जोडींया स्वर्गमें ...
हेतु : सहज टीपी
नेनेंबाईंनी मध्यंतरी झुल्यावर बसुन एक कमेंट केली होती, कल्पना करतो आहे की त्यावर मान्यवरांच्या कश्या प्रतिक्रिया आल्या असत्या !! ;) अर्थात आमच्या चेपुकर मित्रांनी यातल्या काही वाचल्या असतीलच
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
दादा कोंडके : हिच्यामायला !! म्हण्जी देवाला बी ' जोड्या जुळवा ' अस प्रश्न असतो म्हणा की ! बाकी येव्हढ्या जोड्या जुळवताना पार घोडा लागत असेल, म्हणजे हिकडन तिकड फिरायसाठी .
************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
मक्या अनासपुरे : आस्स हाय कां ते ! पर ने ने म्हणत- म्हणता तुम्ही आण-आण, म्हणजे मला पिक्चर मदी आण कश्या काय म्हणायला लागला वं मॅडम..हे म्हणजे ' स्वर्गात जोड्या आनं पिक्चर मदि खोड्या ' असे झाले आहे.
*****************************************************************
माधुरी दिक्षीत :सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
राजशेखर : जोड्या कुट लावायच्या तिथ लावा, पण लावायची आस्सल तर सांजच्यांला वाड्यावर यायच ! नायतर ईज्जारीत पाय रहाणार नाय !!
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
निळु फुले : मग आमी कुट म्हटल आमच्या घरात लागत्यात ते .
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
ओळखा पाहु : नंही नंही दया ! ये बहोत बडा रॅकेट लगता है, तुम एक काम करो, अभी के अभी मरके स्वर्गलोक में जावो, वहाँ छान-बिन करो ! और सारा रिपोर्ट डॉ. साळुंखे के पास भेजो .........(ईन्विस्टिगेशन संपल्यावर एक हात कमरेवर, दुसरा आकाशाकडे , समोर समस्त देवलोक्स, मान खाली घातलेला ईंद्र सर्वात पुढे आणी त्याला उद्देशुन) ...नब्बे प्रतिशत गलत-सलत जोडींया बनायी तुम लोगों ने , तुम्हे तो फांसी होगी ! फासी !!
*************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
महागूरू : हे बघ माधुरी, मी बॉलीवुड मध्ये बाल-कलाकर असलो तरी मी तुला खुप सिनीयर आहे आणि या ईथे मी महागूरू आहे, म्हणुन जोड्या कुठे ही बनल्या तरी सगळ्यात हिट जोडी कूठली हा फैसला मी करणार आहे कारण ईथे महागूरू मी आहे, तु झुल्यावर असलीस तरी मी सिट वर आहे आणि मी ..........आणि मी.........आणि मी.........................आणि मी................... ( विग सावरायला निघुन गेले आहेत )
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
भावोजी ऊर्फ आदेश बांदेकर : एकदम बरोब्बर !! दहा पैंकी दहा गुण मिळत आहेत तुम्हाला, आता आपण पैठणी साठी वळताहोत दुसर्या प्रश्नाकडे !! सांगा .............................
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
रजनी अण्णा द बेस्ट : ( सप्प...सप्प...सप्प . ) पण मुळात स्वर्ग च मी बनविला आहे .
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
जयश्री गडकर : ( महाप्रचंड रडवेला स्वर) आम्हा तमासगिरांच्या कसल्या आल्यात जोड्या व ताय !! बोर्डावर नाचण हिच काय आमची ती जोडी.
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
डॉ. श्रीराम लागु : हम्म ! (एक लांबलचक पॉज)....जोड्या !! ( पुन्हा एक लांबलचक पॉज)...जोडी जमली तरी (पॉज)......ती ( गालांची पेटन्ट थरथर) टिकली पाहिजे !!
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
अलका कूबल ( समोर डोळे पुसण्यासाठी टावेल घेवुन महिलावृंद ) : मला नाही माहीत ताई , माझी जोडी कुठे ही लागली तरी...तरी...तरी ....मला एक ' माहेरची साडी' दे !!
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
विथ रिसपेक्ट,अशोक सम्राट : (हातवारे स्वर्गात चौकौन बनवत) , आम्ही कुट काय म्हटल मग त्याला, जिथ बनवायच्या तिथ बनवा, पण ' बनवाबनवी ' करून ' धुम-धडाका ' करत ' धोबी-पछाड ' आम्हीच करणार !!
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
दिलीप प्रभावळकर : डोळे बघ ...डोळे बघ !! ही ही ही ......डोळे बघ ...डोळे बघ !! तु काय जोड्या बणवणार...मीच पछाडतो आज तुला !!
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
ईन्सपेक्टर महेश जाधव : (हाता ची मुठ आपटत ) डॅम इट !! तरीच मी लक्ष्या ला सांगत होतो की .........चित्रपट संपला.
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
स्वप्नील जोशी : आम्ही पुणेकर कमी बोलतो आणि मोजकं बोलतो, या सगळ्या वाक्यात 'बनती' मुळे घोळ आहे, आमच्या इथे मुळात बनवत नाही कोणाला !! आमच्या इथ 'मुळा नदी ' आहे, पण म्हणुन आम्ही मूळा कुठे खातो !! पण आम्ही सगळ्यांना बनवितो......बनव हा शब्द मुळात.......
**************************************************************************
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.
स्वता वाश्या : जबरा !! काय सेन्टेस मारलेस ग !! तुझा फॅन होतो (मूळ पुणेकर अर्थ : काय भंगार सेन्टेस आहे) चल थोडी ट्यार्पी मिळेल मला या वाक्याने ;)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रद्युमॅन लै भारी डॉल्या
=)) =)) =)) आता खाली
=)) =)) =)) =)) =)) =))
हम्म
मस्तः
उत्तम
मस्त
मिपावरचे कॅरॅक्टर्स कसे
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया
>>किचेन: कै च्या कैच.मग आम्ही
मिपावरच्या समस्त एलिजिबल व
हॅ हॅ हॅ
तोच तर प्रोब्लेम आहे. आयला
हे घ्या
मस्त
हाहाहा! लैच भारी! डॉ. लागू
झक्कास!
महागुरु आणि स्वप्नील जोशीची
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया
मस्तच!!
आवडल रे.. --टुकुल
मस्त!
माधुरी दिक्षीत : सारी जोडींया
+१ =))
=))
+३ =))
+४ =))
+५ =)) =))
हायला!
प्र का टा आ
दया ..
हा हा हा ... जबरा रे...
-
जाम आवडले.. बांदेकर भावोजी,
झकास!
=))