मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काळाघोडा फेस्टिवल ची रंगीबेरंगी दुनिया.....

पुश्कर · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 4264 वाचनखूण प्रतिक्रिया 11

रामदास 06/02/2012 - 22:05
फोटो थोड्या मोठ्याशा आकारात टाकल्यास आणखी मजा येईल. आपले मिपाकर श्री. प्रकाश जोशी यांचे एक इन्स्टालेशन या काळाघोड्याच्या जत्रेत आहे . उद्या त्याचा फोटो टाकेन. मी या फेस्टला जाऊन आलो. अजून दोनदा तरी जावे लागेल असे वाटते. सोबत आणखी काही मिपाकर आल्यास आणखी मजा येईल.

दिपाली पाटिल 07/02/2012 - 05:21
काय मस्त आहेत सगळ्या वस्तू... आणखी फोटो हवे होते.

मी-सौरभ 07/02/2012 - 11:00
हा तर बिन शब्दाचा धागा.... पुश्करः छायाचित्रांना शब्दांची थोडि जोड दिलिस तर जास्त चांगला धागा तयार होईल. समालोचन नसेलच द्यायचं तर मग सरळ खफवर पिकासाची लिंक डकव धागा कशाला???

पुश्कर 07/02/2012 - 12:37
मी मिपा वर नवीन असल्यामुळे लिहावयाचे शक्यतो टाळतो. जरा चूक झाली तर सगळे धावून येतात. .....असो हे लेखन पण गूगल झिंदाबाद. मला वाटते काही लिहिण्यापेक्षा डोळ्यांनी बघण्याचा आस्वाद घ्यावा अथवा रामदास म्हणतात तसे मिपाकर मिळून काळाघोडा फेस्टिवल भेट देऊ.ठरत असेल तर वेळ कळ्वा.

मी-सौरभ 07/02/2012 - 20:00
मी मिपा वर नवीन असल्यामुळे लिहावयाचे शक्यतो टाळतो. जरा चूक झाली तर सगळे धावून येतात. .....असो हे लेखन पण गूगल झिंदाबाद.
असे टाळणे योग्य नाही , थोडा थोडा प्रयत्न कर, जमत जाईल. मिपाकर धाऊन येतात पण त्यामुळेच सुधारणाही होतेच ना :)

पैसा 08/02/2012 - 19:54
रंगीबेरंगी वस्तू आणि त्यांचे फोटो आवडले, फक्त फोटो जरा मोठे हवे होते, आणि मराठी टाईप करायला घाबरू नका. इथले बरेच जण तुम्हाला मदत करायला तयार होतील!

In reply to by पैसा

मिसळलेला काव्यप्रेमी 13/02/2012 - 16:55
फोटो सुंदर आहेत. अवांतरः
मराठी टाईप करायला घाबरू नका. इथले बरेच जण तुम्हाला मदत करायला तयार होतील!
या साठी माणणीय पियुसाबेनचे नाव सुचवतो. ;)