Skip to main content

इच्छा !

Published on मंगळवार, 07/02/2012
कोणते शब्द वापरू तुझे गुण गाण्या, तू स्फूर्तीचीही मूळ प्रेरणा असशी, मी इच्छा करतो आणि कौतुके तूही लेखणीतून या सारे लिहवुन घेशी | मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा, अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी, हे मी नच केले, घडले तुझ्या कृपेने, ही जाणिव होता मनास लाभे शुद्धी | हे सगळे तरिही शब्दरूप, बाह्यांगी, तू निसटुन जाशी मना मोहवुन माझ्या अन् पुन्हा एकदा तुझे रूप-गुण गाण्या, अन् तुला पकडण्याची मज होते इच्छा | - चैतन्य दीक्षित
लेखनविषय:

वाचन संख्या 1235
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

छान लिहिलंय. राघव

मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा, अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी, येउ द्या ! अजुन येउ द्या !! बुद्धि नाही चालली तरी येउ द्या..छान छान आहे ,काव्य...?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

जुन्या मराठी काव्याच्या धर्तीची रचना आवडली.