'शाळा' नुकतंच वाचून संपवलं. तसंच त्यावरचा चित्रपटही नुकताच प्रदर्शीत झालाय. सगळीकडे चित्रपटाची आणि पुस्तकाची चर्चा चालू आहे. पेपरांमधे आणि आंजावर रिव्यू येत आहेत. एकूण सगळं वातावरण शाळामय झालंय. अशात कित्येकांना आपल्या शाळेची, शिक्षकांची, शाळेतल्या मित्रांची (काही भाग्यवंतांना मैत्रीणींची), खोड्यांची आणि विशेषतः शाळेत खाल्लेल्या माराची आठवण झाली नाही तरच नवल. तर या वाहत्या गंगेत हात धूउन घ्यावेत ह्याच एकमेव हेतुने हा धागा काढतोय.
जे सत्तर ऐंशीच्या दशकात शाळेत होते त्यांच्यासाठी शाळेत मार खाणं (शिक्षकांकडून.. इतर पोरांकडून नव्हे) हा अगदी सर्वसाधारण मामला होता. (नंतरचं मला माहित नाही. आमच्या चिरंजीवांवर हात उगारण्याची काहि सोय नाहीये). तर शाळेच्या आठवणीं उगाळताना, आपण शाळेत प्रथम कधी मार खाल्ला? हा विचार आला.. आणि तो दिवस डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभाच राहिला.
स्थळ : इ. पहिली ब. कोनकर बाईंचा वर्ग
वेळः सकाळी सकाळी हजेरी घेण्याच्याही आगोदर.
मी कोनकर बाईंच्या पुढे डावा हात पुढे करून उजव्या हाताने डोळे पुसत होतो.
मारकुटेपणाच्या बाबतीत कोनकर बाई आमच्या शाळेत नंबर दोनवर होत्या. (पहिल्या नंबरवर मोडकबाई.. त्या अगदी नावाप्रमाणे हात मोडायच्या त्वेषानेच मारायच्या.. असो)
"एकट्यानं जायचंय घरी? जायचंय आत्ता? आण रे त्याचं दप्तर"
हे ऐकल्यावर वर्गातला योगेश सोमण टुण्णकन उठला आणि माझं दप्तर घेऊन आला. त्याचा अशा वेळचा चपळपणा वाखाणण्यासारखा असतो.
तर झालं काय होतं, तर आदल्या दिवशी मला शाळेतून घेण्यासाठी बाबांना थोडा उशीर झाला होता. नेहमी आई यायची पण तिला बरं नव्हतं. मी बाबांची थोडा वेळ वाट बघितली आणि सरळ रस्त्याला लागलो. तशी आमची शाळा घरापासून फार लांब नाही पण मधे एक मेन रोड ओलांडावा लागतो. एवढाच काय तो धोका. अर्थात त्यावेळी आमच्या ठाण्यात इतकी रहदारी नव्हती म्हणा.
मी आरामात घरी पोहोचलो. काका, काकू, नाना, आजी आम्ही सगळे एकत्रच राहात असल्याने मी आल्यावर दप्तर टाकून खेळायला गेलो तरी आईला पत्ता नव्हता. थोड्या वेळाने बाबा घरी आले आणि मग त्यांनी मला बोलावलं. सर्वांदेखत माझी साग्रसंगीत पूजा झाली. त्या दिवशी बाबांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी प्रथम पाहिलं. सगळा प्रकार झाल्यावर प्रत्येकाने माझ्यावर येथेच्छ तोंडसुख घेतलं. मारण्याचा कोटा बाबांनीच संपवला होता.
दुसर्या दिवशी शाळेत गेल्यावर कोनकरबाईंसमोर रिपीट टेलिकास्ट झालं. बाबांनी बहुतेक बाईंनापण चांगलं झाडलं असणार. सटासट पाच पट्ट्या हातावर बसल्या. मुसमुसत मी पट्ट्या खाल्या पण भोकाड पसरलं नाही. (तसा मी पहिल्यापासूनच सोशिक हो!). दप्तर उचलून जागेवर जाऊन बसलो.
त्यादिवशी शाळेतल्या प्रदीर्घ कारकिर्दीतल्या पहिल्या गुन्ह्याची पहिली शिक्षा मी भोगली होती. पहिल्या प्रेमासारखी पहिल्या माराची आठवणसुध्दा जन्मभर राहाते. अर्थात उर्वरीत आयुष्यात असे प्रसंग चिक्कार आले (प्रेमाचे नव्हे... मार खाण्याचे). पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.
तुम्ही शाळेत कधी ना कधी मार खाल्ला असेलच. कधी सामुदायिक धुलाई तरी कधी कधी स्पेशल वॉश?
(काल्पनिक? मुळीच नाही)
वाचन संख्या
3161
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
>पहिल्या प्रेमासारखी पहिल्या
उभी पट्टी
वर्गाबाहेर...
आमाला पन आटव्त लहानप्णीचं!
१० वित असताना शाळेच्या
पण...
In reply to १० वित असताना शाळेच्या by पक पक पक
>>(त्या मास्तरांची मुलगी खुप
In reply to १० वित असताना शाळेच्या by पक पक पक
पेहेले मारका पेहेला गम
आम्हाला गणित शिकवायला झोडगे
आडनांव बदला की हो.....
In reply to आम्हाला गणित शिकवायला झोडगे by यकु
:-D
In reply to आडनांव बदला की हो..... by प्रभाकर पेठकर
---
In reply to आडनांव बदला की हो..... by प्रभाकर पेठकर
:-)
---
अवघड आहे...
माझ्याकडे बघून कोणी मार
सगळ्यांच्या रम्य आठवणी