Skip to main content

सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते ... (हझल)

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 10/02/2012 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते ... (हझल) सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते सोसली नसे त्यांची छाती फुक फुक करते करून दाखविले, पण बघण्या कोणी नव्हते बाण सोडण्या दोरी आता चुक चुक करते घड्याळातले काटे आता थकले बहुधा म्हणून यांना त्यांना आता शुक शुक करते हातावरच्या रेषा आधी समजुन घ्या रे... नंतर म्हणू नका की, नशीब टुक टुक करते कमळावर दवबिंदू जमती चमकुन घेण्या देठ अजुनही चिखलामध्ये लुकलुक करते हत्ती इतकी माया त्याची कुठे वाढली ? निळा रंग माखून उगाचच पुक पुक करते कुणाशी नसे बांधिलकी पण सतत बोलतो खार जशी की पळत सारखी कुक कुक करते
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1664
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

घड्याळातले काटे आता थकले बहुधा म्हणून यांना त्यांना आता शुक शुक करते :) हातावरच्या रेषा आधी समजुन घ्या रे... नंतर म्हणू नका की, नशीब टुक टुक करते ;) कमळावर दवबिंदू जमती चमकुन घेण्या देठ अजुनही चिखलामध्ये लुकलुक करते :) छान ! मस्त !महापालिका निवडणुकांचा ज्वर चढलेला दिसतो आहे..?

मस्त.