Skip to main content

पितृदेवो भव.............?

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 07/02/2012 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मातृदेवो भव पितृ देवो भव.......... या विचारांचा पगडा अजून दूर होत नाही. असे कोणाला तरी म्हणत असतानाच शशीकांतचा फोन आला. विजुभाऊ वेळ आहे का? माझ्या एका मित्राना घेऊन येतोय. ठरल्या वेळेच्या पाच मिनिटे अगोदरच एका मध्यवयीन गृहस्थाना घेऊन शशीकांत आला. त्याने मला ओळख करुन दिली थोडेसे बोलणे झाल्यावर शशिकांत म्हणाला याना तुमच्याशी काही बोलायचे आहे. तुम्ही बोला मी निघतो. त्या गृहस्थाना पाहिल्यावर मी थोडासा अंदाज केला. मुलगा अभ्यास करत नाही/ नोकरी नाही वगैरे वगैरे असे काहितरी असेल. पहिल्यांदा ते काहीच बोलत नव्हते. मी त्याना थोडे पाणी दिले थोडे इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर ते बोलु लागले. त्यंची मुलगी दहावीलाबोर्डात आली होती. मुलगा मात्र अभ्यासात फारच कच्चा होता. बहीणीपेक्षा सहा वर्षानी मोठा असूनही तो बारावी पास होऊ शकत नव्हता. त्या गृहस्थाना मुलाबद्दल काय करता येईल असे विचारायचे होते. पण त्यांची मनःस्थिती मात्र काहितरी वेगळेच सांगत होती. मुलगा अभ्यासात हुशार होता. दहावी पर्यन्त शाळेत काहीच प्रॉब्लेम नव्हता. स्वभाव थोडा तापट होता. इयत्ता नववी पर्यन्त वडिलांच्या धाकात होता. अचानक काय झाले वडीलांचा धाक कमी होउ लागला. नववीत असताना कशावरूनतरी त्याने वडिलांच्या पाठीत गुद्दे मारले. राग अनावर झाला की तो घरातील वस्तु तोडणे आरसे फोडणे दरवाजे आपटणे इत्यादी प्रकार करीत असे. एक दिवस त्याने वडिलांच्या कानफाटात मारली. हे प्रकार दिवसेंदिवस वाढु लागले. वडिलांच्या मते मुलाला काहीहे व्यसन वगैरे नव्हते. काहि दिवसानी मुलाने धाकट्या बहिणीला सुद्धा मारहाण करण्यास सुरवात केली. मुलीचा अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून वडीलानी मुलीला बाहेरगावी हॉस्टेलमध्ये ठेवले. त्यानंतर मुलाने ताळतंत्रच सोडला. वडिलाना तो प्रसंगी लाथाबुक्याने देखील मारहाण करू लागला. वडिलांचे बोलणे ऐकल्या नंतर मी विचारले त्यानी मुलाला कधी पोलिसांची भिती दाखवली होती का? आणि तुम्ही हे क सहन करीत आहात? त्यावर त्यांचे उत्तर होते अहो मुलगा खरच खूप प्रेमळ आहे. त्याचा राग ओसरला की तो केलेल्या कृत्याबद्दल त्याला फार पश्चाताप होतो. तो पुन्हा असे करणार नाही असे म्हणतो पण राग अनावर होताच सगळे विसरतो. आत्तापर्यन्त त्याने आईवर मात्र कधी हात उगारला नव्हता पण दोन दिवसांपुर्वी ती गोष्टदेखील झाली. मी त्याना मुलाला सायकोथेरेपीची गरज असल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले की तुम्ही मुलाशी बोला तो अत्यंत नॉर्मल आहे. तो गिटार खुप चांगला वाजवतो. असा मुलगा वेडा असू शकेल का? मी मुलाशी बोलायचे ठरवले. त्याप्रमाणे त्याच्याशी बोललो सुद्धा. मुलगा थोडा शांत नाही पण अस्थीरही नाही असा वाटत होता. बोलताना त्याने अभ्य्यास आवडत नाही. गाण्याचा एखादा ऑर्केस्ट्रा सुरू करायचा आहे असे उत्साहाने सांगितले. त्याला अजून बोल असे सांगितले. तो बोलत होता. गिटारचे प्रकार सांगत होता. त्याला काही दिवसानी पुन्हा येण्यास सांगितले. त्या अगोदर त्या पालकांसोबत एक मिटिंग झाली. त्यानी मुलगा माझ्याशी बोलल्या नंतर तीन चार दिवस घरात काहीच मारहाणीचे प्रसंग आले नाहीत असे सांगितले. जाताना ते म्हणाले सर आई शप्पथ सांगतो माझा मुलगाखूप गुणी आहे त्याच्यातीएल रागीटपण वर तुम्ही त्याला ताबा मिळवायला मदत केलीत तर अक्षरशः माझ्या कातड्याए जोडे करून देईन तुम्हाला. त्या मुलाशी मी असाच दोन तीन वेळा बोललो. एकदा बोलताना तो स्वत: होऊन म्हणाला मला माझ्या वडिलांचा कधीकधी फार राग येतो. असे वाटते की त्यांच्या खून करावा. का रे असे वाटते ते वडील आहेत तुझे....... बोल अगदी मोकळेपणाने बोल. काय सांगु सर? मी कळत्या वयाचा होतो... एकदा अचानक रात्री कसल्या तरी आवाजाने जाग आली. मी पलंगावर झोपलो होतो. खाली आई वडील आणि बहीण झोपले होते. आईला बरे नव्हते. वडील आईच्या तोंडावर हात दाबून तिच्यावर बलात्कार करत होते. आई तळमळत होती आणि हा राक्षस तिच्यावर.............. मी सुन्न झालो ........... अरे तु आता मोठा आहेस. नवरा बायको यांच्या नाते संबन्धातील गोष्टींबद्दल तुला माहीत असेल.... सर मला ते त्यावेळेसही माहीत होते.......पण..... पण काय..... अरे असे व्हायचेच. जगात जन्मलेल्या प्रत्येक जीवाला वासना ही असतेच. काही गोष्टींकडे दुर्लक्ष्य कर. हवे असेल तर कुठेतरी दुरच्या गावीजा शिकायला . होस्टेलवर रहा. म्हणजे या गोष्टी तुझ्यापासून दूर रहातील. तुझे आई वडील जे करतात त्याच क्रीयेतून तुझा जन्म झालेला आहे. प्रत्येक नवरा बायको संभोग करतातच. आपले आई वडील हे आई वडील होण्यापूर्वी पासून पतीपत्नी आहेत हे लक्षात घे ना. सर तुम्ही म्हणत ते पटते मला........... पण ती गोष्ट आठवली की मी माझ्या रागावर ताबा ठेवू शकत नाही. कोणती गोष्ट...... सर्.माझी आई आजारी होती. बहीण सुद्धा आजारी होती. अणि हा माणूस.......... अरे एक लक्षात घे .ते दोघे जे काहे करतात ती त्यांची सर्वात खाजगी गोष्ट आहे. तुझ लग्न झाल्यावर तु सुद्धा त्झ्या बायकोशी असाच रत होशील. संभोग करशील. सर तुम्ही काहीही सांगा.......... मी असे करणे शक्य नाही. का रे? आता ऐकायची पाळी माझी होती. सर मी भाषा शिकतो. संभोग याची फोड सम भोग अशी होते.बलात्कार अशी होत नाही. बायको आजारी असताना. तीला असह्य वेदना होत असताना जो माणूस तिच्या तोंडातून शब्द उमटू नये म्हणून तोंड दाबून धरतो आणि.......... . त्यावेळेसच बापाच्याडोक्यात बत्ता हाणून त्याला ठार कराव असं वाटत होतं.पण घाबरलो होतो......... माझा श्वास कोंडला गेला होता. बापाला आनंदात बघितले की मला त्या दृष्याची आठवण होते.......... आताही बत्त्त्याचे त्याचे लिंग चेचुन टाकावे असे वाटते. माझा जन्म सुद्धा अशाच एखाद्या बलात्कारातून झालाय......... बलात्कारातून जन्मलेली औलाद आहे मी. मी सुन्न झालो होतो. त्या मुलाची समजूत घातली. त्याला पुण्यातल्या कॉलेजात अ‍ॅडमिशन घेउन दिली . त्या पालकांची समजूत काय घालावी हे मात्र आजदेखील ठरवू शकलेलो नाहिय्ये

वाचने 53029
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

डोक सुन्न झाल ,असेहि प्रॉब्लेम असतात ..? विश्वास बसत नाही.त्या मुलाची मानसिकता खुपच लहान वयात बिघड्ली.त्यात त्याचा काही दोश नसावा.पण ...............

प्रथमता काय बोलावे हेच कळाले नाहि .. कारण मुलाचे विचार चुकीचे नव्हते.. पण नंतर विचार करता कळाले ... की वडीलांना शिक्षा करण्याचा हक्क त्याला मुळीच नाही.. आणि त्यानी पाहिलेल्या गोष्टीमुळे त्याचा जन्म ही असाच झाला असेन असे जे त्याचे म्हणने आहे ते ही चुकीचे वाटते.. काही मुले , अशी ही रागाची लड डोक्यात ठेवतात आणि तसे वागतात, हे चुकीचेच आहे .. त्याची आई ही एकमेव व्यक्ती आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टीमधुन बाहेर काढु शकेन..

अगदी.. लहान मुलांचा काय समज होईल आणि कसा घट्ट होऊन राहील सांगता येत नाही.. बलात्कार करत होता हे त्याने गृहीतच धरलं आहे. आणि आता त्याच्या आईलाही याविषयी मोकळेपणाने बोलता येणं फार कठीण आहे.. शिवाय त्याने हल्ली आईलाही मारलं आहेच.. त्याला कारण काय असावं? मला वाटतं या मुलाला काउन्सेलिंग आणि औषधोपचारांची अत्यंत गरज आहे. नातेवाईक, मित्र आणि अशा अन्य सब्जेक्टिव्ह लोकांकडून उपाय कमी आणि अपाय जास्त होईल. ऑब्जेक्टिव्ह काउन्सेलर हवा.. (सायकॉलॉजिस्ट / सायकियाट्रिस्ट)..

मागे कुठल्याशा सर्वेक्षणात ७०% भारतीय मुलं-मुली कळत्या वयात आपल्या आईवडीलांचा समागम करताना (किंवा नकोत्या अवस्थेत) बघतात असं वाचलं होतं. अर्थातच विश्वास बसला नव्हता. पण जे कुणी बघत असतील त्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम झाला नाही तरच नवल. नंतर येणार्‍या समजे मुळे कदाचीत दीर्घकालीन परिणाम होणार नाहीत पण त्या दिवसांत अभ्यासात लक्ष न लागणे, आईवडीलांचा राग येणे वगैरे होत असेलच. कधीकधी तसंच घडलं असेल असं ही नाही. सिनेमात बघितल्यामुळे त्या वयातल्या मुलांना संभोग म्हणजे बलात्कारच वाटू शकतो. या विषयावर (प्रसंगाबाबत) त्याच्या आईवडीलांशी बोलणंही गरजेचं आहे. मगच काय करायचं ते ठरवू शकतो. अवघड आहे, पण आई-वडील आणि पोरात कटुता येउ द्यायची नसेल तर याला पर्याय नाही. पोरगं काय आज-उद्या सुधारेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहील. पण आई-वडीलांबद्दल द्वेश कायम असेल! जर तो प्रसंग तसाच घडला असेल तर च्यायला त्या बापाला औषधोपचाराची गरज आहे. एकाच खोलीत पोरं झोपलेली असताना, बायको आजारी असताना हे असलं काहीतरी करायचा विचारही कसं काय करू शकतो तो?

In reply to by दादा कोंडके

जर तो प्रसंग तसाच घडला असेल तर च्यायला त्या बापाला औषधोपचाराची गरज आहे. एकाच खोलीत पोरं झोपलेली असताना, बायको आजारी असताना हे असलं काहीतरी करायचा विचारही कसं काय करू शकतो तो?
.................!! :( :( :(

गविंशी अगदी सहमत... अश्या व्यक्तींना तज्ञ सल्लागारांची (सायकॉलॉजिस्ट / सायकियाट्रिस्ट) गरज आहे... त्या वडिलांनी आई बरोबर जे काहि केले (त्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे) ते चुक् आहे .. पण ज्या आर्थी त्या मुलाचे वडिल, स्वतःच्या मुलाचा असा मार खाउनहि आज त्याची बाजु घेताय, त्यातुन त्याला बाहेर काढु पाहताय ह्या वरुन असे वाटते, तो मनुष्य (वडिल) एवढा वाईट नसावा ... जर त्याचे वडिल मुळातच 'अघोरी' असते तर त्यांनी मुलाला केंव्हाच घराबाहेर काढले असते (निदान त्याच्यासाठी एवढे प्रयत्न तरी केले नसते)... कदाचित त्याच्या वडिलांनी त्या रात्रीनंतर आईची (त्यांच्या बायकोची) माफि हि मागितली असेल..आणि आईने (त्यांच्या बायकोने) त्याना अगदी सहज माफ केले हि असेल ... हे त्या मुलाने सगळे पहिले असेल का???

आई, वडिल, आणि मुलगा तिघांनाही तज्ञांच्या मदतीची गरज आहे. जे घडले ते पाहून मुलाला वडिलांबद्दल राग वाटणे स्वाभाविक आहे. जो पर्यंत या घटनेबद्दल आई-वडिल आणि मुलगा समोरासमोर बोलून मोकळे होत नाहित तोपर्यंत तिढा सुटणे कठिण! :(

In reply to by मी-सौरभ

स्वाती आणि सौरभ दोघांशीही सहमत.

मुले वयात येताना त्यांना खरं म्हणजे पालकांकडून या बाबी समजून देणे आवश्यक असतात परंतु आजकाल कोणीही याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनपेक्षितपणे आणि अचानक जेव्हा त्यांच्यासमोर प्रत्यक्ष असे काही घडते किंवा त्यांच्या स्वतः वर जरी कधी असा प्रसंग येतो त्यावेळी त्यांच्या मनावर विपरित परिणाम झाल्यावाचून राहत नाही. आमच्या गावातही अशीच एक घटना घडली होती. "मुलांना सेक्स एज्युकेशन देणे म्हणजे व्यभिचार शिकवणे". अशी समजुत असल्यामुळे घरच्यांनी आपल्या मुलीला याबाबत काहीच ज्ञान दिले नाही. त्यात ती मुलगीसुद्धा अगदी सरळ अन साधी! त्यामुळे ज्या गोष्टीं तिला वयात येताना समजायला हव्या होत्या, त्या गोष्टीं तिला कधीच समजल्या नाही आणि हाच अज्ञानपणा नंतर तिच्या अंगलटी आला. ती मुलगी तशी, सुशिक्षित, हुशार, अन् देखणी होती. त्यामुळे तिचे लग्न लवकर जुळले. पण लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री जेव्हा तिच्यावर असा प्रसंग ओढावला; तेव्हा मात्र तिची मानसिक स्थिती पुर्णपणे ढासळली, राग अन भितीने तिने आपल्या नवर्‍याला दूर ढकलून दिले, त्वेषाने वेड्यासाखी जोरजोरात ओरडू- किंचाळू लागली, रडु लागली. काही वेळ हा काय प्रकार चाललेला आहे हे कोणालाच समजला नाही. आजुबाजुला गोंधळ उडुन चर्चा होऊ लागली. मुलगी वेडी निघाली या समजुतीने सासरच्या लोकांना राग आला. तिला त्वरेने माहेरी पाठवण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांच्या चाचण्या, तपासण्या झाल्यानंतर असे समजले कि, तिला सेक्सबद्दलच्या कोणत्याच गोष्टीचे ज्ञान नसल्याने असे झाले होते. आयुष्यात पहिल्यांदाच ती अशा गोष्टीला सामोरी जात होती, कधीही न पाहिलेल्या, न ऐकलेल्या, न समजलेल्या अशा गोष्टी तिच्या आकलनाच्या बाहेरच्या होत्या. अनपेक्षितपणे अचानक घडलेली ही घटना म्हणजे तिच्या मनावर एकप्रकारचा जबरदस्त आघातच होती. त्यानंतर ती माहेरामध्येच राहू लागली, सासरला जायच्या नावानेही ती घाबरु लागली. घरच्यांनी तिला समजवण्याचे खुप प्रयत्न केले पण व्यर्थ! उलट एखादा पुरुष जरी दिसला तरी ती हायपर होऊ लागली, जोराने किंचाळू लागली. तिला या धक्क्यातुन वर काढणे म्हणजे अशक्यप्राय होऊन बसले होते. प्रेम म्हणजे फिल्मी दुनियेत होत तसच बोलणं-हसणं-गाणं म्हणणं-फिरायला जाणं; अशा एका स्वप्नरंजन दुनियेत जगणारी ती! प्रेमाचा वास्तव जगातील अर्थ आणि त्याचा अनुभव कसा काय समजु शकणार होती? त्यामुळेच अचानक वास्तव प्रेमाचे समोर येणारे हे अनपेक्षित रुप तिच्यासाठी खुपच भयानक ठरले आणि त्याने तिच्या मनावर जो आघात केला त्यातून ती कधीच सावरली गेली नाही. म्हणून मुलांना योग्य वेळी योग्य वयात या गोष्टीचे ज्ञान देणे हेच गरजेचे आहे.

In reply to by अन्नू

>>प्रेम म्हणजे फिल्मी दुनियेत होत तसच बोलणं-हसणं-गाणं म्हणणं-फिरायला जाणं; अशा एका स्वप्नरंजन दुनियेत जगणारी ती! खरंच विचित्र घटना आहे ही.. तीने दिलीपकुमार वगैरेच्या टाईमातले चित्रपट पाहीलेत का काय? माझ्यामते, सेक्स एज्युकेशनची गरज आहे.. कमीत कमी मुलीशी आईने ह्या गोष्टींबद्दल तिच्या कळत्या वयात बोलायला पाहीजे, आणि मला वाटते की ते होतं ही.. बाकी, मोबाईलमध्ये "व्हिडीयो" साठवण्याची सोय आल्यापासून हे शिक्षण भरपुर पसरतंय.. अगदी, मंत्री लोकं पणाभ्यास करत असतात म्हणे, सदानकदा.. ;-)

विजुभौ, तुम्ही लेख जिथे थांबवला, तिथे मला तरी तो अपुर्ण वाटतोय आणी त्यामुळे त्या मुलाला सहानभुती आणि त्याच्या वडीलांना दोष जातोय. तुम्ही नंतर त्याच्या वडीलांशी बोलुन खात्री करुन घेतली का कि त्यांचा मुलगा जे बोलतोय ते खरे आहे? हि पण शक्यता असु शकते कि हे सर्व त्याच्या मनाचे खेळ असतील किंवा त्यानी अर्धवट जे बघीतले त्याचा त्यानी चुकिचा अर्थ काढला. काहीही झाल तरी त्या मुलाला हे पण कळाले पाहिजे कि त्याच्या आई वडीलांच हे अत्यंत खाजगी आयुष्य आहे आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टी त्याला वाटतात तश्या साध्या सरळ नसतील, त्यांना काहिही पार्श्वभुमी असु शकते जी त्या मुलाला माहीत नसेल. अस काही पचवायला खरोखर अवघड असेल मुलाला पण स्वःताला वाटेल तस त्याचा अर्थ काढुन त्याने जे वर्तन केले ते नक्कीच चुकिच आहे आणी त्याला नक्कीच उपचारांची गरज आहे. --टुकुल

विजुभौ, तुम्ही लेख जिथे थांबवला, तिथे मला तरी तो अपुर्ण वाटतोय आणी त्यामुळे त्या मुलाला सहानभुती आणि त्याच्या वडीलांना दोष जातोय ते तसे नाही. जेंव्हा मुलाला संभोगया शब्दाचा अर्थ माहीत होता. मुलगा साधारणतः १७ १८ वर्षांचा होता. पण बापाला कधिही आनंदात पाहिले की त्याचा संताप अनावर व्हायचा. मुलाचा संताप अनावर होणे हा मूळ प्रश्न होता. आई वडिलांना समागम करताना पहाणे हा नव्हता. अर्थात त्या गोष्टीला अनेक फाटे फुटतात. आई वडील मुलगा हे तिघे एकमेकाशी या विषयावर बोलणे शक्य नव्हते. आई वडीलांना हे सांगून झाले पण घडून गेलेल्या गोष्टीला ते तरी काय करणार होते. बर्‍याचदा जागेची अडचण असते. बर्‍याचदा पती किंवा कत्नी यांच्या स्वभावाची सुद्धा अडचण असते

मुलगा कळत्या वयाचा असला तरी त्याला सर्वच गोष्टी माहित असतील अस नाही.शिवाय आई आजारी होती म्हण्जे किती आजारी होती हे लिहिलं नाही. आजारी स्त्रीला देखील संभोग करण्याची इच्छा होऊ शकते.बाबा पूर्णपणे चुकीचेच आहेत अस नसेल.कदाचित शेजारी झोपलेल्या बहिणीला आणि मुलांना उत्तेजित अवस्थेतला आवाज जाऊ नये म्हणून तोंडावर हात ठेवला असेल.हि गोष्ट अशी पाहिल्यावर गैरसमज होण साहजिकच आहे.१७-१८ वर्षांचा मुलाने आपल्या पालकांना अशा अवस्थेत बघितल्यावर मनावर परिणाम होण साहजिकच आहे.तसाच त्यान हि गोष्ट कोणाला सांगितलीच नसेल. अपूर्ण माहिती आणि मनाचा कोंडमारा यातून मुलाची चिडचिड वाढली असेल.

In reply to by किचेन

भारता सारख्या देशात जेथे लोक्संख्या खुप जास्त आहे व त्या मानाने रहायच्या जागेची खुप गैरसोय आहे ..असा कनिश्ठ व मध्यम वर्गिय स्तर मोठया प्रमाणात आहे.कि एकाच घरात जास्त माण्से रहातात.अशी खुप कुटुंब आहेत कि त्यांना प्रायव्हसि मिळ्त नाही अशा वेळेस स्वतःच्या शारिरीक गरजा पुर्ण न झाल्याने सुद्धा अनेक कुटुंबे अस्वस्थ आहेत्.त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडु शकतात्.पण म्हणून कोणाचिही मानसिकता या थराला जावी हे खुप भयंकर आहे.त्या मुळे लैंगिक शिक्शण खुप गरजेचे आहे असे वाट्ते.

In reply to by पक पक पक

त्याच बरोबर "वन रूम किचन" हि संकल्पना मोडीत काढून कमीत कमी "वन बिएचके" हि संकल्पना अंगिकारली पाहिजे. ;)

विजुभौ इज बॅक :)

झाली गोष्ट परत आणता येत नाही. पण शक्य असल्यास एका विशिष्ट वयोमानानंतर मुलांना वेगळे झोपायची सवय लावणे अनिवार्य आहे.त्यात त्यांची आणि पालकांची दोहोंची प्रायव्हसी शाबूत राहते.

In reply to by इरसाल

मुलांना वेगळे झोपायची सवय लावणे अनिवार्य आहे. एका खोलीत रहाणर्‍या कुटूंबाला कस शक्य आहे ते..?

हम्म

In reply to by विनायक प्रभू

प्रभूमास्तर (ते सुद्धा या विषयावरील धाग्यात!) शब्दहीन झाल्याचे पाहून ड्वाळे पानावले!!! :) बाकी धाग्याबद्दल, गरिबी ही माणसाला किती वेगवेगळ्या प्रकारे दीन बनवते असे वाटून वाईट वाटले. :(

डोके सुन्न करणारा प्रकार आहे. मुलाला होस्टेलमधे पाठविणे ही तात्पुरती मलमपट्टी झाली आहे. पण त्याचे योग्य रीतीने काउन्सेलिंग करुन त्याच्या डोक्यातून वाईट गैरसमज काढून टाकले पाहिजे. योग्य वयात लैंगिक शिक्षण मुलांना मिळणे आवश्यक वाटते. अवांतरः माझ्या माहितीतल्या एका ४-५ वर्षाच्या मुलाने त्याच्या आजी-आजोंबांना नको त्या अवस्थेत पाहिले होते आणि सगळ्या आळीत सांगत सुट्ले होते.....तात्या काकुच्या उरावर बसले होते म्हनुन.....:wink:(काय ही मुले......अवघड आहे ब्वा यांना समजावणे.....)

In reply to by स्वातीविशु

माझ्या माहितीतल्या एका ४-५ वर्षाच्या मुलाने त्याच्या आजी-आजोंबांना नको त्या अवस्थेत पाहिले होते आणि सगळ्या आळीत सांगत सुट्ले होते.....तात्या काकुच्या उरावर बसले होते म्हनुन.....
Smiley

आता आजी- आजोबा पण का? (काय ही मुले......अवघड आहे ब्वा यांना समजावणे.....) समजावण्याच्या पलिकडले.............

In reply to by रानी १३

आता आजी- आजोबा पण का? समजा आजी-आजोबांना २०-२२ वयात मुलं झाली (यात काहीच विचित्र नाही, जुना काळ) आणि त्या मुलांना २०-२४ मध्ये मुलं झाली... तर नातवंड असलेले आजी आजोबा चाळिशीत असणार की नाही? चाळिशीतल्या माणसांना लैंगिक आयुष्य नसतं का? हां, आता ते नातवंडांच्या पुढ्यात कुस्ती का खेळत होते हा भाग वेगळा.... ;)

In reply to by शुचि

चाळीशीच कशाला मेली पुढेही लैगिक आयुष्य नसतं की काय?
हो हो नक्कीच असत. अमिताभच्या "नि:शब्द" मुव्ही मध्ये याचा भयंकर अनुभव आंम्ही घेतला आहे! Smiley

संपूर्ण लेख प्रचंड विनोदी आहे. असे माझे मत आहे. a child looking at parents having sex is almost normal in most indian houses because of the 'housing situation' 'आई अन बहीणही आजारी होती' हे या साहेबांना कसे कळले? 'मला बरं नाहिये' असं स्त्रिया केंव्हा सांगतात? केंव्हा/केंव्हा सांगतात? तोंडावर हात नवर्‍याने ठेवला/ ठेवायला लागला? छोटी खोली. कामातुरणां न भयं न लज्जा... असो. उत्तम विनोदी लेखन. धन्यवाद. (असल्या निखळ विनोदी लेखनास भेसूर असा मुलामा देऊ नये ही विनंती) ता.क. आपण सायको थेरपी इ. बोललात, पक्षी आपण सर्व बाबींचा थ्रीडी विचार केला असेलच अशी आशा करतो.

लहान वयात जे समोर घडले त्याचा त्या मुलावर खोल वर परिणाम झालेला दिसतो.त्याने आपल्या वडलाना समजून घेयला हवे होते.जरी त्याच म्हणणं आहे कि अश्याच एखाद्या बलात्कारातून त्याचा जन्म झाला असेल तरी ते त्याचे वडील आहेत.आई-वडिलांवर हाथ उगारण्या आधी त्यांनी त्याच्यासाठी घेतलेल्या कष्टाची आणि केलेल्या त्यागाची जाणीव ठेवायला हवी होती.

मुलाला संभोग या शब्दाची व्युत्पत्ती माहिती आहे त्या अर्थी मुलगा मतिंमंद नाही. गिटार मस्त वाजवतो याचा अर्थ तो बुदद्धीमान आहे असाही नाही. खोट्या कथा निर्माण करणे असाही मनोरोग आहे असे ऐकून आहे. ( उदा, चित्रपट रात्र आरम्भ तील ठोबरेंची कथा ) आता आईची तक्रार नसेल तर तो बलात्कार आहे हे निदान मुलाला काढायचा तार्किक हक्क काय ? आजारी पणात कोणी संबम्ध करीत नाहीत असे थोडेच आहे ? व्यक्तिगत जीबन हे फार अतर्क्य , गूढ असते. मुलांच्या वाढत्या वयात त्याना संभोगाचे अर्धवट ज्ञान असते. त्यामुळे आईवडिलांविषयी एक असूया मुलांच्या मनात या वयात असते असा माझा मूल व बाप म्हणूनही अनुभव आहे. तेंव्हा कुणी कुणाला दोषी ठरवायचे ... ?