✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जोडींया स्वर्गमें ...

स
सुहास.. यांनी
Sat, 01/28/2012 - 15:24  ·  लेख
लेख
हेतु : सहज टीपी नेनेंबाईंनी मध्यंतरी झुल्यावर बसुन एक कमेंट केली होती, कल्पना करतो आहे की त्यावर मान्यवरांच्या कश्या प्रतिक्रिया आल्या असत्या !! ;) अर्थात आमच्या चेपुकर मित्रांनी यातल्या काही वाचल्या असतीलच माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. दादा कोंडके : हिच्यामायला !! म्हण्जी देवाला बी ' जोड्या जुळवा ' अस प्रश्न असतो म्हणा की ! बाकी येव्हढ्या जोड्या जुळवताना पार घोडा लागत असेल, म्हणजे हिकडन तिकड फिरायसाठी . ************************************************************************ माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. मक्या अनासपुरे : आस्स हाय कां ते ! पर ने ने म्हणत- म्हणता तुम्ही आण-आण, म्हणजे मला पिक्चर मदी आण कश्या काय म्हणायला लागला वं मॅडम..हे म्हणजे ' स्वर्गात जोड्या आनं पिक्चर मदि खोड्या ' असे झाले आहे. ***************************************************************** माधुरी दिक्षीत :सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. राजशेखर : जोड्या कुट लावायच्या तिथ लावा, पण लावायची आस्सल तर सांजच्यांला वाड्यावर यायच ! नायतर ईज्जारीत पाय रहाणार नाय !! ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. निळु फुले : मग आमी कुट म्हटल आमच्या घरात लागत्यात ते . ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. ओळखा पाहु : नंही नंही दया ! ये बहोत बडा रॅकेट लगता है, तुम एक काम करो, अभी के अभी मरके स्वर्गलोक में जावो, वहाँ छान-बिन करो ! और सारा रिपोर्ट डॉ. साळुंखे के पास भेजो .........(ईन्विस्टिगेशन संपल्यावर एक हात कमरेवर, दुसरा आकाशाकडे , समोर समस्त देवलोक्स, मान खाली घातलेला ईंद्र सर्वात पुढे आणी त्याला उद्देशुन) ...नब्बे प्रतिशत गलत-सलत जोडींया बनायी तुम लोगों ने , तुम्हे तो फांसी होगी ! फासी !! ************************************************************************* माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. महागूरू : हे बघ माधुरी, मी बॉलीवुड मध्ये बाल-कलाकर असलो तरी मी तुला खुप सिनीयर आहे आणि या ईथे मी महागूरू आहे, म्हणुन जोड्या कुठे ही बनल्या तरी सगळ्यात हिट जोडी कूठली हा फैसला मी करणार आहे कारण ईथे महागूरू मी आहे, तु झुल्यावर असलीस तरी मी सिट वर आहे आणि मी ..........आणि मी.........आणि मी.........................आणि मी................... ( विग सावरायला निघुन गेले आहेत ) ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. भावोजी ऊर्फ आदेश बांदेकर : एकदम बरोब्बर !! दहा पैंकी दहा गुण मिळत आहेत तुम्हाला, आता आपण पैठणी साठी वळताहोत दुसर्‍या प्रश्नाकडे !! सांगा ............................. ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. रजनी अण्णा द बेस्ट : ( सप्प...सप्प...सप्प . ) पण मुळात स्वर्ग च मी बनविला आहे . ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. जयश्री गडकर : ( महाप्रचंड रडवेला स्वर) आम्हा तमासगिरांच्या कसल्या आल्यात जोड्या व ताय !! बोर्डावर नाचण हिच काय आमची ती जोडी. ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. डॉ. श्रीराम लागु : हम्म ! (एक लांबलचक पॉज)....जोड्या !! ( पुन्हा एक लांबलचक पॉज)...जोडी जमली तरी (पॉज)......ती ( गालांची पेटन्ट थरथर) टिकली पाहिजे !! ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. अलका कूबल ( समोर डोळे पुसण्यासाठी टावेल घेवुन महिलावृंद ) : मला नाही माहीत ताई , माझी जोडी कुठे ही लागली तरी...तरी...तरी ....मला एक ' माहेरची साडी' दे !! ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. विथ रिसपेक्ट,अशोक सम्राट : (हातवारे स्वर्गात चौकौन बनवत) , आम्ही कुट काय म्हटल मग त्याला, जिथ बनवायच्या तिथ बनवा, पण ' बनवाबनवी ' करून ' धुम-धडाका ' करत ' धोबी-पछाड ' आम्हीच करणार !! ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. दिलीप प्रभावळकर : डोळे बघ ...डोळे बघ !! ही ही ही ......डोळे बघ ...डोळे बघ !! तु काय जोड्या बणवणार...मीच पछाडतो आज तुला !! ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. ईन्सपेक्टर महेश जाधव : (हाता ची मुठ आपटत ) डॅम इट !! तरीच मी लक्ष्या ला सांगत होतो की .........चित्रपट संपला. ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. स्वप्नील जोशी : आम्ही पुणेकर कमी बोलतो आणि मोजकं बोलतो, या सगळ्या वाक्यात 'बनती' मुळे घोळ आहे, आमच्या इथे मुळात बनवत नाही कोणाला !! आमच्या इथ 'मुळा नदी ' आहे, पण म्हणुन आम्ही मूळा कुठे खातो !! पण आम्ही सगळ्यांना बनवितो......बनव हा शब्द मुळात....... ************************************************************************** माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. स्वता वाश्या : जबरा !! काय सेन्टेस मारलेस ग !! तुझा फॅन होतो (मूळ पुणेकर अर्थ : काय भंगार सेन्टेस आहे) चल थोडी ट्यार्पी मिळेल मला या वाक्याने ;)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7083 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

प्रद्युमॅन लै भारी डॉल्या

गणपा
Sat, 01/28/2012 - 15:28 नवीन
प्रद्युमॅन लै भारी डॉल्या समोर हुबाच रार्‍हला. =)) पण हे काथ्याकुटात काय म्हणून टाकल बे?
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) आता खाली

स्पा
Sat, 01/28/2012 - 15:31 नवीन
=)) =)) =)) आता खाली मिपाकरांची पण नाव होऊन जाऊ द्यात
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) =)) =)) =))

मृगनयनी
Sat, 01/28/2012 - 15:39 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लय भारी!.. मस्तच्च!!!!!! :) महागुरुंचे विग सावरणे स्पेशली आवड्ल्या गेल्या आहे!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हम्म

रमताराम
Sat, 01/28/2012 - 15:46 नवीन
खुद्दा वाश्याच्या प्रतिक्रियेबाबत असहमत. अवांतर: सध्याच्या वाश्याच्या सहीवरून काही 'वेगळाच' प्रतिसाद अपेक्षित होता. पण सिब्बलबाबा मिपाला 'कंटेट सेन्सॉर करा नाहीतर सायट बंद करू' अशी धमकी देतील म्हणून लिहित नाही.
  • Log in or register to post comments

मस्तः

प्रभाकर पेठकर
Sat, 01/28/2012 - 15:46 नवीन
सगळेच प्रतिसाद (चि. माधुरीस इतर कलाकारांनी दिलेले) मस्त आहेत. फक्त, तथाकथित 'महागुरू' स्पर्धक स्त्रियांना 'अगं-तुगं' करीत नाहीत. 'अहो-जाहो' करतात.
  • Log in or register to post comments

उत्तम

सानिकास्वप्निल
Sat, 01/28/2012 - 16:01 नवीन
महागुरुंचा प्रतिसाद उत्तम आहे ह ह पु वा Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Sat, 01/28/2012 - 16:10 नवीन
मस्त!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मिपावरचे कॅरॅक्टर्स कसे

पाषाणभेद
Sat, 01/28/2012 - 16:30 नवीन
मिपावरचे कॅरॅक्टर्स कसे बोलतील या वाक्याला?
  • Log in or register to post comments

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया

किचेन
Sat, 01/28/2012 - 17:32 नवीन
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. किचेन: कै च्या कैच.मग आम्ही काय इथे वेळ जात नाही म्हणून वधु वर सूचक केंद्र उघडलंय. ;) ************************************************************************************
  • Log in or register to post comments

>>किचेन: कै च्या कैच.मग आम्ही

सूड
Sat, 01/28/2012 - 23:07 नवीन
>>किचेन: कै च्या कैच.मग आम्ही काय इथे वेळ जात नाही म्हणून वधु वर सूचक केंद्र उघडलंय. ते आता आम्ही कसं सांगणार !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मिपावरच्या समस्त एलिजिबल व

५० फक्त
Sat, 01/28/2012 - 23:35 नवीन
मिपावरच्या समस्त एलिजिबल व एडिटेबल बॅचलरांचा एकच प्रतिसाद - ****यला, मग आम्ही काय झक मारायला भाज्या अन पुलाव करुन इथं फोटो टाकतोय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हॅ हॅ हॅ

मोदक
Sun, 01/29/2012 - 01:29 नवीन
>> किचेन: कै च्या कैच.मग आम्ही काय इथे वेळ जात नाही म्हणून वधु वर सूचक केंद्र उघडलंय. अहो ताई, जोड्या वर स्वर्गात बनल्या, तुम्ही खाली फक्त गाठींची टोके एकत्र आणायची. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

तोच तर प्रोब्लेम आहे. आयला

किचेन
Sun, 01/29/2012 - 18:49 नवीन
तोच तर प्रोब्लेम आहे. आयला एवढी दर वेळेस दोन टोंकांची गाठ मारताना नवऱ्याच नाव उखाण्यात घ्यावं लागत.आता सारख सारख महादेवाच्या पिंडीवर बेल वाहून पाठ दुखायला लागलीये.कुणीतरी नाव ( माफ करा),उखाणा सुचवा रे/ ग. आजकालची मुलही लई भारी भारी उखाणे घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हे घ्या

श्रावण मोडक
Mon, 01/30/2012 - 14:07 नवीन
हे घ्या... ;) आणि करा सुरवात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मस्त

स्मिता.
Sat, 01/28/2012 - 17:57 नवीन
=)) =)) सिआयडी आणि महागुरूंची प्रतिक्रिया आवडली.
  • Log in or register to post comments

हाहाहा! लैच भारी! डॉ. लागू

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/28/2012 - 20:24 नवीन
हाहाहा! लैच भारी! डॉ. लागू वगैरे मस्तच.
  • Log in or register to post comments

झक्कास!

मैत्र
Sat, 01/28/2012 - 20:32 नवीन
सगळेच टोले मस्त... पण महागुरू सगळ्यात बेष्ट :)
  • Log in or register to post comments

महागुरु आणि स्वप्नील जोशीची

सूड
Sat, 01/28/2012 - 23:09 नवीन
महागुरु आणि स्वप्नील जोशीची प्रतिक्रिया आवडल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया

विजुभाऊ
Sat, 01/28/2012 - 23:58 नवीन
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. प्रभू मास्तरः जोड्या नुसत्या जुळून चालत नाही. शेत जोडीनेच नांगरावं लागतं.
  • Log in or register to post comments

मस्तच!!

प्राजु
Sun, 01/29/2012 - 01:11 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments

आवडल रे.. --टुकुल

टुकुल
Sun, 01/29/2012 - 10:44 नवीन
आवडल रे.. --टुकुल
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sun, 01/29/2012 - 11:06 नवीन
=)) हाहाहा! झुल्यावरच्या नेनेबॆ दुसर्याच आठवल्या एकदम!
  • Log in or register to post comments

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया

यकु
Mon, 01/30/2012 - 14:02 नवीन
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. परा: थोडक्यात जोडी जमायची असेल तर स्वत: मरावे लागणार ! माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. डॉणराव: उदाहरणार्थ कशावरुन? काही विदा उपलब्ध आहे का? तूर्तास जरा गडबडीत आहे.. ‍सविस्तर प्रतिसाद लवकरच.. माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. तात्या : जियो माधुरी! बाझवला हे आधी आम्हाला माहित असतं तर रौशनीचा स्वर्गातला पत्ता काढला नसता का? माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.‍ नितिन थत्ते: (आकाशाकडे पहात काहीतरी आठवून) सध्या गप्प रहायचे ठरवले आहे. माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. धमाल मुलगा: खीक् ! खरंय बर्का मिसेस नेने.. आमची जोडी लागल्यापासून हे कर्म नक्कीच कोण्‍या मानव प्राण्‍याच्या हातून घडलेलं नाही अशी खात्रीच झालीय. तर सांगत काय होतो.. माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है. अवलिया, यॉर्कर फेम (इ.मृ.आयडीस शां.दे.): अच्छा, नेनेंपूर्वी लागलेल्या जोड्यांबद्दल काय म्हणणं आहे आपलं? लगेच आठवले तेवढे लिहीले, आता बाकीचे प्रतिसादकांनी लिहावेत..
  • Log in or register to post comments

+१ =))

गणपा
Mon, 01/30/2012 - 14:36 नवीन
+१ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

=))

मी-सौरभ
Mon, 01/30/2012 - 15:20 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+३ =))

बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/30/2012 - 22:09 नवीन
+३ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

+४ =))

शुचि
Mon, 01/30/2012 - 23:16 नवीन
+४ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+५ =)) =))

जाई.
Mon, 01/30/2012 - 23:43 नवीन
+५ =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हायला!

पैसा
Mon, 01/30/2012 - 23:27 नवीन
हे पण भारीए! याचा कोणीतरी शेप्रेट धागा करा रे! बाकीचे यशस्वी कलाकार जमेल तशी भर घालतीलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

प्र का टा आ

स्पा
Mon, 01/30/2012 - 14:42 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments

दया ..

कपिलमुनी
Mon, 01/30/2012 - 17:06 नवीन
दया , स्वर्ग का दरवाजा तोड दो !!
  • Log in or register to post comments

हा हा हा ... जबरा रे...

सुहास झेले
Mon, 01/30/2012 - 18:03 नवीन
हा हा हा ... जबरा रे... महागुरू आणि सीआयडी प्रचंड आवडले :) :) यशवंता, अजून येऊ देत :) :)
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Mon, 01/30/2012 - 18:17 नवीन
हा हा हा , भट्टी मस्त जमलीय :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

जाम आवडले.. बांदेकर भावोजी,

गवि
Mon, 01/30/2012 - 18:44 नवीन
जाम आवडले.. बांदेकर भावोजी, सीआयडी, महागुरु विशेष खास..
  • Log in or register to post comments

झकास!

मेघवेडा
Tue, 01/31/2012 - 00:55 नवीन
हा हा हा! तुफान! प्रद्युमन् दोल्यांसमोर उभाच राहिला अगदी! बेष्टंय रे! श्टँडप कॉमेडीसाठी जबरा पोटेण्शियलवाला माल आहे. :)
  • Log in or register to post comments

=))

मूकवाचक
Tue, 01/31/2012 - 10:58 नवीन
=))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा