✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गॉसिप

स
स्पा यांनी
Mon, 01/30/2012 - 09:12  ·  लेख
लेख
Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे. 3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय. पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे. नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत. पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!! आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो -------------------------------------------------------------------------------------------- बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला, माझ्या एका designer मित्राने , मला एके दिवशी एक international ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही. काहीतरी international लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत १० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला आणि खालील काही स्केचेस फायनल झाली. हा साईट चा प्लान १. २. ३. ४. ५. ६. लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता... चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळही देता येत नव्हता. पण हळू हळू काम जमायला लागलं. ३D सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल. ७. ८. ९. मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ... पण प्रयत्न सोडले नाहीत . हे मी केलेले 3DViews १०. ११. १२. १३. १४. १५. ३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघायला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित ) १६. १७. १८. १९. २०. २१. सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती.... काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. .. client कि हवा टाईट हो गयी हे :D २२.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
23442 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

अभिनंदन

प्रचेतस
Mon, 01/30/2012 - 09:23 नवीन
भारी रे स्पावडू. कमालीचं काम केलंस.
  • Log in or register to post comments

वाह वाह !!

सूड
Mon, 01/30/2012 - 09:34 नवीन
वाह वाह !!
  • Log in or register to post comments

वाह वाह !!

प्रचेतस
Mon, 01/30/2012 - 10:32 नवीन
सूड, शब्दांची इतकी कंजूषी करू नये. तुमच्या धाग्यावर आम्ही भरभरून प्रतिसाद देतोय आणि तुम्ही फक्त वाह वाह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सविस्तर प्रतिसादासाठी जागा

सूड
Mon, 01/30/2012 - 12:15 नवीन
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवली होती, आता तुम्ही बूच मारलंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे सूड...

मी-सौरभ
Mon, 01/30/2012 - 12:17 नवीन
पुण्याचं पाणी इतक्या लवकर लागलं का तुला????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते गोरेगाव चे पाणी आहे रे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 01/30/2012 - 13:30 नवीन
ते गोरेगाव चे पाणी आहे रे बाबा, पुण्याचे नाही. त्याला गोरेगावचे पाणी लागले आहे. लवकरच तो सदस्य नाम बदलून सुड्या किंवा सूडस्नेही असे काहीतरी ठेवेल बहुतेक.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

असं नको बोलू , स्नेहींचे

सूड
Mon, 01/30/2012 - 17:56 नवीन
असं नको बोलू , स्नेहींचे स्नेही धावत येतात मग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विमे.

मी-सौरभ
Tue, 01/31/2012 - 14:31 नवीन
मुंबईत मुंबईकर होण हा ऐच्छीक मामला आहे... पण पुण्यात आल्यावर पुणेकर होणे गरजेचे आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

जादूगार आहेस मित्रा.. अद्भुत

गवि
Mon, 01/30/2012 - 09:48 नवीन
जादूगार आहेस मित्रा.. अद्भुत आहे हे सगळं..
  • Log in or register to post comments

छान ...

कुंदन
Mon, 01/30/2012 - 10:02 नवीन
जरा आमच्या पर्‍याला पण पुस्तकाच्या दुकानाचे पण छानसे डिझाईन की काय ते करुन दे की.
  • Log in or register to post comments

मिष्टेक

स्पा
Mon, 01/30/2012 - 10:16 नवीन
मोबिल वरून type केल्याने बर्याच मिष्टेक आहेत
  • Log in or register to post comments

भारी रे स्पावड्या....

मृगनयनी
Mon, 01/30/2012 - 13:06 नवीन
भारी रे स्पावड्या.... सुपर्ब!!!!!... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

भयानक भारी ...

छोटा डॉन
Mon, 01/30/2012 - 10:19 नवीन
भयानक भारी रे स्पावड्या. सला तुझ्या स्किल्सला सलाम !!! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

क ह र.....!

प्रास
Mon, 01/30/2012 - 10:20 नवीन
स्पाशेठ, अगदी भन्नाट काम केलंत ब्वॉ! डिझाईन आणि त्याचं एक्झिक्युशन दोन्ही पार कहर आहे. आणि तुमच्या मित्रानेही तुमची कल्पना तंतोतंत प्रत्यक्षात आणली आहे. अभिनंदन! मोबाईलने काढलेले असूनही फोटो छान आहेत.
  • Log in or register to post comments

+१ सहमत. मस्त काम केलय

मनिष
Mon, 01/30/2012 - 10:42 नवीन
+१ सहमत. मस्त काम केलय दोघांनीही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

Great !

जयंत कुलकर्णी
Mon, 01/30/2012 - 10:58 नवीन
फारच छान व आव्हान स्विकारून ते पार पाडलत त्याचे विशेष कौतूक आणि अर्थातच एवढी सुंदर जागा जन्माला घातल्याबद्दल आभार आणि अभिनंदन ! हे जे काम केले आहेस त्याचा वापर करून अजून काही क्लायंटस मिळवता येतील अशी खात्री आहे. ते जरूर करावे व स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. ( जर नसल्यास)
  • Log in or register to post comments

संपूर्ण प्रतिसादाला

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 01/30/2012 - 13:38 नवीन
संपूर्ण प्रतिसादाला +१०० शेवटच्या वाक्याला +१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अगदी अगदी!

धमाल मुलगा
Tue, 01/31/2012 - 19:05 नवीन
सोळा आणे महत्वाची गोष्ट बोललात जयंतराव. स्पावड्या , लेका, रडत असतोस जेव्हा पहावं तेव्हा, बघ आता पुन्हा एकदा...स्वतःकडं काय कला आहे, आणि त्याची काय किंमत आहे. तू भिड मर्दा, क्लायंट सालं आपणहोन चालत येईल दाराशी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

उदय
Sun, 02/05/2012 - 22:44 नवीन
सुंदर काम केले आहे. अभिनंदन.
स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. ( जर नसल्यास)
सहमत. आणि त्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सही रे... कसलं भन्नाट डिझाईन

सुहास झेले
Mon, 01/30/2012 - 12:07 नवीन
सही रे... कसलं भन्नाट डिझाईन बनवलंय यार, सिंपली सुपर्ब !!! :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम !! एकदम जबरी झालंय

जयवी
Mon, 01/30/2012 - 12:11 नवीन
अप्रतिम !! एकदम जबरी झालंय काम ...... अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

स्पाडू

मी-सौरभ
Mon, 01/30/2012 - 12:19 नवीन
फाडू काम चाल्लयं मित्रा... मित्राच खरयं एवढं दुकान बघून आत घुसणारा बिचकणारचं :) पु.का.शु.
  • Log in or register to post comments

छान झालीयेत डिझाईन्स आणि

कवितानागेश
Mon, 01/30/2012 - 12:21 नवीन
छान झालीयेत डिझाईन्स आणि जाहिरात देखिल ! ;)
  • Log in or register to post comments

ब्राव्हो

विसुनाना
Mon, 01/30/2012 - 12:21 नवीन
यापुढेही आपल्या यशाची कमान सतत चढती राहो आणि आम्हाला त्रिमिती चित्रे ते प्रत्यक्ष फोटो हे रूपांतरण वारंवार पहायला मिळो ही सदिच्छा. तुमच्या मित्राचेही कौतुक आहे.
  • Log in or register to post comments

जबरदस्त रे स्पावड्या, अतिशय

५० फक्त
Mon, 01/30/2012 - 12:25 नवीन
जबरदस्त रे स्पावड्या, अतिशय अभिनंदन, पक्का कलाकार आहेस. पुन्हा एकदा अभिनंदन,
  • Log in or register to post comments

क्लास... आवडलं आपल्याला...!!!

पिलीयन रायडर
Mon, 01/30/2012 - 12:34 नवीन
क्लास... आवडलं आपल्याला...!!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त.

शिल्पा ब
Mon, 01/30/2012 - 12:40 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments

_____/\_____ स्पावड्‍या,

यकु
Mon, 01/30/2012 - 12:46 नवीन
_____/\_____ स्पावड्‍या, च्यायला काय हायक्लास डिझाइन केलंस रे.. खरंच ते लक्झरियस दुकान पाहून आत शिरताना दोनदा विचार करावा वाटेल. हे डिझाइन पाहुन तुझ्‍याकडे नक्कीच क्लाएंटची रांग लागणार.. बधाई.
  • Log in or register to post comments

__/\__

प्रीत-मोहर
Mon, 01/30/2012 - 12:56 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

तुझ्या कामाची इत्यंभुत माहिती

गणपा
Mon, 01/30/2012 - 12:57 नवीन
तुझ्या कामाची इत्यंभुत माहिती करुन दिलीस रे. आवडलं. माझ्या पहिल्या वहिल्या जॉबची आठवण झाली. :) थोड्या फार अंतराने असच काहिसं करायचो पण कांपुटरची मदत न घेता. :) लगे रहो.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Mon, 01/30/2012 - 13:23 नवीन
मस्त रे! क्लास झालय काम!! :)
  • Log in or register to post comments

भन्नाट

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 01/30/2012 - 13:41 नवीन
भन्नाट डिसाईन आणि एक्सिकुशन!! आप पुरषही नही, महापुरुष हो!! ;)
स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. .. client कि हवा टाईट हो गयी हे
:D :D :D
  • Log in or register to post comments

अभिनंदन

हंस
Mon, 01/30/2012 - 13:57 नवीन
अभिनंदन स्पाभौ!
  • Log in or register to post comments

की भीषोण शुंदोर्...दारूण

विजुभाऊ
Mon, 01/30/2012 - 13:58 नवीन
की भीषोण शुंदोर्...दारूण शुंदोर्.. खूब भालो
  • Log in or register to post comments

कसले सही आहे हे

विशाखा राऊत
Mon, 01/30/2012 - 14:05 नवीन
मस्तच बनवले आहे स्टोअर.. जबरदस्त काम .. सलाम
  • Log in or register to post comments

धाग्याच शिर्षक वाचुन

पियुशा
Mon, 01/30/2012 - 14:39 नवीन
धाग्याच शिर्षक वाचुन स्पावड्या काय गॉसिप्प करतोय आणिक असे वाट्ले होते ;) पण धागा पाहुन खरोखर ड्वाले पाणावले गेले आहेत ;) सुपर्ब रे स्पावडु जाहिरात छान झालिये ;)
  • Log in or register to post comments

मलाही धाग्याचे नाव वाचुन

मोहनराव
Mon, 01/30/2012 - 14:56 नवीन
मलाही धाग्याचे नाव वाचुन काहीतरी टिपी धागा आहे की काय असा वाटला होता. तुमचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरंच कलाकार आहात!! स्वताचा व्यवसाय चालु करा नक्की यश मिळेल.
  • Log in or register to post comments

आवड्या!

मेघवेडा
Mon, 01/30/2012 - 17:50 नवीन
स्पावड्या, आपल्याला हे लै आवड्या! गुड वन.. :)
  • Log in or register to post comments

भन्नाट!!!!

Maharani
Mon, 01/30/2012 - 18:48 नवीन
भन्नाट!!!!
  • Log in or register to post comments

जबरा

स्मिता.
Mon, 01/30/2012 - 18:58 नवीन
मस्तच डिझाईन्स रे स्पा! बघूनच आवडतील असे... चेपुवरचेही डिझाईन्स छान आहेत.
  • Log in or register to post comments

जला डाला तुने...

वपाडाव
Mon, 01/30/2012 - 19:10 नवीन
ते महागुरु कायतरी म्हणतात ना, "यु हॅव नेलड इट !!" तसलं काहीसं केलंस रे.... $$$ अं गा र - क र - दी - रे - तु ने - तो $$$
  • Log in or register to post comments

केवळ जब्रा......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/30/2012 - 19:15 नवीन
. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

नावातकायआहे
Mon, 01/30/2012 - 19:26 नवीन
अप्रतिम ! एकदम कातिल झालंय काम ...... अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम! सुंदर! क्लासिक!!

पैसा
Mon, 01/30/2012 - 19:34 नवीन
तुझ्या डोक्यावर साक्षात प्रतिभेने हात ठेवलाय. जबरदस्त! याची कल्पना करणं हेच फार ग्रेट! आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणणारा तुझा मित्रही ग्रेट!
  • Log in or register to post comments

मस्त रे......... असेच डिझाईन

मनराव
Mon, 01/30/2012 - 19:42 नवीन
मस्त रे......... असेच डिझाईन काढत रहा.......... आणि क्लायंटला घाबरवत रहा.........
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

शुचि
Mon, 01/30/2012 - 20:25 नवीन
खरोखर आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे काम. अतिशय सुंदर.
  • Log in or register to post comments

आय.टी. मधे असतं तसं इन्सेप्शन

मराठे
Mon, 01/30/2012 - 20:40 नवीन
आय.टी. मधे असतं तसं इन्सेप्शन पासून इम्प्लीमेंटेशन पर्यंत प्रोजेक्ट बघायला मिळालं. मस्तच!
  • Log in or register to post comments

प्रणाम!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/30/2012 - 21:34 नवीन
प्रणाम!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अन्नू
Mon, 01/30/2012 - 21:49 नवीन
अप्रतिम ___/\____ :)
  • Log in or register to post comments

सुंदर झालय सगळं काम. तुझं

रेवती
Mon, 01/30/2012 - 22:03 नवीन
सुंदर झालय सगळं काम. तुझं अभिनंदन.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा