनय नेहमीच उठून दिसले.

प्राण हा फक्त खलनायक आहे हा गैरसमज आहे! 'परिचय' सारख्या चित्रपटातून त्यांनी चरित्रभूमिकाही तेवढ्याच ताकदीने पेलल्या आहेत. खर्जातल्या आवाजातली उत्तम संवादफेक, उत्कृष्ट मुद्राभिनय, परिणामकारक देहबोली ही त्यांच्या संयत अभिनयाची वैशिष्ठ्ये म्हणायला हवीत. हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या भुलभुलैयात राहूनही निर्व्यसनी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगत शतकाकडे वाटचाल करणे ही खायची बाब नव्हे! प्राण ह्यांना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा आणि त्यांचे शतक पूर्ण होवो अशा सदिच्छा! :) (प्राणप्रेमी) रंगा

६ / ७ वर्षांपूर्वी एका लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड ला उत्तर देताना काढलेले उद्गार.. आप है तो प्राण मे प्राण है वर्ना प्राण बेजान है...

अजून एक गोष्ट आठवली. फार पुर्वी पत्रकारांनी त्यांना छेडायचा प्रयत्न केला. त्यानी विचारले की "प्राणसाहेब तुम्ही फक्त खलनायच्या भुमीका का करता?" जास्त कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण न करता त्यांनी उत्तर दिली "हर मुव्हीका प्राण ही व्हिलन होता है". वाढदिवसाबद्दल शुभेच्छा. Skype Emoticons

प्राण हा फक्त खलनायक आहे हा गैरसमज आहे! असे लिहिणे हाच एक गैर समज आहे. प्राण यानी हिरोचेही काम केलेले आहे. चरित्र अभिनेता, खलनायक, विनोदवीर अशाही स्वरूपात ते दिसले आहेत. धारदार नाक नि धारदार आवाज . प्रत्येक भूमिकेत एक वेगळे बेअरिंग घेण्याची कला व तरीही आपला " प्राण" चा शिक्का कायम अशी त्यांची शैली असे. अनेकानी खलपुरूष सादर केले पण यासम हा !

लहान पाणी पडद्यावर प्राण, प्रेम चोपडा आदी मंडळी दिसली तरी आपाली तर जाम की फाटायची बॉ. :) प्राणयांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !!! त्यांना निरोगी आरोग्य लाभो.

हिंदी चित्रपटांत अनेक उत्तम भूमिका आणि सशक्त खलनायक साकारणार्‍या प्राण ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. लहानपणी त्यांच्या भुमिका तर आवडायच्याच, पण वेळोवेळी त्यांच्या चांगुलपणाबद्दल वाचून ते आणखीच आवडायला लागले.. मला वाटतं, "गुड्डी" मधे त्यांच्या चांगुलपणाचा उल्लेख आहे.. जियो प्राण..