साहित्यः
अंडी - २
दुध - २ कप
साखर - दिड कप
व्हॅनिला इसेन्स - १-२ थेंब
कृती:
१. एका पातेल्यात दुध गरम करुन घ्यावे व थंड होउ द्यावे.
२. भांड्यामधे २ अंडी फोडुन, त्यात १ कप साखर टाकुन egg beater ने फेटावे.
३. पातेल्यात १/२ कप साखर व ३ चमचे पाणी टाकुन, एकत्र करुन गॅसवर ठेवावे. ह्याचा brown रंगाचा पाक (कॅरॅमल) होई पर्यंत मिश्रण हलवत राहावे.
४. फेटलेल्या अंड्यामधे गार झालेले दुध निट मिक्स करावे.
५. ज्या वाटीमधे कस्टर्ड करायचे आहे त्यात आधी तळाला २ चमचे पाक टाकावा. हा पाक संपुर्ण तळाला नीट लागला पाहिजे. वाटीत पाक टाकल्यावर २ मिनिटात तो कडक होतो.
६. त्यानंतर त्यात अंडे व दुधाचे मिश्रण गाळुन ओतावे.
७. कुकर मधे थोडे पाणी टाकावे. त्यात ही वाटी ठेवुन २०-२५ मिनिटे शिजवुन घ्यावे. हे करताना कुकरची शिट्टी काढुन घ्यावी.
८. कस्टर्ड तुम्ही ओव्हन मधे सुद्धा करु शकता. त्या साठी ओव्हनच्या टिन मधे खाली कॅरॅमल लावुन, त्यावर मिश्रण ओतावे.
९. मोठया ट्रे मधे पाणी घेउन त्यात हा टिन ठेवावा. हा मोठा ट्रे ओव्हन मधे २०-२५ मिनिटे १५० degree celcius वर शिजवुन घ्यावा.
१०. कस्टर्ड शिजल्यावर बाहेर काढावे. थोडे गार होउ द्यावे.
११. गार झाल्यावर आधी सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करुन घ्याव्यात. त्यावर एक प्लेट ठेवुन, टिन सोबत प्लेट उलटी करावी.
१२. अलगद हाताने टिन उचलावा. कस्टर्ड निट निघुन येते.
१३. मी उरलेल्या पाकाने काही design बनवली होती, त्याने सजवुन कस्टर्ड serve केले.


वाचने
7819
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाककृती बघून अमंळ हळवा
सादरीकरण आवडलं.
सादरीकरण पुन्हा मुळ पदाला
करीना कपूरला पाहून मन हळवे
३. पातेल्यात १/२ कप साखर व ३
आपला साधा नेहमीचा चमचाच
In reply to ३. पातेल्यात १/२ कप साखर व ३ by अन्या दातार
हम्म..
अवघड आहे....
!!!!!!!!!
मस्त
मृणालीनी तुम ग्रेट हो.
कसला भारी दिसतोय.. पाकापासून
सगळ्यांचे धन्यवाद
लई झाक पाकृ
तुफ्फ्फ्फ्फान!!! ती जाळी कशी
अशाप्रकारे मी ही जाळी
In reply to तुफ्फ्फ्फ्फान!!! ती जाळी कशी by प्राजु
लै भारी दिसतय..पहाता क्षणीच
उत्कृष्ट पदार्थ आणि
खुपच छान!! tempting!!
छान दिसतंय कस्टर्ड!
सोपी पाकृ आहे.. मस्त उद्या
यम्म्मी
एकदम