Skip to main content

कालवाचे दबदबीत.

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 08/02/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)कालवं २)खवलेले खोबरे. ३)बारिक चिरलेला कांदा. ४)थोडासा उभा चिरलेला कांदा(भाजण्यासाठी). ५)हळद. ६)मालवणी मसाला. ७)चिंच/टॉमेटो/आमसुलं. ८)मिठ चवीपुरते. ९)एक च्मचा धणे. १०)५-६ काळी मिरी. कृती :-प्रथम कालवं साफ करून घ्यावी. त्यात बारिक चिरलेला कांदा,हळद,मालवणी मसाला घालून चांगले ढवळून शिजत ठेवावे.(पाणी घालू नये.झाकण ठेवून त्यावर पाणी घालून वाफेवर शिजत ठेवावे.) एका कढईत थोडे तेल घेवून त्यात धणे व काळी मिरी परतून घ्यावींअंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालावा व तांबूस होईपर्यंत परतावा.व मग त्यात खवलेले खोबरे घालावे.चांगले भाजुन घ्यावे.व नंतर जरा जाडसर वाटून घ्यावे. कालवं शिजली की वाटलेलं खोबरे घालावे.मिक्स करून चांगले शिजवावे.वरून कोथिंबीर घालावी.

वाचने 9295
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

अहा.. क्या बात है... मस्तच.. बादवे धबधबीत मधला "त" लुप्त असतो (सायलेंट) असं पुलंनी कुठेसं लिहिलं आहे..

In reply to by गवि

ते वाक्य हसवणूक मधील माझे खाद्यजीवन या प्रकरणात आहे. पण तो त उच्चारी लुप्त असतो, लेखी नाय काय !!!

पहिला आणि शेवटून दुसरा फोटो फार आवडला!! जियो!

शिवाय कालव्याच्या भज्या आठवून जीव अंमळ व्याकुळ झाला.

In reply to by गणपा

आणि कालवांचं आमलेट (पोळा)! गणपा, आता तू मेल्या नाय नाय त्या आठवणी काढू नको!!! :(

In reply to by पिवळा डांबिस

गावाला कालवं शोधायला खडकाय जायचो. ताज्या ताज्या शोधुन आणलेल्या कालव्याचा भज्या, कांदा + बेसन + टोमेटो टाकुन केलेल्या वड्या आणि सोबतीला मस्त खाजरीची/ताडाची ताडी हिरवी मिरची मारके...... आहाहा काय पण आठण केलीत पिडांकाका.

In reply to by गणपा

>>> शिवाय कालव्याच्या भज्या आठवून जीव अंमळ व्याकुळ झाला. हाय! दबदबीत, भज्या, पोळ्या इ. नावं वाचूनच हृदयात कालवाकालव झाली :(

In reply to by दिपाली पाटिल

मला वाटतं शिंपल्यात असतात त्या तिसर्‍या आणि मुळे.... कालवं दगडांत किंव्हा कपारींना क्लिंग करून असतात....

In reply to by पिवळा डांबिस

कालवं दगडांत किंव्हा कपारींना क्लिंग करून असतात....
बरोबर. समुद्रातल्या खडकात अश्या पद्धतीने चिकटलेली असतात. प्रचि जालावरुन साभार.

In reply to by गणपा

गोव्यात पण कालवं मिळतात. कालवं वरून खडबडीत असतात तर शिनाणे मोठ्या शिंपल्यांसारखे, पण एकाच काळसर हिरवट रंगाचे.

In reply to by दिपाली पाटिल

न मिळायला काय झाले ? अमेरिकन खातात कि ऑयस्टर. ९९ रांच कशाला, सेफवे मध्ये पण मिळायला हवे (असा अंदाज)

क्या बात है !!!!!!!!!!!!! झक्कास................. :)