✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झेन काव्य

म — मूकवाचक, Mon, 02/06/2012 - 11:36
[झेन काव्याचा भावानुवाद] (साथीच्या आजारात दगावलेल्या मुलांना श्रद्धांजली) जेव्हा वसंताचे आगमन होईल वृक्षाच्या प्रत्येक फांदीच्या अग्रभागी पुन्हा नव्याने फुले बहरतील, पण ती कोवळी मुले जी मागल्या ग्रीष्मातल्या पानगळीबरोबर निवर्तली ती कधीच परतणार नाहीत. --- वादळ शांतवले आहे, सारा बहर झडून गेला आहे; पक्षी गात आहेत, पर्वतान्वरची काजळमाया गहिरी झाली आहे -- हेच तर खरे बुद्धत्वाचे अलौकिक सामर्थ्य आहे. --- माझा वारसा -- काय बरे असेल तो? वसंतातला फुलांचा बहर, दग्ध उन्हाळ्यातले कोकिळेचे कूजन, आणि पानगळीच्या काळातले उघडेबोडके लालजर्द मॅपल्स ... --- मूळ काव्य - When spring arrives From every tree tip Flowers will bloom, But those children Who fell with last autumn’s leaves Will never return. --- The wind has settled, the blossoms have fallen; Birds sing, the mountains grow dark -- This is the wondrous power of Buddhism. --- My legacy -- What will it be? Flowers in spring, The cuckoo in summer, And the crimson maples Of autumn...

Book traversal links for झेन काव्य

  • ‹ झेन काव्य - २
  • Up

प्रतिक्रिया द्या
5669 वाचन

💬 प्रतिसाद (15)

काळजाला घरे पाडणारे काव्य /

पियुशा
Mon, 02/06/2012 - 11:42 नवीन
काळजाला घरे पाडणारे काव्य / कविता/ अनुवाद :(
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Mon, 02/06/2012 - 19:01 नवीन
+१ करुण रसपूर्ण. असेच अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आवडला अनुवाद

कवितानागेश
Mon, 02/06/2012 - 12:09 नवीन
आवडला अनुवाद
  • Log in or register to post comments

अप्रतिम

स्पा
Mon, 02/06/2012 - 12:11 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Mon, 02/06/2012 - 13:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अनुवाद आवडला॑

जाई.
Mon, 02/06/2012 - 12:20 नवीन
अनुवाद आवडला॑
  • Log in or register to post comments

वाचता वाचता ग्रेस यांच्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/06/2012 - 16:55 नवीन
वाचता वाचता ग्रेस यांच्या शब्दकळेची नकळत अठवण येऊन गेली
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रशांत उदय मनोहर
Mon, 02/06/2012 - 17:30 नवीन
सुरेख अनुवाद. आपला, (काव्यरसप्राशी) प्रशांत
  • Log in or register to post comments

सुंदर अनुवाद !

मदनबाण
Tue, 02/07/2012 - 10:00 नवीन
सुंदर अनुवाद ! :)
  • Log in or register to post comments

सुरेख!

पैसा
Tue, 02/07/2012 - 19:09 नवीन
बरेच दिवसांनी लिहिलंस! सगळ्या काव्यकणिका फार आवडल्या.
  • Log in or register to post comments

जेव्हा वसंताचे आगमन

अविनाशकुलकर्णी
Tue, 02/07/2012 - 21:30 नवीन
जेव्हा वसंताचे आगमन होईल वृक्षाच्या प्रत्येक फांदीच्या अग्रभागी पुन्हा नव्याने फुले बहरतील, पण ती कोवळी मुले जी मागल्या ग्रीष्मातल्या पानगळीबरोबर निवर्तली ती कधीच परतणार नाहीत ............................ निशब्द....
  • Log in or register to post comments

नुसताच अनुवाद आवडला नाहि

ajay wankhede
Fri, 02/10/2012 - 05:13 नवीन
नुसताच अनुवाद आवडला नाहि तर आज खर्‍या अर्थाने जिवनाच्या सत्या कडे जाणार्‍या मार्गावर नेण्याचा ठोस प्रयास..... मुकवाचका तुला प्रणाम ........................................................................................................................... नमामि बुद्ध गुणसागर तं सत्ता सदा होन्तु सुखि अवेरा कायो जुगुत्सो सकलो दुगन्धो गच्छंति सब्बे मरणं अहं
  • Log in or register to post comments

मस्त

रणजित चितळे
Sat, 02/25/2012 - 09:17 नवीन
कवितेचा अनुवाद करणे खूप अवघड असावे असे मला नेहमी वाटते (मी कधी केला नाही) पण आपला अनुवाद, मुळ कवितेचे सौंदर्य व गाभा दोन्हीही जपतो. कविता आवडली
  • Log in or register to post comments

कवितेचा विषयच असा आहे कि काय

सांजसंध्या
Sat, 03/03/2012 - 16:39 नवीन
कवितेचा विषयच असा आहे कि काय बोलावं हे सुचत नाही. मूळ काव्यातली वेदना अंगावर आली..
  • Log in or register to post comments

झेन काव्य ...

मूकवाचक
Wed, 06/03/2020 - 16:43 नवीन
अवघे अस्तित्व माझ्या नजरेसमोर उभे ठाकले आहे, निस्तेज आणि अर्थहीन, अगदी माझ्यासारखेच. आकाशात वादळ घोंघावते आहे, हिरव्यागार लुसलुशीत गवताचा पुरता पालापाचोळा झालेला आहे, आणि अवघी धरा असहाय्यपणे आक्रंदते आहे - मरणपंथाला लागलेल्या क्षते पडलेल्या वृद्धेसारखी. युगांत होण्याची वेळ आली, पण वसंताच्या आगमनाची चाहूल लावणारे कोकिळेचे कूजन नाही, की हवेची ती मंद हळुवार झुळूक नाही. आहेत ते फक्त माझ्या इवल्याश्या तकलादू पर्णकुटीला गिळंकृत करू पाहणारे थंडगार शिरशिरी आणणारे अक्राळविक्राळ ढग! मूळ काव्यः The world before my eyes is wan and wasted, just like me. The earth is decrepit, the sky stormy, all the grass withered. No spring breeze even at this late date, Just winter clouds swallowing up my tiny reed hut.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा