Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Mon, 01/30/2012 - 09:12
लेखनविषय (Tags)
कला
Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे. 3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय. पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे. नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत. पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!! आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो -------------------------------------------------------------------------------------------- बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला, माझ्या एका designer मित्राने , मला एके दिवशी एक international ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही. काहीतरी international लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत १० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला आणि खालील काही स्केचेस फायनल झाली. हा साईट चा प्लान १. २. ३. ४. ५. ६. लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता... चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळही देता येत नव्हता. पण हळू हळू काम जमायला लागलं. ३D सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल. ७. ८. ९. मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ... पण प्रयत्न सोडले नाहीत . हे मी केलेले 3DViews १०. ११. १२. १३. १४. १५. ३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघायला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित ) १६. १७. १८. १९. २०. २१. सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती.... काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. .. client कि हवा टाईट हो गयी हे :D २२.
  • Log in or register to post comments
  • 23442 views

प्रतिक्रिया

Submitted by मोदक on Tue, 01/31/2012 - 00:57

Permalink

__/\__

__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by कौशी on Tue, 01/31/2012 - 02:48

Permalink

अप्रतिम!!

सुंदर काम .. अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 01/31/2012 - 03:15

Permalink

मस्त मस्त मस्त!!

मस्त मस्त मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Tue, 01/31/2012 - 06:37

Permalink

अभिनंदन आणि पुढील डिझाइन्स

अभिनंदन आणि पुढील डिझाइन्स साठी अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 01/31/2012 - 07:56

Permalink

मज्जा!!

बोटांत मज्जा आहे हो तुमच्या!! झक्कास!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 01/31/2012 - 12:47

Permalink

भन्नाट रे स्पावड्या.

भन्नाट रे स्पावड्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 01/31/2012 - 13:19

Permalink

॥श्री॥.अपटे प्रसन्न...॥

॥श्री॥.अपटे प्रसन्न...॥ Image removed. अट्टल कलाकार,,,अट्टल मेहेनत,,,अट्टल कलाकृती त्यामुळे फक्त..... सलाम सलाम आणी सलामच Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 01/31/2012 - 13:57

Permalink

च्या मारी , धरुन फट्ट्याक !!

च्या मारी , धरुन फट्ट्याक !!
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 01/31/2012 - 14:28

Permalink

जबरदस्त

डिझाइन्स आणि भन्नाट काम. छानच.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 01/31/2012 - 17:21

Permalink

जबरा...

आयच्यान, येकदम खतरा काम केलंयस मित्रा.. साष्टांग दंडवत.. येवढं भारी दुकान पाहील्यावर माझी तरी आत शिरायला तंतरणार ब्वॉ.. :p
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Tue, 01/31/2012 - 17:29

Permalink

जबरदस्त! Gossip वाल्यान एखादा

जबरदस्त! Gossip वाल्यान एखादा जोडा फ्रि मंदी दिला का नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by पंतश्री on Tue, 01/31/2012 - 18:40

Permalink

उत्तम

हे दुकान तर लैच भारि झाले आहे. design तर फारच छान आहे. पण एक सांगावेसे वाटते. मी animation मध्ये काम करतो पण तुमचे 3d चे काम इतके भारी आहे कि मलाच तुम्ही काही tips द्या असे सांगावेसे वाटते आहे. आम्हाला पण हि quality आणताना नाकी नऊ येतात. तुम्ही तर फारच भारी आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 01/31/2012 - 20:47

Permalink

अत्यंत सुंदर!

केवळ पैशांसाठी न करता निर्मितीच्या आनंदासाठी कमालीच्या असोशीने केलेले काम आहे हे दिसतंच आहे. त्यामुळेच ते अतिशय देखणं झालंय. भन्नाट थ्रीडी बनवणार्‍या तुला आणि ते प्रत्यक्षात आणणार्‍या तुझ्या मित्राला सलाम! असेच आणखीन प्रोजेक्ट्स कर आणि आम्हाला माहिती दे. पुढील कामांसाठी शुभेच्छा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 01/31/2012 - 22:44

Permalink

जबरदस्त डिझाईन केलं. अभिनंदन.

जबरदस्त डिझाईन केलं. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 01/31/2012 - 22:50

Permalink

मस्त..

डिझाइन मस्तच केले आहेस रे.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 02/01/2012 - 01:00

Permalink

पहात रहावे असे ..

पहात रहावे असे काम झाले आहे.. खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 02/01/2012 - 11:25

Permalink

सुरेख रे स्पाउ!! मस्त. मला

सुरेख रे स्पाउ!! मस्त. मला तु थ्री डी त केलेला सेंटर् पिस फार आवडला, फार भन्नाट दिसतोय तो.
  • Log in or register to post comments

Submitted by जाई. on Wed, 02/01/2012 - 11:52

Permalink

छान

सर्वच डिझाईन सुंदर आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Wed, 02/01/2012 - 12:05

Permalink

व्वा काका..... मान गये.

व्वा काका..... मान गये.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 02/01/2012 - 12:34

Permalink

डिझाईन एकदम झक्कास आहे! लगे

डिझाईन एकदम झक्कास आहे! लगे रहो स्पाभाई!
  • Log in or register to post comments

Submitted by साबु on Wed, 02/01/2012 - 13:49

Permalink

_/\_

creativity ......creativity म्हणतात ती हीच..... मनासारख काम करुन ते सत्यात उतरल्याचा आनन्द कही औरच असेल ना? जियो...
  • Log in or register to post comments

Submitted by टिवटिव on Wed, 02/01/2012 - 18:53

Permalink

___/\___

अप्रतिम.... सुंदर काम .. अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Wed, 02/01/2012 - 19:56

Permalink

अभिनंदन.

भन्नाट.. आणि पहिलाच प्रयत्न इतका यशस्वी.. अमेझिंग.. हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Wed, 02/01/2012 - 19:56

Permalink

अभिनंदन.

भन्नाट.. आणि पहिलाच प्रयत्न इतका यशस्वी.. अमेझिंग.. हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by michmadhura on गुरुवार, 02/02/2012 - 10:59

Permalink

सुंदरच.

अप्रतिम.... सुंदर काम ..खूपच आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 02/02/2012 - 11:10

Permalink

सर्व मित्रांचे आभार

सर्व मित्रांचे आभार :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्यामल on गुरुवार, 02/02/2012 - 16:34

Permalink

अप्रतिम !

अप्रतिम ! खुपच सुंदर......... स्पा, तुझ्या जादुई बोटांमधली नजरबंदी करणारी जादु उत्तरोत्तर वाढत जावो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on गुरुवार, 02/02/2012 - 18:19

Permalink

कसलं क्लास काम केलयं रे

कसलं क्लास काम केलयं रे गड्या... मस्त. - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 02/02/2012 - 19:58

Permalink

प्रिय मित्र स्पा ,, तुझे काम

प्रिय मित्र स्पा ,, तुझे काम बघुन मन भरुन आले .. अतिशय प्रामाणिक कष्टाचे चीज म्हणजे मनाचे समाधान ! आणि ते तु मिळवलेस हे दिसते आहे. प्रत्येक कलेची नवनिर्मिती म्हणजे कलाकाराचे नवे जीवनच जणु .. पालवी फुटावी तसे मन नव चैतन्य घेते .. आणि तुझा हा धागा पाहुन एकच सांगावे वाटत आहे .. मित्रा उठ .. स्वताच्या कलेचा स्वता मालक हो .. कॉन्टक्ट वाढव आणि स्वता एक छोटी का होईना पण कंपणी टाक ! हे अतिशयोक्ती वाटले तरीही, स्वताच्या कामाची .. नवनिर्मीतीची तीच खरी संजीवनी असेल ..
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/02/2012 - 20:22

Permalink

स्पावडु लयं भारी ! कॉन्सेप्ट

स्पावडु लयं भारी ! ;) कॉन्सेप्ट टु रिअ‍ॅलिटी... भन्नाट. :)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 02/03/2012 - 09:47

Permalink

येतो बडा टॉईंग है,

अरे मग आहेच मुळी आमचा मित्र लै भारी, आमचा स्पावडुच असे काहीतरी करु शकतो. वेगळच पाणी आहे ते. स्पा जयंतराव म्हणाले तसा खरच स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा विचार कर.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 02/03/2012 - 10:09

Permalink

मस्त

अतिशय छान. आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 02/04/2012 - 07:56

Permalink

या कामाच्या निमित्तानं उजेडात

या कामाच्या निमित्तानं उजेडात आलेल्या अजुन काही गॉसिप बद्द्ल पुढच्या भागात लिहिणार आहेस का रे स्पा ? नाही, पुणे भेटीत बोलला होतास पण अगदी रिडिंग बिटविन द लाईन करुन सुद्धा काही कळालं नाही. अर्थात परवा अआ, तिकडे आले होते तेंव्हा त्यांना कल्पना दिली आहेस, पण काही गोष्टी निर्मितीकाराच्या लेखणीतुनच आलेल्या उत्तम.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 02/04/2012 - 08:46

In reply to या कामाच्या निमित्तानं उजेडात by ५० फक्त

Permalink

त्याला काही बोलायचे आहे पण

त्याला काही बोलायचे आहे पण बोलणार नाही तो. काही गुपित जपायचे आहे आताच सांगणार नाही तो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 02/04/2012 - 12:19

In reply to या कामाच्या निमित्तानं उजेडात by ५० फक्त

Permalink

गपा कि लेको कशाला परत बाजार

गपा कि लेको कशाला परत बाजार उठव्ताय :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 02/05/2012 - 00:08

In reply to गपा कि लेको कशाला परत बाजार by स्पा

Permalink

@गपा कि लेको कशाला परत बाजार

@गपा कि लेको कशाला परत बाजार उठव्ताय>>> Image removed. ह...ह..अता कसं वाट्टय..? बरं बरं वाट्टय
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sun, 02/05/2012 - 12:08

In reply to गपा कि लेको कशाला परत बाजार by स्पा

Permalink

आता यात बाजार उठावा असं

आता यात बाजार उठावा असं कायै बुवा ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 02/05/2012 - 12:43

In reply to आता यात बाजार उठावा असं by सूड

Permalink

अरे त्याच्या मनात आता लाडू

अरे त्याच्या मनात आता लाडू फुटायला लागलेत ना.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sun, 02/05/2012 - 14:30

In reply to अरे त्याच्या मनात आता लाडू by प्रचेतस

Permalink

ओह्ह !! तसं होय.

ओह्ह !! तसं होय. मला वाटलं ते आखूडशिंगी, बहुगुणीचं पण थ्रीडी तयार केलंन का काय. ;). म्हणजे कोणी विचारलं तर सारखं सांगत बसायला नको. नमुना दाखवला की काम संपलं. पुढे शोधाशोध करणं ही त्या त्या माणसाची जबाबदारी. :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 02/05/2012 - 14:33

In reply to ओह्ह !! तसं होय. by सूड

Permalink

हो तर. त्याच पण थ्रीडी मॉडेल

हो तर. त्याच पण थ्रीडी मॉडेल तयार केलच असेल की त्याने.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 02/07/2012 - 10:56

In reply to हो तर. त्याच पण थ्रीडी मॉडेल by प्रचेतस

Permalink

बरोबरे

पण योग्य वस्तू / व्यक्ती मिळणे हा नशीबचा भाग आहे. ३डी मॉडेल बनवच पण ते बनवल्याने गधडी मिळानार नाहीच असे नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 02/07/2012 - 12:05

In reply to बरोबरे by मी-सौरभ

Permalink

सहमत

सौरभसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊदेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/07/2012 - 23:57

In reply to ओह्ह !! तसं होय. by सूड

Permalink

@नमुना दाखवला की काम संपलं.

@नमुना दाखवला की काम संपलं. पुढे शोधाशोध करणं ही त्या त्या माणसाची जबाबदारी.>>> राजकुमार स्पा यांनी जर खरच तसं मॉडेल स्वतःसाठी तयार केलं,तर ते उपकार...आणी दुसर्‍यांनाही करुन दिलं तर परोपकार ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चिमी on Sat, 02/04/2012 - 12:50

Permalink

बेस्ट

अल्टिमेट डिझाईन - सुन्द् र कलाक्रुती . मी पुन्हा पुन्हा येउन पहात आहे. अन ओफिसमधे पन सर्वान्ना दाखवत आहे. सर्वान्नाच खुप आवडले आहे पुढील कामासाठी शुभेछ्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Sat, 02/04/2012 - 16:27

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर मुतालीक on Sun, 02/05/2012 - 12:22

Permalink

निर्माता !

विश्वामित्रा ची संकल्पना - विश्व निर्मिती करणाऱ्या - तुझ्या सारख्या कलाकाराकडे पाहूनच कुणालातरी सुचली असावी. विश्वमित्रच आहेस. कमाल केलीयस मित्रा. थांबू नकोसच आणि अश्या यशामध्ये फार काळ अडकुही नको. फक्त धाव.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत on Tue, 02/07/2012 - 10:41

Permalink

शब्द अपुरे

मला तर ३डी इतके जिवंत वाटले आणि महत्वाचे म्हणजे इतके सुंदर fashion statement असणारे स्टोअर fashion चे माहेरघर PARIS मध्येच शोभले असते. ह्या पेक्षा सुंदर घडवाल , माझ्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 02/07/2012 - 22:34

Permalink

एक बॉड्री मारावी म्हणतोय मी

एक बॉड्री मारावी म्हणतोय मी येथे .. म्हणजे ९६ चे १०० रिप्लाय होतील काय म्हणतो ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 02/07/2012 - 22:38

In reply to एक बॉड्री मारावी म्हणतोय मी by गणेशा

Permalink

एक बॉड्री मारावी म्हणतोय मी

एक बॉड्री मारावी म्हणतोय मी येथे ..
बॉड्री म्हणजे काय रे भाऊ?
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 02/07/2012 - 23:59

In reply to एक बॉड्री मारावी म्हणतोय मी by प्रचेतस

Permalink

बॉडी + लाँड्री असं आहे ते,

बॉडी + लाँड्री असं आहे ते, अर्थात काही गोष्टी लग्नाआधी कळतात काही लग्नानंतर, कधी कधी क्रम वेगळा असु शकतो, आणि बायको पगार कुठल्या घरात देते हे पण महत्वाचं असतं.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com