मातृदेवो भव पितृ देवो भव.......... या विचारांचा पगडा अजून दूर होत नाही. असे कोणाला तरी म्हणत असतानाच शशीकांतचा फोन आला. विजुभाऊ वेळ आहे का? माझ्या एका मित्राना घेऊन येतोय.
ठरल्या वेळेच्या पाच मिनिटे अगोदरच एका मध्यवयीन गृहस्थाना घेऊन शशीकांत आला. त्याने मला ओळख करुन दिली थोडेसे बोलणे झाल्यावर शशिकांत म्हणाला याना तुमच्याशी काही बोलायचे आहे. तुम्ही बोला मी निघतो. त्या गृहस्थाना पाहिल्यावर मी थोडासा अंदाज केला. मुलगा अभ्यास करत नाही/ नोकरी नाही वगैरे वगैरे असे काहितरी असेल.
पहिल्यांदा ते काहीच बोलत नव्हते. मी त्याना थोडे पाणी दिले थोडे इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर ते बोलु लागले.
त्यंची मुलगी दहावीलाबोर्डात आली होती. मुलगा मात्र अभ्यासात फारच कच्चा होता. बहीणीपेक्षा सहा वर्षानी मोठा असूनही तो बारावी पास होऊ शकत नव्हता. त्या गृहस्थाना मुलाबद्दल काय करता येईल असे विचारायचे होते.
पण त्यांची मनःस्थिती मात्र काहितरी वेगळेच सांगत होती.
मुलगा अभ्यासात हुशार होता. दहावी पर्यन्त शाळेत काहीच प्रॉब्लेम नव्हता. स्वभाव थोडा तापट होता. इयत्ता नववी पर्यन्त वडिलांच्या धाकात होता. अचानक काय झाले वडीलांचा धाक कमी होउ लागला.
नववीत असताना कशावरूनतरी त्याने वडिलांच्या पाठीत गुद्दे मारले. राग अनावर झाला की तो घरातील वस्तु तोडणे आरसे फोडणे दरवाजे आपटणे इत्यादी प्रकार करीत असे.
एक दिवस त्याने वडिलांच्या कानफाटात मारली. हे प्रकार दिवसेंदिवस वाढु लागले. वडिलांच्या मते मुलाला काहीहे व्यसन वगैरे नव्हते. काहि दिवसानी मुलाने धाकट्या बहिणीला सुद्धा मारहाण करण्यास सुरवात केली.
मुलीचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून वडीलानी मुलीला बाहेरगावी हॉस्टेलमध्ये ठेवले. त्यानंतर मुलाने ताळतंत्रच सोडला. वडिलाना तो प्रसंगी लाथाबुक्याने देखील मारहाण करू लागला.
वडिलांचे बोलणे ऐकल्या नंतर मी विचारले त्यानी मुलाला कधी पोलिसांची भिती दाखवली होती का? आणि तुम्ही हे क सहन करीत आहात? त्यावर त्यांचे उत्तर होते अहो मुलगा खरच खूप प्रेमळ आहे. त्याचा राग ओसरला की तो केलेल्या कृत्याबद्दल त्याला फार पश्चाताप होतो. तो पुन्हा असे करणार नाही असे म्हणतो पण राग अनावर होताच सगळे विसरतो. आत्तापर्यन्त त्याने आईवर मात्र कधी हात उगारला नव्हता पण दोन दिवसांपुर्वी ती गोष्टदेखील झाली.
मी त्याना मुलाला सायकोथेरेपीची गरज असल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले की तुम्ही मुलाशी बोला तो अत्यंत नॉर्मल आहे. तो गिटार खुप चांगला वाजवतो. असा मुलगा वेडा असू शकेल का?
मी मुलाशी बोलायचे ठरवले. त्याप्रमाणे त्याच्याशी बोललो सुद्धा.
मुलगा थोडा शांत नाही पण अस्थीरही नाही असा वाटत होता. बोलताना त्याने अभ्य्यास आवडत नाही. गाण्याचा एखादा ऑर्केस्ट्रा सुरू करायचा आहे असे उत्साहाने सांगितले.
त्याला अजून बोल असे सांगितले. तो बोलत होता. गिटारचे प्रकार सांगत होता.
त्याला काही दिवसानी पुन्हा येण्यास सांगितले. त्या अगोदर त्या पालकांसोबत एक मिटिंग झाली. त्यानी मुलगा माझ्याशी बोलल्या नंतर तीन चार दिवस घरात काहीच मारहाणीचे प्रसंग आले नाहीत असे सांगितले. जाताना ते म्हणाले सर आई शप्पथ सांगतो माझा मुलगाखूप गुणी आहे त्याच्यातीएल रागीटपण वर तुम्ही त्याला ताबा मिळवायला मदत केलीत तर अक्षरशः माझ्या कातड्याए जोडे करून देईन तुम्हाला.
त्या मुलाशी मी असाच दोन तीन वेळा बोललो. एकदा बोलताना तो स्वत: होऊन म्हणाला मला माझ्या वडिलांचा कधीकधी फार राग येतो. असे वाटते की त्यांच्या खून करावा.
का रे असे वाटते ते वडील आहेत तुझे....... बोल अगदी मोकळेपणाने बोल.
काय सांगु सर?
मी कळत्या वयाचा होतो... एकदा अचानक रात्री कसल्या तरी आवाजाने जाग आली. मी पलंगावर झोपलो होतो.
खाली आई वडील आणि बहीण झोपले होते. आईला बरे नव्हते. वडील आईच्या तोंडावर हात दाबून तिच्यावर बलात्कार करत होते. आई तळमळत होती आणि हा राक्षस तिच्यावर..............
मी सुन्न झालो ...........
अरे तु आता मोठा आहेस. नवरा बायको यांच्या नाते संबन्धातील गोष्टींबद्दल तुला माहीत असेल....
सर मला ते त्यावेळेसही माहीत होते.......पण.....
पण काय..... अरे असे व्हायचेच. जगात जन्मलेल्या प्रत्येक जीवाला वासना ही असतेच. काही गोष्टींकडे दुर्लक्ष्य कर. हवे असेल तर कुठेतरी दुरच्या गावीजा शिकायला . होस्टेलवर रहा. म्हणजे या गोष्टी तुझ्यापासून दूर रहातील.
तुझे आई वडील जे करतात त्याच क्रीयेतून तुझा जन्म झालेला आहे. प्रत्येक नवरा बायको संभोग करतातच. आपले आई वडील हे आई वडील होण्यापूर्वी पासून पतीपत्नी आहेत हे लक्षात घे ना.
सर तुम्ही म्हणत ते पटते मला........... पण ती गोष्ट आठवली की मी माझ्या रागावर ताबा ठेवू शकत नाही.
कोणती गोष्ट......
सर्.माझी आई आजारी होती. बहीण सुद्धा आजारी होती.
अणि हा माणूस..........
अरे एक लक्षात घे .ते दोघे जे काहे करतात ती त्यांची सर्वात खाजगी गोष्ट आहे. तुझ लग्न झाल्यावर तु सुद्धा त्झ्या बायकोशी असाच रत होशील. संभोग करशील.
सर तुम्ही काहीही सांगा.......... मी असे करणे शक्य नाही.
का रे?
आता ऐकायची पाळी माझी होती. सर मी भाषा शिकतो. संभोग याची फोड सम भोग अशी होते.बलात्कार अशी होत नाही. बायको आजारी असताना. तीला असह्य वेदना होत असताना जो माणूस तिच्या तोंडातून शब्द उमटू नये म्हणून तोंड दाबून धरतो आणि.......... . त्यावेळेसच बापाच्याडोक्यात बत्ता हाणून त्याला ठार कराव असं वाटत होतं.पण घाबरलो होतो......... माझा श्वास कोंडला गेला होता.
बापाला आनंदात बघितले की मला त्या दृष्याची आठवण होते.......... आताही बत्त्त्याचे त्याचे लिंग चेचुन टाकावे असे वाटते. माझा जन्म सुद्धा अशाच एखाद्या बलात्कारातून झालाय.........
बलात्कारातून जन्मलेली औलाद आहे मी.
मी सुन्न झालो होतो.
त्या मुलाची समजूत घातली. त्याला पुण्यातल्या कॉलेजात अॅडमिशन घेउन दिली .
त्या पालकांची समजूत काय घालावी हे मात्र आजदेखील ठरवू शकलेलो नाहिय्ये
वाचने
53029
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोक सुन्न झाल ,असेहि
प्रथमता काय बोलावे हेच कळाले
अगदी.. लहान मुलांचा काय समज
+१
In reply to अगदी.. लहान मुलांचा काय समज by गवि
हम्म...
+१
In reply to हम्म... by दादा कोंडके
शिवाय त्याने हल्ली आईलाही मारलं आहेच.. त्याला कारण काय असावं?
आई, वडिल, आणि मुलगा तिघांनाही
सहमत
In reply to आई, वडिल, आणि मुलगा तिघांनाही by स्वाती२
सहमत
In reply to सहमत by मी-सौरभ
मास्तरांना ह्याबद्दल काय करावे माहित असेल.
अधाशी उदय +१
विचित्र घटना आहे खरी.. जस्ट
In reply to अधाशी उदय +१ by अन्नू
अरे रे..
In reply to अधाशी उदय +१ by अन्नू
विजुभौ, तुम्ही लेख जिथे
विजुभौ, तुम्ही लेख जिथे
मुलगा कळत्या वयाचा असला तरी
भारता सारख्या देशात जेथे
In reply to मुलगा कळत्या वयाचा असला तरी by किचेन
त्याच बरोबर "वन रूम किचन" हि
In reply to भारता सारख्या देशात जेथे by पक पक पक
ग्रेट !
झाली गोष्ट परत आणता येत
मुलांना वेगळे झोपायची सवय
In reply to झाली गोष्ट परत आणता येत by इरसाल
"शक्य असल्यास "
In reply to मुलांना वेगळे झोपायची सवय by पक पक पक
अर्थात
In reply to "शक्य असल्यास " by मोदक
?
+/-
In reply to ? by विनायक प्रभू
मास्तर ह्या पेक्षा जास्त अपेक्षा होत्या.
In reply to ? by विनायक प्रभू
डोके सुन्न करणारा प्रकार आहे.
माझ्या माहितीतल्या एका ४-५
In reply to डोके सुन्न करणारा प्रकार आहे. by स्वातीविशु
बापरे!!!!!!!
त्यात काय?
In reply to बापरे!!!!!!! by रानी १३
@आता ते नातवंडांच्या पुढ्यात
In reply to त्यात काय? by पिवळा डांबिस
चाळीशीच कशाला मेली पुढेही
In reply to त्यात काय? by पिवळा डांबिस
?
In reply to चाळीशीच कशाला मेली पुढेही by शुचि
विनोदी.
लहान वयात जे समोर घडले त्याचा
कायच्या काहीच मनोव्रुती