खरंच मरण एवढं अवघड आहे मान्य करायला? कुणाचं ? स्वतःच की दुसऱ्याच ?
स्वतःच्या जाण्याबद्दल, मरणाबद्दल भीती जरी वाटत असली तरी ती भीती फक्त त्या सोसाव्या लागणाऱ्या वेदनेची असते, ज्याची आपल्याला काहीच कल्पना नसते. एक क्षण येतो कि जेव्हा ती वेदना तिची सीमा ओलांडते जी काही क्षण, काही तास, काही दिवस किंवा काही वर्षे आपली सोबत करत होती...आणि मग सगळं अगदी शांत होतं....काहीच मागे उरत नाही....पण फक्त आपल्यापुरत, आजुबाजुच्यासाठी नाही...स्वतःच्या मरणाचा विचार बहुदा इथेच संपतो....
आजूबाजूचे लोक, जवळचे, यांच्या बाबतीत मात्र अस नसतं. आपले आई वडील, नवरा, भाऊ-बहिण, मुलं यांच्या मरणाची कल्पनाही आपल्याला सहन होत नाही. स्वतःच्या मरणाच्या परिणामांची फिकीर आपण सहसा करत नाही, कारण आपल्यासाठी विषय तिथेच संपतो, कधीच संपतो. पण तेच इतरांच्या जाण्याचे परिणाम आपल्यावर होतात, अगदी खोलवर आणि विविध प्रकारे होतात. त्यांच्या जाण्याने आपण काहीतरी गमावतो, आपला आधार जातो, भावनिक, शारीरिक,मानसिक आणि आर्थिक ही आणि या आधारांबरोबर येणारी सुरक्षितता ही गेलेली असते.
काही वेळेस आपल्याला गेलेल्या माणसाबद्दल फारसं काही वाटतही नाही, पण त्याच्या जाण्याने आपल्या आयुष्यात उलथापालथ होते, छानशी असणारी घडी विस्कटते. आपल्या स्वार्थी गरजांपोटी आपल्याला वाईट वाटत राहतं.
पण अगदी जवळच्या लोकांबद्दलही वाटणार प्रेम स्वार्थीच असत का? काही प्रमाणात असतंच....आपल्या प्रेमाच्या, कौतुकाच्या, आधाराच्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्या अशी आपली कायमच इच्छा असते. अगदी आपली ८०-९० वर्षांची आई- आजी जी अगदी पलंगाला खिळून आहे ती ही आपल्याला हवी असते, तिला रोज जगताना सोसावा लागणारा त्रास, वेदना दिसत असूनही.....का तर आपल्याला तीच आवाज ऐकायचा असतो, तिच्याकडून डोक्यावरून हात फिरवून घ्यायचा असतो....
हा पण स्वार्थीपणाचाच एक प्रकार....नाही का? तो चुकीचा आहेही आणि नाहीही...यात जेवढी आपली चूक आहे तेवढीच चूक समोरच्याची पण. आपण त्या व्यक्तीत गुंतलेले असतो कारण त्या व्यक्तीनेच कुठेतरी आपल्याला तिच्या दिशेने ओढलेले असते, गुंतवलेले असते...
प्रत्येकजण आपल्यामागे राहणाऱ्यांना या जाळ्यात अडकवून पुढच्या प्रवासाला निघून जातो....आणि मागे राहणारा ही हाच कित्ता गिरवत त्याच्या मागे राहणाऱ्यांना आपल्यात गुंतवून पुढे निघून जातात...
वाचने
4754
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
(किरवंत फेम ) गवि कॅल्लिंग
??
In reply to (किरवंत फेम ) गवि कॅल्लिंग by स्पा
लेख छापतो..
In reply to (किरवंत फेम ) गवि कॅल्लिंग by स्पा
नेमेची येतो मग पावसाळा...
कदाचित हे जरा नाटकीय स्वरुपात
+१
In reply to कदाचित हे जरा नाटकीय स्वरुपात by इनोबा म्हणे
ओक्के !
जवळच्या कुणाचा मृत्यू
खरंय!
हॅ.... अत्ता कस्स...येकदम
In reply to खरंय! by धमाल मुलगा
अप्रतिम......
In reply to खरंय! by धमाल मुलगा
कस्चं कस्चं...
In reply to अप्रतिम...... by मिरची
धन्यवाद.....दोस्तांनो....
हे वाचा !
व्वा!
In reply to हे वाचा ! by चौकटराजा