आम्ही ज्यांना आमचे आंतरजालिय मित्र मानतो, त्या श्रीमान् पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांनी मिसळपाववर कोणत्यातरी धाग्यात प्रतिसादादरम्यान मखमलाबादच्या स्वादिष्ट मिसळीचा उल्लेख केलेला होता, तो आमच्या जन्मजात खादाडी वृत्तीमुळे कुठेतरी डोक्यात फिट्ट झालेला. त्यामुळेच की काय, आत्ताच्या २६ जानेवारीला कामानिमित्त नाशिकच्या पेठ रस्त्यावरून जाताना मखमलाबाद फाटा आणि मखमलाबादची दिशादर्शक खूण दिसताच त्या मिसळीच्या उल्लेखाने उचल खाल्ली आणि नकळतच आम्ही त्या दिशेने वळलो. दुपारच्या जेवणाची वेळ झाली नव्हती पण मिसळ खायला वेळेचं बंधन थोडीच असतंय?
पेठ रस्त्यावरच्या मखमलाबाद फाट्यावरून साधारण २ - ३ किलोमीटरवर मखमलाबाद गाव आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात खूप गजबज होती. जागोजागी पांढर्या गणवेशातले विद्यार्थी होतेच पण त्याबरोबरच मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही झुंबड होती. मखमलाबादमध्ये शाळा, ज्युनिअर कॉलेज असल्याने झेंडावंदनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला होता आणि बहुतेक म्हणूनच अनेकांनी आपला मोर्चा 'हॉटेल सुदर्शन'कडे वळवलेला. किमान १५ - २० मिनिटांचं वेटिंग होतं.
रामभाऊ पिंगळ्यांच्या घरातच त्यांचं 'हॉटेल सुदर्शन' आहे आणि त्यांच्या पत्नी आणि मुलांसह ते सगळी व्यवस्था बघतात. पडवीमध्ये त्यांनी टेबलं टाकली आहेत आणि बाहेरच्या खोलीतही. जागा कमी पडू लागली तर आतल्या खोलीमध्ये भारतीय बैठकीत मिसळ-पार्टी रंगते. त्र्यंबक रोडवरून पेठ रोडकडे येणार्या जोड-रस्त्यावर मखमलाबाद आहे. हा जोड-रस्ता अनेकांच्या मॉर्निंग वॉकचा नेहमीचा मार्ग आहे. मग वॉकत, आपलं चालत, मखमलाबादपर्यंत आल्यावर भूक लागल्याने सकाळी सकाळी रामभाऊंची मिसळ 'मस्ट' होऊन जाते असं सांगून वेटिंग दरम्यान भेटलेल्या (आणि बहुदा स्वतःही तसंच करणार्या) रोजच्या मॉर्निंग वॉकराने माझ्या ज्ञानात भर घातली.
रामभाऊंचा अंदाज पक्का होता आणि साधारण २०व्या मिनिटाला मला टेबल मिळालं. भरपूर गर्दी असल्याने मिसळ समोर यायला आणखी थोडा उशीर झाला पण जेव्हा ती समोर आली तेव्हा डोळ्यांची भूक मात्र लगेच भागली. मिसळ, कांदा-कोशिंबीर, गरम गरम कट (रस्सा), पाव आणि तळलेले पापड असा सगळा जामानिमा एकसाथच रामभाऊंच्या मुलाने माझ्यापुढे ठेवला.
मिसळ चवीला छान होती. ना जास्त तिखट, ना अतिमसालेदार. सगळं कसं आवश्यक तेवढंच. मला आवडली. नाशिकच्या सकाळच्या थंडीत मिसळीवर गरम गरम कट घेऊन खाणं हे काय सुख असतं ते फक्त तसं खाणार्यालाच कळेल. आपण तर बाबा त्यावेळी दोन मिसळींसोबत ६ - ८ पाव आणि फोटोत दिसतोय तो अख्खा मग भरून कटाचा फडशा पाडला.
जाता-येता जेव्हा शक्य होईल तेव्हा रामभाऊंच्या हॉटेल सुदर्शनची मखमलाबाद स्पेशल मिसळ आपण नक्की रेकमन्ड करू!


वाचने
16967
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहा...जबरी फक्कड मिसळ
मस्त
व्वा!!
त्याआधी इथे काटाकिर्रला तर
In reply to व्वा!! by मी-सौरभ
आपला पालथा चे पण लिहला पाहिजे
In reply to व्वा!! by मी-सौरभ
मुनीजी तुम्हीच लिहा बरं!!
In reply to आपला पालथा चे पण लिहला पाहिजे by कपिलमुनी
नाशिकच्या कोंडाजी
नाशिकच्या कोंडाजी
In reply to नाशिकच्या कोंडाजी by गवि
गणप्याच्या धाग्यावर मिळणारी
गणपाभौ,
In reply to गणप्याच्या धाग्यावर मिळणारी by गणपा
प्रास भाऊ, हे असे फोटो टाकून
विमे,
In reply to प्रास भाऊ, हे असे फोटो टाकून by विश्वनाथ मेहेंदळे
मखमलाबाद! व्वा
व्वा व्वा... अता नाशिकला जाईन
होय. शामसुंदरचे पाव एकदम भारी
In reply to व्वा व्वा... अता नाशिकला जाईन by उदय के'सागर
छानच..
अहाहा..!
का? का?? का???
मखमलाबाद हे नाशिक शहरातील 'एक
अरेच्चा!
In reply to मखमलाबाद हे नाशिक शहरातील 'एक by पाषाणभेद
काय राव... मिसळी बरोबर पाव
काय राव... मिसळी बरोबर पाव
In reply to काय राव... मिसळी बरोबर पाव by चेतनकुलकर्णी_85
स्लाईस??
In reply to काय राव... मिसळी बरोबर पाव by चेतनकुलकर्णी_85
चला, व्यावसायिकांचे मत आमच्या
In reply to स्लाईस?? by प्रभाकर पेठकर
मिसळ ती मिसळच.
In reply to चला, व्यावसायिकांचे मत आमच्या by विश्वनाथ मेहेंदळे
पिठ पायाने मळून करायचे
In reply to स्लाईस?? by प्रभाकर पेठकर
आत्ता नाही ग!
In reply to पिठ पायाने मळून करायचे by रेवती
नका गं असे तोंडचे घास काढून
In reply to आत्ता नाही ग! by पैसा
कल्भी, आज्भी, कल्भी...
In reply to पिठ पायाने मळून करायचे by रेवती
हे बरंय ब्वा, पायाने द्राक्ष
In reply to कल्भी, आज्भी, कल्भी... by वपाडाव
चालायचंच
In reply to हे बरंय ब्वा, पायाने द्राक्ष by प्रचेतस
पायाने मळून की मळलेल्या
In reply to पिठ पायाने मळून करायचे by रेवती
मी धागा वाचला नाही
विश्वनाथ मेहेंदळे ...
मुंबईत अनेकदा
In reply to विश्वनाथ मेहेंदळे ... by चेतनकुलकर्णी_85
विमे,
In reply to मुंबईत अनेकदा by विश्वनाथ मेहेंदळे
का असे धागे काढून जळवता
मिसळ -एक चिंतन