Skip to main content

कॅरॅमल कस्टर्ड

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 04/02/2012 05:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अंडी - २ दुध - २ कप साखर - दिड कप व्हॅनिला इसेन्स - १-२ थेंब कृती: १. एका पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे व थंड होउ द्यावे. २. भांड्यामधे २ अंडी फोडुन, त्यात १ कप साखर टाकुन egg beater ने फेटावे. ३. पातेल्यात १/२ कप साखर व ३ चमचे पाणी टाकुन, एकत्र करुन गॅसवर ठेवावे. ह्याचा brown रंगाचा पाक (कॅरॅमल) होई पर्यंत मिश्रण हलवत राहावे. ४. फेटलेल्या अंड्यामधे गार झालेले दुध निट मिक्स करावे. ५. ज्या वाटीमधे कस्टर्ड करायचे आहे त्यात आधी तळाला २ चमचे पाक टाकावा. हा पाक संपुर्ण तळाला नीट लागला पाहिजे. वाटीत पाक टाकल्यावर २ मिनिटात तो कडक होतो. ६. त्यानंतर त्यात अंडे व दुधाचे मिश्रण गाळुन ओतावे. ७. कुकर मधे थोडे पाणी टाकावे. त्यात ही वाटी ठेवुन २०-२५ मिनिटे शिजवुन घ्यावे. हे करताना कुकरची शिट्टी काढुन घ्यावी. ८. कस्टर्ड तुम्ही ओव्हन मधे सुद्धा करु शकता. त्या साठी ओव्हनच्या टिन मधे खाली कॅरॅमल लावुन, त्यावर मिश्रण ओतावे. ९. मोठया ट्रे मधे पाणी घेउन त्यात हा टिन ठेवावा. हा मोठा ट्रे ओव्हन मधे २०-२५ मिनिटे १५० degree celcius वर शिजवुन घ्यावा. १०. कस्टर्ड शिजल्यावर बाहेर काढावे. थोडे गार होउ द्यावे. ११. गार झाल्यावर आधी सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करुन घ्याव्यात. त्यावर एक प्लेट ठेवुन, टिन सोबत प्लेट उलटी करावी. १२. अलगद हाताने टिन उचलावा. कस्टर्ड निट निघुन येते. १३. मी उरलेल्या पाकाने काही design बनवली होती, त्याने सजवुन कस्टर्ड serve केले. dsf custard

वाचने 7819
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

पाककृती बघून अमंळ हळवा झालो... माझी सर्वात आवडती स्वीट डिश :) हटके सादरीकरणाने कस्टर्डची अजून लज्जत वाढलीय .... :) :)

३. पातेल्यात १/२ कप साखर व ३ चमचे पाणी टाकुन, एकत्र करुन गॅसवर ठेवावे. ह्याचा brown रंगाचा पाक (कॅरॅमल) होई पर्यंत मिश्रण हलवत राहावे.
या चमच्याचा एकतरी फोटो असायला हवा होता. नेमका अंदाज आला असता. पाकृ नेहमीप्रमाणेच भारी. :)

In reply to by अन्या दातार

आपला साधा नेहमीचा चमचाच वापरला आहे. पाणी हे फक्त पाक करताना सोपे जावे म्हणुन टाकले आहे. पाणी न टाकता नुसत्या साखरेचा पाक केला तरी चालेल.

मस्त! दरवेळी खाताना 'गिल्टी फीलिंग" त्रास देतं, पण खाल्लं नाही तर भूत होईन अशी भीती वाटते, तीच ही डिश. मस्त जमलीय. पण मला आत्ता पाहिजे, आयतं कोण देणार करून?

!!!!!!!!!

लई झाक पाकृ :) शुगर स्पंज मस्तचं

सही झालयं . मस्तच.