ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली.
का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे..
"मी.. ?? म्हातारा ???"
ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे..
........................
मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध..
जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो. मग रवंथ किंवा अॅसिडिटीसारख्या त्या वर येतात.
माझ्या लहानपणच्या ब्रँड्सच्या आठवणी त्या काळातल्या मुलींइतक्याच येतात..
गोल्ड स्पॉट, कॅडबरीज् डबल डेकर , कॅम्पको चॉकलेट, लँब्रेटा स्कूटर..
हो.. किस्मी टॉफी अजून ही आहे..पण आता आमचं इतकं प्रेम राहिलं नाही. तुमच्या आयुष्यातून दूर जाण्यासाठी सर्वानी मरायलाच हवं असं नाही..
आणि मग अचानक मी घाबरतो ... कारण हे ऐकून माझी बायको आनंदाने म्हणणार:"..तू म्हातारा झालायस.."
मी कुठेतरी मधेच लटकलोय.. माझी पिढी..अजूनही सुमारे किंवा जवळजवळ यौवनात असावी. (म्हणायला हरकत नाही.. बायकोची नसेल तर.) कपाट उघडल्यावर एकदम धडाड धूम करत सामान अंगावर कोसळावं तश्या खूप नव्या नव्या "चिजा" आमच्यावर कोसळल्या.. धुळीसकट..
मी एकांतात (बायको नसताना..!!) स्वत:ला खूप पटवत बसतो.. पण विश्वास बसत नाही की माझ्या सुरुवातीच्या खूप वर्षात मला टीव्ही माहीत नव्हता.
नाही.. मी मादागास्कर मधे राहात नाही.. फक्त ३२ वर्षाचा आहे आणि याच जन्मा बद्दल बोलतोय..
लठ्ठ काळा गोल लोखंडी डायल वाला फोन.. प्रत्येक आकडयाला टरर्र टक टक टक टक .... टरर्र टक टक टक टक असा मस्त आवाज करणारा.. ९ डायल करताना तर फारच मस्त..
असा फोन एखाद्याच्या घरात असणं ही प्रतिष्ठेची "नोन अप्पर लिमिट" होती..
मला अशी वाक्यं आठवतात: " त्यांना काय कमी आहे बाबा..तुला माहीत आहे, त्यांच्याकडे फोन आहे.." ..आमच्या कडे नव्हता.. बाय द वे ..
मग माझ्या याच (तरुण..!!) आयुष्यात पेजर्स आले..बघता बघता केरात ही गेले.. मग खूप मोबाइल फोन्स आले. पूर्वी त्याला "सेल" म्हणायचे आता नुसतं "फोन" म्हणजेच सेलफोन.. फोनसाठी "लँडलाईन" असं वेगळं सांगावं लागतं.
आणि आता ?..
थ्रीजी, टेन मेगापिक्सेल, २० जीबी, प्लेस्टेशन, वॉकमन फोन,ब्लॅकबेरी, पुशमेल विथ एमपीथ्री प्लेअर अँड मल्टिबँड रेडिओ अँड ऑल द किंग्ज हॉर्सेस डोंट फिल द डिझायर..
आता मी वाट बघतोय टी.व्ही.वाला सेल फोन लाँच होण्याची..
माझ्या गावात टी. व्ही. चा ट्रान्समीटर नव्हताच.. ऐकण्यातसुद्धा नव्हता आणि त्यामुळे अस्तित्वात सुद्धा..
म्हणूनच टी. व्ही. घेण्यात अर्थ नव्हता. टीव्ही घेऊन त्यावर नुसत्या मुंग्या बघायच्या, तर कोकणात मुंग्या भरपूर होत्याच..
मग आम्ही चक्क खेळायचो वगैरे.. क्रिकेट, विटी दांडू..ओढ्यातले (त्या वेळच्या "पर्ह्या"मधले) बारके बारके मासे पकडून पिशवीत भरणं..सायकल हाणत गावभर बोंबलणं..बदा बदा पडणं..आंबे बोरांच्या झाडांना आणि स्वत: ला खोका पाडून घेणं.. हेच आमचे जगण्याचे (आणि मरण्याचे) उद्योग होते..
एखाद्या दिवशी रानात साप (कोकणात "जनावर" म्हणायचे..) निघाला तर मग सगळा दिवस सत्कारणी लागायचा. ..
आजच्या तारखेला किती अवास्तव वाटतंय हे सगळं.. पण नाही.. मी म्हातारा नाही..
मला आता वर्षाचा (एक वर्ष या अर्थाने..!! ) छोटासा मुलगा आहे.. तो या ३-जी जगाशी खेळत असतो..
मी बघत बसतो.. "व्हॉट्स नेक्स्ट??"
मी कसला म्हातारा .. ए बायको..!! .. मी तर पुन्हा एक वर्षाचा झालोय.. आणि माझ्या बाळाचं बोट धरून त्याच्याच मोठमोठ्या भोकरासारख्या "एंजल आईज" मधून बघत बघत आता मी परत मोठ्ठा होईन..

वाचने
9783
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
जियो गवि
१६१ !
In reply to जियो गवि by मी-सौरभ
मगं
In reply to १६१ ! by कवितानागेश
........
In reply to मगं by मी-सौरभ
चला गवि......... चलो मिल
काय विजुभौ, ......हमारी
In reply to चला गवि......... चलो मिल by विजुभाऊ
व्वा
In reply to काय विजुभौ, ......हमारी by प्रास
खुपच छान लेख आहे...आपल्या
छान
आवडले
आपल्या लहानपणी आजकाल असतात
In reply to आवडले by मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त लिहिलं आहे.
ये तनहाई अब साथ नही निभाती डर
हल्ली एका ठिकाणहून दुसरीकडं
छान लिहिलत गवि. लेखन आवडलं
आमच्या टीचभर गावात फक्त गावचे
:) :)
मस्त लेखन! नातेवाईकांना पत्र
वीस
अजुन यौवनात मी.....
टाळ्या...
In reply to अजुन यौवनात मी..... by प्रभाकर पेठकर
मस्त!
लेखन आवडलं. सगळ्यांच्या
मला नक्की आठवत
भुतकाळातल्या गोड आठवणींमध्ये
स्मरणरंजन..
नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण.
शेवटची वाक्य
लिखाण आवडलं....बर्याच आठवणी
लेख खूप आवडेश
मस्त!
सुरेख!! मनाने जोपर्यंत तरुण
मस्तच लेखन!
"मी.. ?? म्हातारा ???"