भावगीते..
लेखनप्रकार
असेच आंतरजालावर भ्रमंती करताना मला e-snips वर काही भावगीते सापडली. या ठिकाणी मराठी भावगीतांचा चांगला संग्रह करण्यात आलेला आहे.
ही सारी भावगीतं तुम्ही ऑनलाईन ऐकू शकाल आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं भावगीत डाऊनलोड करुन घ्यावंसं वाटलं, तर डाऊनलोडसुद्धा करू शकता. फक्त त्यासाठी त्यांचा म्हणजे e - snips चा downloader bar तुमच्या संगणकावर उतरवून घ्यायला लागेल.
खरे तर हा लेख मी खरडफळ्यावर टाकू शकलो असतो, पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला. नंतर संपादक मंडळीनी हा लेख उडवला तरी माझी हरकत नाही.
नंतर संपादक मंडळीनी हा लेख
नंतर संपादक मंडळीनी हा लेख उडवला तरी माझी हरकत नाही.असं लिहील्यावर लेख उडवला जात नाही हे आता सगळ्यांना माहित झाले आहे. ;)
ई-स्निप्सचा डाऊनलोडर नसला
ई-स्निप्सचा डाऊनलोडर नसला, तरीही गाणी डाऊनलोड करता येतात.
आग्या-कोल्हा (फायरफॉक्स) वापरत असाल तर त्याचा एक अॅड्-ऑन आहे, 'डाऊनलोडहेल्पर'
हे अॅड्-ऑन वापरून कुठल्याही 'स्ट्रीमिंग मीडिया' साईट वरून गाणी डाऊनलोडता येतात.
यूट्यूबवरचे व्हीडिओ 'एफ्.एल्.व्ही'/'एम्पी४' फॉर्मॅटमध्येही डाऊनलोडता येतात.
आग्याकोल्हा नसेल आणि ईंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल तर खालील पद्धत-
सी ड्राईव्ह मध्ये एक temp data नावाचा हिडन फोल्डर असतो. तो अन-हाईड करायचा.
जे गाणं हवंय, ते त्या त्या साईटवर पूर्णपणे ऐकायचं मात्र बंधन आहे.
स्ट्रीम केलेला मीडिया टेम्पररी इंटरनेट फाईल्स या फोल्डर मध्ये सेव्ह होत असतो.
फक्त काम थोडं किचकट होतं. म्हणजे, त्या टेम्पररी इंटरनेट फोल्डर मध्ये ज्या काही फाईल्स असतील त्या सगळ्या
फाईल फॉर्मॅटनुसार फिल्टर करायच्या फाईलचे नाव काही नंबर आणि अल्फाबेट यांचं काँबिनेशन असतं.
प्रत्येक फाईल प्ले करून पहायची आणि मग हवी तशी रि-नेम करायची आणि टेम्पररी फोल्डर मधून हटवून हव्या त्या अन्य ठिकाणि सेव्ह करायची.
-चैतन्य
काहिही
पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला. नंतर संपादक मंडळीनी हा लेख उडवला तरी माझी हरकत नाही.>>>>>>>>
जे मिसळपावचे सदस्य नाहीत त्यांनी धागा वाचल्याचे कळणार कसे? तुम्ही ट्रॅक करणार आहात का?
पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला. नंतर संपादक मंडळीनी हा लेख उडवला तरी माझी हरकत नाही.>>>>>>>>
जे मिसळपावचे सदस्य नाहीत त्यांना माहिती द्यायला मिसळपावचा प्लॅटफॉर्म कशाला वापरताय? मिसळपाव म्हणजे महराष्ट्र टाईम्स अथवा सकाळ आहे का बातम्या पोचवायला?
पण जे मिसळपाव चे सदस्य नाहीत त्यांना खरडफळा दिसत नसल्याकारणाने मी हा लेख इथे टाकला. नंतर संपादक मंडळीनी हा लेख उडवला तरी माझी हरकत नाही.>>>>>>>>
तुम्ही कोणतीही जगावेगळी माहिती दिलेली नाही. आधीच लाखो लोक इस्निप्सचे मेंबर्स आहेत. ह्यात मिपाचे सभासद असलेले आणि नसलेलेही आले. त्या सगळ्यांना ही माहिती आहे आणि ते ह्या सोयीचा वापरही करत आहेत. उगाच नवी लोकं तुम्ही दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे गंडतील.
परा, adf.ly लिंक शॉर्ट करायला वापरली की..
...पैसे मिळतात - adf.ly ला जाऊन बघ! "उत्कर्श, एक लिंक टाकली मिपावर की किती मिळतात हो तुम्हाला? दोन नाहि तरी किमान एक पूज्य तरी पडत असेलंच? "
परा, लेका तुझ्या नेट-कॅफे मधे होम पेज साठीच अशी लिंक टाक की ५% तरी अॅडेड रेव्हेन्यू :-))
जाउ द्या हो..
जितके पुज्य मिळतील ते वाटुन घेउ. उगाच नका वाईट वाटून घेउ. बाकी इनो घेत चला अधुन मधून.
(आणि हो अवांतर :- माझे नाव उत्कर्ष आहे उत्कर्श नाही..)
काहिही....???
जे मिसळपावचे सदस्य नाहीत त्यांनी धागा वाचल्याचे कळणार कसे? तुम्ही ट्रॅक करणार आहात का?
नाही आम्ही तितके रिकामटेकडे नाही.
जे मिसळपावचे सदस्य नाहीत त्यांना माहिती द्यायला मिसळपावचा प्लॅटफॉर्म कशाला वापरताय? मिसळपाव म्हणजे महराष्ट्र टाईम्स अथवा सकाळ आहे का बातम्या पोचवायला?
मग तुमची परवानगी घेत जाऊ म्हणता का लेख टाकण्याआधी???
तुम्ही कोणतीही जगावेगळी माहिती दिलेली नाही. आधीच लाखो लोक इस्निप्सचे मेंबर्स आहेत. ह्यात मिपाचे सभासद असलेले आणि नसलेलेही आले. त्या सगळ्यांना ही माहिती आहे आणि ते ह्या सोयीचा वापरही करत आहेत.
मिसळपावावरिल सगळेच मेंबर्स हे इस्निप्सचे मेंबर्स आहेत हे मला माहितच नव्हते.
उगाच नवी लोकं तुम्ही दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे गंडतील.
यात गंडायचा प्रश्न येतोच कुठे??