Skip to main content

एकांग

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 08/02/2012 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा; तुझ्याविण फास पारधी; हरलो तुज छबी मागुती वलय गणत उलगडलो तू मुक्त लोळ तडितेचा; मी वृक्ष जखडला मातीचा पसरून विशाखा ओंजळ होउन फुललो पाताळ शोधिले पाहिले न कधि मागे हृदयातिल स्पंदन अंकुर अजुनी जागे भ्रमणात; भ्रमाच्या छायेपाठी फिरलो नवक्षितिजावर मेघांकित दिनकर झालो पाहून पालखी पलकांची; मी फसलो बोलक्या स्मिताच्या लहरींवरती झुललो क्षण कांही पण अंतरास स्पर्शुन गेले एकांग रणी काजळात अंती विरलो ...........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1306
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पाताळ शोधिले पाहिले न कधि मागे हृदयातिल स्पंदन अंकुर अजुनी जागे भ्रमणात; भ्रमाच्या छायेपाठी फिरलो नवक्षितिजावर मेघांकित दिनकर झालो
अप्रतिम .. खुप आवडले .. शृंगारीक कविता मात्र वाटली नाही.

काय कल्पनाविलास आहे. सुंदर.
पाहून पालखी पलकांची; मी फसलो बोलक्या स्मिताच्या लहरींवरती झुललो क्षण कांही पण अंतरास स्पर्शुन गेले एकांग रणी काजळात अंती विरलो
मान गये!